Home » कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या मुळ्याच्या पानांचे गुणकारी फायदे

कचरा म्हणून फेकण्यात येणाऱ्या मुळ्याच्या पानांचे गुणकारी फायदे

by Jyotsna Kulkarni
0 comment
Radish Leaves
Share

भारतामध्ये भाज्यांशिवाय लोकांचा एक दिवशी जात नाही. रोज वेगवेगळी भाजी प्रत्येकालाच हवी असते. मात्र भाज्यांचे पर्याय जर भरपूर असले तरी त्या सर्व भाज्या प्रत्येकालाच आवडता असे नाही. सगळ्याच भाज्या खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले समजले जाते. मात्र प्रत्येकाला एखादी भाजी तरी आवडत नाही. जर आपण पाहिले तर लक्षात येईल की अनेकांना ज्या भाज्या आवडत नाही त्याच सर्वात जास्त पौष्टिक असतात. मग अशा वेळेस आपल्याकडे अनेकदा त्या भाज्यांचे पराठे, कटलेट असे करून न आवडणाऱ्या भाज्या लपवून खाऊ घातल्या जातात.

मुळा ही अशीच जरा न आवडणाऱ्या भाजीच्या कॅटगिरीमधली भाजी. बहुतकरून मुळा म्हटले की लोकांचे तोंड वाकडे होते. कपाळावर आठ्या येतात. तरीही मुळ्याचे पराठे हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे.

हाच मुळा आपण जेव्हा घरात आणतो तेव्हा त्याच्यासोबत पाला देखील असतो मात्र आपण घरी आणतानाच पाला आणत नाही किंवा पाला आला जरी तरी तो घरी आल्यावर फेकून फक्त मुळा वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का मुळ्याचा हा पाला अतिशय गुणवर्धक आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. हा पाला खाल्ल्यामुळे अनेक लाभ होतात. ज्यांना याचे फायदे माहिती ते लोकं या पाल्याचे विविध पदार्थ करून खातात. आज आपण याच पाल्याचे काय काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

– मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही अनेक फायदा होतात.

– मुळा किंवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते. त्यामुळे त्वचा चांगली पाहिजे असेल तर आजच मुळ्याची पाने आपल्या आहारात समाविष्ट करा.

– मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करते. त्यामुळे मुळा रोज आपल्या जेवणात असणं आवश्यक आहे. मुळ्याच्या भाजीसोबत मुळ्याची भजी आणि कोशिंबीर देखील खाऊ शकता.

– यामध्ये आर्यन, फॉस्फोरस असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढते आणि कमजोरी दूर होते. अशक्तपणा कमी करण्यासाठी मुळ्याची भरपूर मदत होते.

– यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. जे युरिनसंबंधीत प्रॉब्लम दूर करण्यात इफेक्टिव्ह आहे. भरपूर पाणी पिण्याबरोबरच मुळा देखील फायदेशीर आहे.

– मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

– मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे शरिराला संसर्गापासून वाचवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.

– मुळ्याच्या पानांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामध्ये ग्लुकोसिनोलेट्स आणि आयसोथिओसायनेट्स सारखी संयुगे आढळतात, जी इन्सुलिनच्या पातळीत संतुलन राखतात.

– कमी कॅलरी आणि जास्त फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी मुळ्याची पाने उत्तम पर्याय आहेत. हे भूक नियंत्रित करते आणि तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते.

– मुळ्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. जो हाडांना मजबूत बनवतात. यामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्या दूर राहण्यास मदत होते.

– मुळ्याच्या पानांमध्ये काही कमी प्रभावाचे विषारी गुणधर्म असतात, जे शरीरातील घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि त्वचा बरीच उजळते.

– अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लामेटरी गुणांनी समृद्ध मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने यूरिक अॅसिडच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. मुळ्याची पाने खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. ज्यामुळे यूरिक अॅसिडची समस्या कमी होते.

– फायबरने समृद्ध मुळ्याच्या पानांचे सेवन केल्याने मूळव्याधच्या समस्येपासून आराम मिळतो. हे खाल्ल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते. मुळव्याधवर घरगुती उपाय म्हणून वाळलेल्या मुळ्याच्या पानांचे चूर्ण सम प्रमाणात साखर आणि पाण्यात मिसळून सेवन केल्यास फायदा होतो.

मुळ्याच्या पानांपासून भाजी किंवा पराठे बनवता येतात. याशिवाय या पानांचा वापर सूपमध्ये देखील करता येतो. काही लोकं या पानांचा रस तयार करून देखील पितात. तर काही लोकं ही पाने सॅलडमध्ये देखील खातात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.