Home » Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला धडकी!

by Team Gajawaja
0 comment
Operation Sindoor
Share

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून एकच मागणी होती – पाकिस्तानला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत धडा शिकवला जावा. आणि पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर, भारत सरकारने बदला पूर्ण केला आहे. रात्रीच्या अंधारात भारतीय वायुसेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर जोरदार एअर स्ट्राईक केलं. भारताच्या या धाडसी कारवाईने, पाकिस्तानची झोप उडवली, या एअर स्ट्राईक मिशनच नाव होतं, ऑपरेशन सिंदूर. या ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती जाणून घेऊ. (Operation Sindoor)

७ मे च्या मध्यरात्री १:३० ते २:०० च्या दरम्यान, भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सिंदूरची सुरुवात केली. या अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय वायुसेनेने या हल्ल्यात राफेल आणि सुखोई सु-३० या लढाऊ विमानांमधून ‘हॅमर’ बॉम्ब आणि ‘स्कॅल्प’ क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला, हा हल्ला बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुजफराबाद! या ठिकाणी झाला. हे सगळे तळ ‘लष्कर-ए-तय्यबा’ आणि ‘जैश-ए-मोहम्मद’सारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे होते, इथूनच भारतावर हल्ल्यांचं नियोजन व्हायचं आणि हल्ले घडवून आणले जायचे. (Operation Sindoor News)

Operation Sindoor

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तपास केला आणि हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं स्पष्ट झालं. ऑपरेशनच्या तयारीसाठी काही आठवड्यांपासून गुप्त माहिती गोळा केली गेली. भारतीय गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’ने ही माहिती गोळा केली. आणि ७ मे च्या मध्यरात्री भारतीय वायुसेनेने भारताच्या हवाई हद्दीतूनच अचूक हल्ले केले. यामध्ये ब्रह्मोस मिसाईलचा वापर झाल्याची माहिती आहे, जी आपल्या ८०० किमी रेंजपर्यंतच्या टार्गेट वर हल्ला करण्यासाठी प्रसिद्ध आहे. एकूण २४ मिसाइल्स डागण्यात आल्याची माहिती आहे, ज्यांनी दहशतवादी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. एकूण २४ मिसाइल्स डागण्यात आल्याची माहिती आहे, ज्यांनी दहशतवादी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. हे सगळे हल्ले इतके वेगवान होते की पाकिस्तानला काही कळायच्या आताच हे हल्ले झाले. त्यांना संभाळायला ही वेळ मिळाला नाही. (Marathi Latest News)

जिथे हल्ले केले गेले त्या बद्दल बोलूया, तर बहालवलपुरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख नेता मसूद अझरचं मुख्यालय आणि त्याचा मदरसा येथे होता. इथे हल्ला करून ३० दहशतवादी ठार केले गेले आहेत. दुसरं ठिकाण मुरीदके हे लष्कर-ए-तय्यबाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र होतं. जे २०० एकर पसरलेलं होतं. २६/११ च्या मुंबई हल्ल्याचं नियोजन याच ठिकाणी झालं होतं. भारतीय वायुसेनेने येथील तळ नष्ट केला, ज्यामुळे लष्कर-ए-तय्यबाला मोठा धक्का बसला आहे. तिसरं ठिकाण कोटली जे पाकव्याप्त काश्मीरमध्ये येतं. हिजबुल मुजाहिदीन आणि इतर दहशतवादी संघटनांचे तळ येथे होते. चौथं ठिकाण मुजफ्फराबाद हिजबुल मुजाहिदीन आणि इतर दहशतवादी संघटनांचे तळ येथे होते. पाचवं गुलपूर हे ठिकाण तर loc पासून फक्त ३५ कीमी अंतरावर होतं. येथून दहशतवादी भारतात घुसखोरी करत होते. (Marathi Trending News)

Operation Sindoor

हा तळ नष्ट करण्यासाठी कामिकाझी ड्रोनचा वापर झाल्याची शक्यता आहे. सहावं ठिकाण होतं भिंबर, इथे जैश-ए-मोहम्मदचा लॉन्च पॅड होता, ज्याचा वापर दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी व्हायचा. हा तळही उद्ध्वस्त करण्यात आला. सातवं ठिकाण होतं चक अमरू हिजबुल मुजाहिदीनचं प्रशिक्षण तळ इथे होतं. आठवं आणि नववंं ठिकाण होतं बाग आणि सियालकोट या दोन्ही ठिकाणी लष्कर-ए-तय्यबा आणि हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख आणि प्रशिक्षण तळं होती. सियालकोट हे तर भारत पाकिस्तान बॉर्डरपासून १५ किमी अंतरावर आहे. या तळाला लक्ष्य करून दहशतवादी नेटवर्कला मोठं नुकसान पोहोचवलं गेलं आहे. (Marathi Top News)

हे ऑपरेशन इतकं अचूक होतं की एकाही पाकिस्तानी लष्करी ठिकाणाला धक्का लागला नाही. भारताने जाणीवपूर्वक संयम दाखवला, आणि फक्त दहशतवादी ठिकाणंच लक्ष्य केलं. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले, त्यापैकी जैश-ए-मोहम्मदचे ५० दहशतवादी आणि लष्कर-ए-तय्यबाचे अनेक टॉप कमांडर यांचा समावेश आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तानात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. लाहोर आणि सियालकोट विमानतळ ४८ तासांसाठी बंद करण्यात आले, आणि आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारतावर “कायरतापूर्ण हल्ला” केल्याचा आरोप करत युद्धाची धमकी दिली. (Social News)

Operation Sindoor

ऑपरेशननंतर पाकिस्तानी माध्यमांनी अनेक हास्यास्पद दावे केले, त्यापैकी एक म्हणजे पाकिस्तानने भारताची ५ लढाऊ विमानं पाडली आणि भारताने मशिदींवर हल्ले केले. पण यातलं काहीच खरं नाही. खरं तर भारताने दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं. पण पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर सीमेवर गोळीबार सुरू केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर भारतीय लष्कराने X वर ट्विट केलं, ‘जस्टिस इज सर्व्हड! जय हिंद!’ आणि खरंच त्या सर्वांना न्याय मिळालाय ज्यांनी पहलगाम हल्ल्यात आपला जीव गमावला. (Marathi News)

=======

हे देखील वाचा : Rafale : ‘ऑपरेशन सिंदूर’ला यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या राफेल विमानाची वैशिष्ट्ये

=======

या ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ ठेवण्यामागे symbolic अर्थ होता, पहलगाम हल्ल्यात अनेक विवाहित महिलांनी आपले पती गमावले होते, आणि त्यांच्या रक्ताने रंगलेल्या सिंदूराचा बदला घेण्याचं हे ऑपरेशन होतं. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने फक्त पहलगामचा हल्ल्याच्या बदला नाही घेतला, तर भारताने दहशतवाद्यांना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला स्पष्ट मेसेज दिलाय.. दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.