Home » कच्चा लसूण खाणे ठरू शकते ‘या’ आजारांसाठी वरदान

कच्चा लसूण खाणे ठरू शकते ‘या’ आजारांसाठी वरदान

by Jyotsna Kulkarni
0 comment
Raw Garlic Health Benefits
Share

आपल्या भारतीय लोकांचे जेवण एकदम मसालेदार, चटकदार म्हणून ओळखले जाते. आपण आपल्या जिवंत विविध गोष्टींचा अगदी दररोज वापर करत असतो. यातही कांदा आणि लसूण या दोन गोष्टींशिवाय तर आपण आपल्या जेवणाची कल्पना देखील करू शकत नाही. कांदा, लसूण कितीही महाग झाला तरी आपल्या स्वयंपाकघरातील राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोघांना आपण अंतर देत नाही.

महाग असल्या तर खिशाला परवडतील अशा प्रमाणात आणुन आपण या गोष्टी खातो. हाच लसूण जो आपल्या जेवणाची आणि जिभेची चव वाढतो, तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. या लसणाचे अनेक उत्तम फायदे असून, हे आपल्या शरीराला विविध मोठ्या आजारांपासून वाचवण्यासाठी किंवा आपला आजार कमी करण्यासाठी आवश्यक आहेत.

Raw Garlic Health Benefits

अनेकांना कांदा आवडतो मात्र लसूण आवडत नाही. लसणाचे नाव ऐकले आणि अनेकांच्या कपाळावर आठ्या निर्माण होतात, मात्र हाच लसूण खूपच उत्तम आहे. आयुर्वेदात या लसणाच्या फायद्याबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आज आपण या लेखातून कच्चा लसूण खाल्ल्यास होणाऱ्या विविध फायद्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

लसूण हा गरम प्रकृतीचा असून, त्यात अनेक महत्वाचे पोषक घटक आढळतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे अनेक रोग आणि संक्रमणांचा धोका टळतो. यासोबतच लसणामध्ये कार्बोहायड्रेट, फॉस्फरस, फायबर, कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, बी ६, मॅगनीज, सेलेनियम आदी अनेक गुणधर्म आढळून येतात. जर आपण दररोज कच्चा लसूण खाल्ला तर रक्तदाब नियंत्रणात राहतो. शिवाय यासंबंधित विविध आजारांवर तो गुणकारी ठरतो.

निरोगी हृदयासाठी :
रोज सकाळी रिकाम्यापोटी कच्चा लसूण खाल्ला तर आपले हृदय निरोगी राहते. लसूण रक्त गोठण्यास मज्जाव करते त्यामुळे हृदयाचे काम सुरळीत चालते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

मजबूत पचनसंस्थेसाठी :
पचनसंस्थेसंबंधित तुम्हला कोणताही त्रास असेल तर तुम्ही रोज सकाळी कच्चा लसूण खा. यामुळे तुमचा त्रास नक्कीच कमी होईल. लसणामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असल्याने गॅस, ऍसिडिटी, अपचन, पोटदुखी आदी त्रास लसूण खाल्ल्याने कमी होऊ शकतात.

Raw Garlic Health Benefits

हे देखील वाचा : सौंदर्य कमी करणारे डार्क सर्कल ‘या’ उपायांनी करा कमी

शरीर डिटॉक्स करण्यासाठी :
असे सांगितले जाते की, आपल्या शरीराला मध्ये मध्ये डिटॉक्सीफाय करण्याची गरज असते. यासाठी लोकं अनेक महागडे उपाय आणि औषध घेतात. मात्र लसूण हा आपले शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सीफाय करतो. आपल्या शरीरातील सर्व घाण काढून यकृताचे कार्य सुधरवतो.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी :
आपली रोग प्रतिकारशक्ती चांगली असली तर आपण कोणत्याही आजाराशी सामना करू शकतो. ही रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील कच्चा लसूण उपयुक्त आहे. यात अँटी-ऑक्सिडंट्स आणि सल्फर आदी संयुगे आढळतात. ही संयुगे आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. त्यासाठी रोज २/३ लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्या पाहिजे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.