Home » Summer :उन्हाच्या तडाख्यातही हिवाळ्याचा फील देणारी पर्यटन स्थळं 

Summer :उन्हाच्या तडाख्यातही हिवाळ्याचा फील देणारी पर्यटन स्थळं 

by Jyotsna Kulkarni
0 comment
Summer
Share

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असून, दुसरीकडे लवकरच सर्वच परीक्षा संपून विद्यार्थी रिलॅक्स होणार आहे. त्यामुळे आता अनेक घरांमध्ये बाहेर कुठे तरी फिरायला जाण्याचे प्लांनिंग सुरु झाले असेल. मात्र उन्हाळा असल्याने नक्की कुठे फिरायला जावे याबद्दल विचारविमर्श होताना देखील दिसत असतील. तुमच्या याच प्रश्नाचे उत्तर आम्ही घेऊन आलो आहोत. उन्हाळा असल्याने जिथे गरम होणार नाही थंड वाटेल, उत्तम निसर्ग सौंदर्य, बजेट फ्रेंडली आदी अटीशर्थींमध्ये बसणारे भारतातील अनेक ठिकाणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Summer)

आम्ही तुम्हाला आज फिरण्यासाठी जी ठिकाणं सांगणार आहोत ती या उन्हाच्या तडाख्यातही हिवाळ्याचा फील देतील. जेव्हा कधी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा विषय निघतो, तेव्हा सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो उत्तर भारतातील ठिकाणांचा. यातले देखील काही आपल्याला माहित असलेले ठिकाणं सोडले तर आपण दुसऱ्या ठिकाणी जात नाही. यासाठी आज आपण भारतातील अतिशय सुंदर आणि थंडगार अशी ठिकाणं जाणून घेऊया. (Summer Travelling)

मनाली (Manali)

हिमाचल प्रदेशातील मनाली हे ठिकाणं भारतीयांमध्ये अफाट लोकप्रिय आहे. मनालीपासून ५१ किमी अंतरावर असलेल्या रोहतांग तलाव हे तर मनालीमधील सर्वात आकर्षक आणि सुंदर ठिकाण आहे. येथे अतिशय सुंदर निसर्गासोबतच  तुम्हाला मजेदार आणि साहसी खेळ करण्याची संधी देखील मिळते. येथे सोलांग व्हॅली पाहता येईल. (Travelling News)

Summer

======

हे देखील वाचा : Haunted : तुम्हाला माहित आहे का…? भारतातील ‘या’ Haunted जागा

======

शिमला (Shimla)

थंड ठिकाणांमध्ये शिमला हे सर्वात टॉपवर येते. त्यामुळे या उन्हाळ्यात हा पर्याय देखील बेस्ट आहे. शिमला येथील कुफरी आणि मॉल रोड एक्सप्लोर करायला देखील मजा येते. कुफरी हे एक हिल स्टेशन आहे. येथे बर्फावर खेळले जाणारे खेळ, ट्रेकिंग, घोडेस्वारी आदी गोष्टी तुम्ही करू शकता. (Social News)

Summer

नैनिताल (Nainital)

उत्तराखंडमधील नैनिताल हे ठिकाण सुद्धा फिरण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही नैनी तलाव, स्नो व्ह्यू पॉइंट पाहू शकता. (Trending News)

Summer

मसुरी (Mussoorie)

मसुरीमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवणे नक्कीच सुखद अनुभव असेल. इथे केम्पटी फॉल्स, अनेक अशी ठिकाणं आहेत जे तुम्ही पाहू शकता.

Summer

औली (Aulli)

जर तुम्हाला ट्रेकिंग आणि एडवेंचर स्पोर्ट्सची आवड असेल तर उत्तराखंडमधील औली हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही एडवेंचर्स एक्टिविटीजचा आनंद घेऊ शकता. हे ठिकाण स्नो लवर्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही बर्फाच्या खेळांचा आनंद घेऊ शकता. (Marathi Top News)

Summer

धर्मशाळा (Dharamshala)

हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा हे ठिकाण कायम चर्चेत असते. येथे तिबेटी लोक राहत असल्याने धर्मशाला मिनी तिबेट म्हणूनही ओळखले जाते. येथे मॅक्लॉडगंज, बाजार, संग्रहालये आणि मठ यासारख्या गोष्टी कायम आकर्षणाचा बिंदू आहेत. (Marathi Latest News)

Summer

उटी (Ootty)

ऊटीला भेट देण्यासाठी मे हा सर्वोत्तम महिना आहे. उटीमध्ये, तुम्ही दोड्डाबोट्टा शिखर आणि टायगर हिलला भेट देण्यासाठी पर्यटक कायम गर्दी करतात. यासोबतच धबधबे, चहाच्या बागा, डोंगरावरील रंगीबेरंगी फुले आणि तलाव देखील कमालीच्या सुंदर जागा आहेत.(Marathi News)

Summer

======

हे देखील वाचा : Summer : उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?

======

तवांग (Twang)

अरुणाचल प्रदेशातील तवांग शहर २६६९ किमी उंचीवर वसलेले आहे. या ठिकाणावरून हिमालयाचे शिखर अतिशय स्पष्ट दिसते. तवांगचा बराचसा भाग बर्फाने व्यापलेला आहे. येथे असणाऱ्या खोल दर्‍या, मठ, पर्वत शिखर आणि धबधबे आदी अनेक गोष्टी आपल्याला सुखद अनुभव देतात. तवांग हे उन्हाळ्यात भेट देण्याचे एक अतिशय आकर्षक ठिकाण आहे.

Summer


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.