गुढीपाडवा….हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या सणापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार, चैत्र शुद्ध प्रतिपदेला, म्हणजेच वसंत ऋतुच्या पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. संपूर्ण भारतामध्ये खासकरून महाराष्ट्रामध्ये या सणाचे रूप काही औरच असते. हिंदू लोकांचा मोठा सण म्हणून गुढीपाडव्याला ओळखले जाते. या दिवशी घराबाहेर उंच अशी गुढी उभारली जाते. घराबाहेर उभारली जाणारी ही गुढी म्हणजे मांगल्याचे आणि विजयाचे प्रतीक. (Gudipadwa)
गुढी पाडवा या सणाचे अतिशय मोठे महत्व आहे. हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणून गुढी पाडवा सणाला ओळखले जाते. यावर्षी हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी २९ मार्च रोजी दुपारी ४:२७ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० मार्च रोजी दुपारी १२:४९ वाजता संपेल. त्यामुळे उदय तिथीला महत्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार ३० मार्च रोजी साजरा केला जाईल. (Gudipadwa 2025)
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो. मात्र तरी देखील या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत ज्यात गुढी उभारू शकतो. ब्रह्म मुहूर्त – पहाटे ०४:४१ पासून ते पहाटे ०५:२७ पर्यंत, विजय मुहूर्त – दुपारी ०२:३० पासून ते ०३:१९ पर्यंत, संध्याकाळची वेळ – संध्याकाळी ०६:३७ पासून ते ०७ पर्यंत, अभिजीत मुहूर्त – दुपारी १२:०१ पासून ते १२:५० पर्यंत या शुभ मुहूर्तांमध्ये गुढीपाडव्याची पूजा आणि गुढी उभारता येईल.(Top Marathi News)
==============
हे देखील वाचा : Srinagar : श्रीनगरचे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी होणार खुले
===============
आपण दरवर्षी गुढीपाडव्याचा सण साजरा करतो. मात्र तुम्हाला माहित आहे का की, हा सण आपण का साजरा करतो? यामागे काय कारण आहे? चला या लेखातून गुढीपाडव्याच्या संपूर्ण माहिती जाणून घेऊया. गुढी पाडवा या सणाचे आपल्या धर्मामध्ये अनेक अर्थाने महत्व सांगण्यात आले आहे. रामायणानुसार याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने सुग्रीवाचा भाऊ असलेल्या वालीचा वध केला आणि त्याच्या छळातून संपूर्ण प्रजेला मुक्त केले.(Marathi Latest News)
गुढीपाडव्याच्या दिवशी मिळालेला हा मोठा विजय म्हणजे, आसुरी शक्तींचा झालेला नाश. शिवाय याच दिवशी प्रभू श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास संपला. त्यामुळेच हा दिवस याच आनंदोत्सवाला सूचित करतो. गुढीपाडव्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला. अर्थात चैत्र-शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी विष्णूंच्या मत्स्यरूपाचा जन्म झाला.(Trending News)
आदिशक्ती देखील याच चैत्र-शुद्ध प्रतिपदेच्याच दिवशी प्रगत झाली असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसापासून चैत्र नवरात्र साजरी केली जाते. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.(Indian Festival News)
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहना राजाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाला समर्पित शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते.(Social News)
==============
हे देखील वाचा : Navratri : चैत्र नवरात्रीची तयारी !
===============
गुढी कशी उभारली जाते?
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. यासाठी काठीवर तांब्याचा लोटा उलटा ठेवून त्यावर लाल, पिवळे, भगवे रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते. गुढीपाडव्याला लोकं सूर्योदयाच्या वेळी अंगाला तेल लावून स्नान करतात. घराचा मुख्य दरवाजा आंब्यांच्या पानांचे आणि फुलांचे तोरण लावण्यात येते. रांगोळी काढली जाते. गुढी घराच्या बाहेर उभारली जाते. या दिवशी लोकं ब्रह्मदेवाची पूजा करतात आणि नंतर गुढी उभारतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते. यादिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे शालेय साहित्य, पाटी, वह्या, कोरे पुस्तके यांचे पूजन करावे.(GudhiPadwa Festival)
हिंदू संस्कृतीतील गुढीपाडवा हा सर्वात मोठा आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे. यादिवशी नवीन गोष्टी खरेदी करणे मंगलकार्य करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण मोठी खरेदी करतात. खासकरून गाडी, घर, सोनं आदी गोष्टींच्या खरेदीसाठी या दिवसाला प्राधान्य देतात.