फळं खाणे नेहमीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक मानले गेले आहे. अनेकदा तर डॉक्टर एक दोनदा जेवणापेक्षा एक वेळेस बहुतकरून रात्री केवळ फळं खाल्ली तरी चालतील असा सल्ला देखील देतात. फळं आपल्या आरोग्याला नीट ठेवण्यामध्ये मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे कायमच फळांचे सेवन मनुष्यासाठी लाभदायक मानले गेले आहे. सुदैवाने भारत हा विविध उत्कृष्ट फाळणी समृद्ध असा देश आहे. भारतात बाराही महिने विविध प्रकारची उत्तम फळं मिळतात. याच फळांचे महत्त्व सगळ्यांनाच माहित असल्याने भारतातील लोकांच्या घरात भरपूर फळं पाहायला मिळतात. याच फळांपैकी एक महत्त्वाचे फळ म्हणजे पेरू. (Health)
बहुतकरून हिवाळ्यामध्ये पेरू बाजारात जास्त दिसायला लागतात. बाहेरून पिवळसर हिरवा आणि आतून पांढरा, गुलाबी रंगाचा गोड रसाळ पेरू सगळ्यांच्याच आवडीचे फळ आहे. विशेष म्हणजे पेरूचे झाड उष्ण भागात वाढते आणि त्याची फळे पावसाळ्यात आणि थंडीच्या काळात येतात. पेरू हे खूप कमी कॅलरी आणि उच्च पौष्टिक घनता असलेले फळ आहे. त्यात फॅट फारच कमी असते. यामध्ये प्रामुख्याने कार्ब आणि फायबर असतात. पेरूची खास गोष्ट म्हणजे चवीला गोड असूनही त्यात व्हिटॅमिन सी भरपूर असते. फक्त १०० ग्रॅम पेरू ३८०% व्हिटॅमिन सी पुरवतो. याशिवाय यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी महत्त्वपूर्ण खनिजे देखील असतात. नियमित पेरू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. कोणते ते जाणून घेऊया. (Guava Benefits)
– पेरू हा व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. व्हिटॅमिन सी स्किन साठी चांगले मानले जाते. हे व्हिटॅमिन आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते. पेरूमध्ये फायबरचे प्रमाण पण चांगले असते. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचन चांगले होते. पेरूमध्ये फायबर जास्त आणि कॅलरी कमी त्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहतं. (Marathi News)
– पेरू शरीराच्या बहुतांश समस्या दूर करतो, त्यात व्हिटॅमिन B1, B3, B6 असते. याबरोबरच पेरूमध्ये हेल्दी मिनरल्स, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या फळामध्ये कर्बोदके कमी असतात. हे खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात. अनेकांना बद्धकोष्ठतेची तक्रार असते त्यामुळे हे फळ पोट साफ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Todays Marathi Headline)

– मधुमेहात अनेक पथ्य सांगितली जातात. पेरू मधुमेहासाठी चांगलं फळ आहे. पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तुम्ही जर मधुमेहाचे रुग्ण असाल तर हे फळ नक्की खा. (Marathi News)
– पेरूमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी इतकंच नव्हे तर पोटॅशियम सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं, पोटॅशियमने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. पेरू डोळ्यांसाठी चांगला असतो. यात व्हिटॅमिन ए देखील असतं. (Latest Marathi Headline)
– मेंदूचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्त्वे पेरूमध्ये आढळतात. त्यात व्हिटॅमिन बी 3 आणि व्हिटॅमिन बी 6 असते जे मेंदूमध्ये रक्त परिसंचरण सुधारतात आणि तुमच्या मज्जातंतूंना आराम देतात. (Top Marathi News)
– पेरूमध्ये कॉपर असते जे हार्मोन्सचे उत्पादन आणि शोषणासाठी आवश्यक असते. हे आपल्या थायरॉईड ग्रंथीला चांगले कार्य करण्यास मदत करते. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवतात. जेणेकरून आपण तरुण दिसू लागतो. पेरू खाल्ल्याने वृद्धत्व चेहऱ्यावर लवकर दिसत नाही. (Top Trending Headline)
– पेरूमध्ये लाइकोपीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. अँटिऑक्सिडंट्समुळे ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून सुरक्षित राहतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांचा धोका कमी होतो. (Top Stories)
========
Amla : हिवाळ्यात दररोज आवळा खाल्ल्याने होतील ‘हे’ मोठे लाभ
Skin Care : थंडीच्या दिवसात ‘हे’ घरगुती उपाय करून घ्या त्वचेची काळजी
========
– पेरू खाल्ल्यामुळे आपले चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होते. पेरू खाल्ल्यामुळे रक्तवाहिन्यांना इजा देखील होत नाही आणि आपल्या रक्तवाहिन्या निरोगी देखील राहण्यास मदत होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचा धोका देखील निर्माण होत नाही. त्यामुळे पेरू खाणं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. (Top Trending News)
– आम्लपित्तमध्ये पेरू पेरू खाल्ल्यानं गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो. कारण पेरू हे देखील आम्लयुक्त प्रकृतीचे फळ आहे. त्यामुळे पेरू खाल्ल्याने वात निघणे सोपे होते आणि वात संतुलित राहतो. मूळव्याधीमध्ये रिकाम्या पोटी पेरू खाणं मूळव्याधीच्या बाबतीत खूप फायदेशीर आहे. (Social News)
(टीप : वरील सर्व माहिती आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
 
			         
														