हिवाळा म्हटले की मुबलक भाज्या आणि अनेक प्रकारची फळे येण्याचा ऋतू. या ऋतूमध्ये अनेक ताज्या आणि चांगल्या भाज्या आणि फळे मिळतात. या ऋतूमध्ये आपण आहारातून, व्यायामामधून जी ऊर्जा मिळते ती वर्षभर टिकते. त्यामुळेच या ऋतूमध्ये उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भाज्या आणि फळं येतात त्यामुळे हे खाल्ले गेलेच पाहिजे असाच आपला प्रयत्न असला पाहिजे.
हिवाळ्यामध्ये येणारे अतिशय गोड आणि चांगले फळ म्हणजे चिकू. हिवाळ्यात चिकूचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. थंड गुणधर्म असूनही हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणून चिकूला ओळखले जाते. काही जण चिकूचा ज्यूस, चिकूची बर्फी किंवा सुका चिकू मेवा म्हणूनही खातात. चिकू हे गोड आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. चिकू खायला चवदार तर असतोच शिवाय पचायलाही सोपा असतो. हिवाळ्यात तर तुमच्या आहारात या फळांचा समावेश अतिशय फायदेशीर ठरतो.
– चिकूतील कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील लोहाचं प्रमाण संतुलित ठेवतं. त्यामुळे हाडांना मजबुती मिळते.
– डोळ्यांसाठी चिकू खाणे फायदेशीर असते. दृष्टी चांगली होते. यासोबत चिकूतील पोषक तत्व शरीरातील अनेक इन्फेक्शन होण्यापासून दूर ठेवतात.
– अपचनाची अथवा गॅसची समस्या असेल तर आवर्जुन चिकूचं सेवन करा.पित्तनाशक गुणधर्म असल्याने जेवणानंतर हे फळ खाल्ले जाते. तसेच हृदयासंबंधी आजारापासून संरक्षण करते.
– थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त लोकांना सर्दीच्या समस्या उद्भवतात. चिकू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो. याने लगेच आराम मिळतो. हे फळ थंड असल्याने याने सर्दी वाढते असा अनेकांचा गैरसमज आहे. या फळामुळे सर्दी बरी होते.
– चिकूमध्ये टॅनिनचे प्रमाण अधिक असते. हे अॅंटि-इंफ्लामेटरी एजंटसारखे काम करते. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडित समस्या दूर होते. त्यामुळे यापुढे कधी पोटाची समस्या झाली तर चिकू खायला विसरू नका.
– फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या फळांनी पचनक्रिया चांगली होते. याने आतडेही चांगले राहते. चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते, ज्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारची औषधे तयार करण्यासाठी केला जातो. तसेच चिकू खाल्ल्याने पोटाची समस्याही दूर होते.
– चिकू खाल्ल्याने लहान मुलांना ताकद तर मिळतेच पण मानसिक ताण कमी होतो असेही समजले जाते. याशिवाय झोपही शांत लागते. अशक्तपणा ज्यांना आहे अशा व्यक्तींनी तर केळ चिकू सारखे पदार्थ खाणं गरजेचं आहे.
– छातीत आणि पोटात जळजळल्यासारखे होते. मात्र त्यावर आराम मिळवायचा असेल तर चिकू अतिशय उपयुक्त ठरतो.
– चिकूमध्ये मॅग्नेशियम, मॅगनीज, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय, चिकूमध्ये व्हिटॅमिन बी, सी, ई आणि कॅल्शियमही असते जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
– चिकूमध्ये लोह आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात हाडांच्या आरोग्यासाठी चिकू खाणे उपयुक्त ठरते.
– चिकूमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्याने रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हे फळ लाभदायक ठरते.
– चिकूमध्ये असलेले एस्कॉर्बिक अॅसिड, फ्लेवोनोइड्स, आणि पॉलीफेनोल्स सारखे अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी फायदेशीर असतात. व्हिटॅमिन सीमुळे त्वचेला तजेलदारपणा येतो आणि ती निरोगी राहते.