Home » का मुलींना कमी वयातच सुरु होते मासिक पाळी?

का मुलींना कमी वयातच सुरु होते मासिक पाळी?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Early Period
Share

आजकाल आपण आधुनिकरणाकडे जात आहोत आणि मॉडर्न लाईफस्टाईलला आपल्या जीवनाचा भाग बनवत आहोत. या आधुनिकरणामुळे नक्कीच अनेक फायदे आपल्याला दिसून येत आहे. अनेक अविश्वसनीय अशा गोष्टी, शोध घडताना दिसत आहे. पृथ्वीचं नाही तर मंगळावर देखील आपण पाऊल टाकले आहे. मात्र आपल्याकडे नेहमीच एक म्हण म्हटली जाते की, एका नाण्याला नेहमीच दोन बाजू असतात. जिथे आपले जीवन या आधुनिकरणाने अतिशय सुकर आणि अत्यावध केले आहे. तिथे हीच जीवनशैली आपल्याला मारक ठरताना दिसत आहे.

निसर्गाने आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी तयार केलेले नैसर्गिक चक्रच हळूहळू बदलत आहे. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर अगदी स्पष्टच दिसून येत आहे. याचे एक मोठे आणि उत्तम उदाहरण म्हणजे मुलींना अजाणत्या वयात मासिक पाळी सुरु होत आहे. प्रत्येक मुलगी आणि मुलगा वयाच्या एका टप्प्यानंतर तारुण्याकडे जायला लागतात. याचे अनेक बदल त्यांच्या शरीरात विशिष्ट वयानंतर घडायला लागतात आणि ते आपल्याला दिसतात देखील. मुलींमध्ये १२ ते १४ या वयात सुरु होणारी मासिक पाळी हे याचेच एक उदाहरण आहे. मात्र आता ही पाळी सुरु होण्याचे वय १२ वरून थेट ८ ते ९ यावर आले आहे.

प्रत्येक मुलीच्या आयुष्याती मासिक पाळी हा खूपच महत्वाचा, मोठा आणि संवेदनशील टप्पा समजला जातो. एककीकडे तारुण्यात होणारे पदार्पण, शरीरात होणारे बदल आणि त्यासोबतच येणारी जबाबदारी या सगळ्या गोष्टी समजून घेण्याची समज त्यांना १२ ते १४ वयात येण्यास सुरुवात होते. म्हणूनच कदाचित निसर्गाने पाळी देखील याच वयात सुरु केली असावी. मात्र आत हे पाळी येण्याचे वय कमी होऊन ८ ते ९ वर्ष झाले आहे. ही आज आणि उद्याच्या मुलींसाठी काळजीची बाब आहे.

पीरियड म्हणजेच मासिक हा मुलींच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. आजकाल ८ वर्षे आणि ९ वर्षे वयाच्या मुलींनाही मासिक पाळी येऊ लागली आहे. एवढ्या लहान वयात मासिक पाळी आल्यावर मुलींना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. मुलींना लवकर मासिक पाळी येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

पाळी लवकर येण्याला अर्लीमेनार्की असे म्हणतात. एका अहवालानुसार १९५० ते १९६९ या काळात मासिक पाळी वयाच्या १२ ते १३ वर्षी येण्यास सुरुवात झाली होती. नंतर २००० ते २००५ या काळात वयाच्या ११ ते १२ व्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली. मात्र अलीकडे १० वर्षाच्या आतील मुलींना मासिक पाळी येण्यास सुरूवात झाली आहे. लवकर पाळी येण्याची नक्की कोणती कारणे आहेत जाणून घेऊया.

Early Period

हार्मोनल बदल
मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याचे पहिले आणि महत्वाचे मोठे कारण म्हणजे हार्मोनल बदल होय. ज्या मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल लवकर होतात त्यांना मासिक पाळी लवकर येऊ लागते.

अनुवांशिक
लहान वयात मासिक पाळी सुरू होण्याचं एक कारण वंशाचा प्रभाव असू शकतो. जर मुलीच्या आई किंवा आजीला लहान वयातच मासिक पाळी सुरू झाली असेल तर त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतो.

वातावरणाचा परिणाम
आजकालच्या मुलांवर लहान वयातच अभ्यासाचा ताण येतो. पालक मुलांवर लहान वर्गातच आपल्या अनेक अपेक्षांचे ओझे लादतात. सतत टॉप करणे, प्रत्येक गोष्टीत पुढे राहणे आदी अनेक गोष्टीं करण्याचे त्यांच्यावर प्रेशर येते. त्यातून त्यांना ताण देतात आणि मारहाण करतात. त्यांच्या खेळण्याचा वेळ कमी झाला आहे. शारीरिक हालचाली थांबल्या आहेत. मुले सतत मोबाईलवर किंवा संगणकासमोरच असतात. या सगळ्याचा परिणाम मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.

जंकफूड
सात ते आठ वयोगटातल्या मुली सर्वात जास्त फास्टफुडचं सेवन करत असल्याचं दिसून आलं. फास्टफूडच्या सवयीमुळे वजन जास्त वाढतं आणि शरीरातील ‘इस्ट्रोजेन’मध्ये वाढ होते ,त्यामुळे अकाली तारुण्य येण्यास सुरुवात होते. फास्टफूडमध्ये मैदा आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं, याचा गंभीर परिणाम थेट मुलींच्या शारीरिक बदलावर होत आहे.

मानसिक बदल
शरीरात झालेले बदल स्विकारण्या इतपत या मुलींमध्ये मानिसकता तयार झालेली नसते. त्यामुळे मूड बदलणं, गोंधळून जाणं, भिती वाटणं सतत चिडचिड होणं या अशा त्रासातून मुली जात असातात. बऱ्याचदा आपल्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय असं वाटून या मुलींच्या मनात लाजिरवाण्या आणि अपराधीपणाच्या भावना येतात.

पालकांचा प्रभाव
पालकांचा वादविवाद, घटस्फोट याचाही मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे लवकर मासिक पाळी सुरू होते किंवा लहान वयात शारीरिक शोषण झालेल्या मुलींनाही लवकर मासिक पाळी सुरू होते.

========
हे देखील वाचा : हिवाळ्यात हेयर केयरच्या ‘या’ टिप्स वापरून टिकवा केसांची चमक
========

पालकांची जबाबदारी
मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींबरोबरच त्यांच्या शारीरिक बदलांकडे, हालचालींकडे पालकांनी लक्ष देणे अत्यावश्यक आहे. १० वर्षांच्या आत असलेल्या आपल्या मुलींच्या स्तनांचा आकार वाढतोय का? त्याचबरोबर जननइंद्रियांच्या जागी केस यायला सुरुवात होतेय असं जाणवल्यास लगेचच आपल्या मुलींची वैद्यकीय तपासणी करावी. डॉक्टर पालकांना आणि मुलींनाही आरोग्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करु शकतात.

लठ्ठपणा
मासिक पाळी लवकर येण्याची बरीच कारणे आहेत. यातील एक पैलू म्हणजे मुलींमधील लठ्ठपणा वाढतो आहे. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच लठ्ठ असलेल्या मुलींमध्ये लवकर मासिक पाळी येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्याधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.