आपल्या सगळ्यांनाच लहान मुलं खूपच आवडत असतात. निरागस, गोड, लाघवी, प्रेमळ आदी अनेक उपमा त्यांना पुरेपूर लागू होतात. लहान मुलांसोबत वेळ घालवणे, त्यांच्या विविध डेव्हलपमेंट बघणे, त्यांना नवनवीन चांगल्या गोष्टी शिकवणे यासारखे दुसरे सुख नसते. जेव्हा आपले बाळ त्याच्या वयानुसार वेगवेगळ्या गोष्टी अचिव्ह करतो तेव्हा होणारा आनंद शब्दात व्यक्त न होणारा आहे. बाळ झाल्यानंतर प्रत्येक जणं आपल्या बाळाच्या विविध विकासाची स्वप्ने बघतात. तो क्षण, ती वेळ डोळयात साठवताना कॅमेऱ्यात देखील कैद केली जाते एक आठवण म्हणून. (Marathi News)
मात्र सर्वच मुलांचा विकास हा ठरलेल्या वेळेनुसार होतो असे नाही. काही मुलांचा विकास हा थोडा मागेपुढे देखील होतो. मात्र यात असे देखील मुलं असतात, ज्यांचा विकास बराच काळा जाऊनही योग्य पद्धतीने होत नाही. तेव्हा मात्र काळजीचे कारण असते. अनेकदा लहान मुलांना ऑटिझम हा आजार होण्याची देखील शक्यता असते. आजच्या आधुनिक काळात मुलं टीव्ही आणि मोबाईलच्या आहारी गेले आहेत. पालक देखील आपले काम होते म्हणून मुलांना टीव्ही, मोबाईल लावून देताना दिसतात. याचेच दुष्परिणाम मुलांमध्ये हळूहळू दिसू लागतात. ऑटिझम हा त्याचाच एक दुष्परिणाम आहे. मग ऑटिझम म्हणजे काय? ऑटिझम झाला म्हणजे नक्की काय होते? ऑटिझमचे लक्षणं कोणते, त्यावर उपचार कोणते? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)
ऑटिझम म्हणजे काय?
ऑटिझम ही एक न्यूरोलॉजिकल अवस्था आहे, जी आयुष्यभर राहते. ही मुलं सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात. हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार १-३ वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मुलं कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात. ऑटिझमला स्वमग्नता देखील म्हटले जाते. हा एक प्रकारचा मनोविकार आहे. याचे पूर्ण नाव ‘सायकोन्यूरोलॉजिकल डेव्हलपमेंटल डिसऑर्डर’ असे आहे. ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (एएसडी) असलेल्या व्यक्तींना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. (Top Marathi News)
ऑटिझमची लक्षणे
* मुले इतरांशी पटकन नजर मिळवत नाहीत.
* ते त्यांच्याच विश्वात हरवलेले असतात.
* भाषा शिकण्यात अडथळे निर्माण होतात.
* कोणाचा आवाज ऐकून प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत.
* सामान्य मुलांपेक्षा ही मुलं वेगळी दिसू लागतात.
* जर तुमचे मूल नऊ महिन्यांचे असेल. आणि हसत नसेल किंवा नीट लक्ष देत नसेल तर ही ऑटिझमची लक्षणं असू शकतात.
* प्रखर उजेड किंवा गोंगाटाचा त्यांना वाजवीहून जास्त त्रास होऊ शकतो, अशा स्थितीत त्यांना अस्वस्थ वाटतं
* गोष्टी समजण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो
* काही गोष्टी ते वारंवार करतात किंवा एकच विचार वारंवार करतात.
* सतत शब्द किंवा शारीरीक हालचालींद्वारे भावना व्यक्त करण्यात अडचण येणे, लक्ष केंद्रीत करण्यास समस्या येणे.
* काही चवी, वास किंवा आवाज न आवडल्यास एकदम अस्वस्थ होणे.
ऑटिझमचा उपचार
ऑटिझमवर अजून कोणताही प्रभावी उपचार उपलब्ध झालेला नाही. ऑटिझम असलेल्या मुलाची स्थिती पाहून त्यावर कोणते उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. ऑटिझमवर विविध प्रकारच्या थेरपी करून नियंत्रण मिळवता येऊ शकते. यामध्ये बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी इत्यादी थेरपी उपचार केले जातात. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. (Latest Marathi Hadline)
==========
हे देखील वाचा :
Health : भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे
Coconut Water : आरोग्याच्या दृष्टीने अमृतासमान आहे नारळ पाणी
============
ऑटिझम असलेल्या मुलांशी कसे वागावे?
ऑटिझमची लक्षणे दिसू लागल्यानंतर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. या मुलाशी कायम चांगले वागा. या मुलांना खेळण्यासाठी साधी खेळणी द्यावी. सामान्य मुलांशी या मुलांची तुलना करू नका. या मुलांची नेहमी नवीन लोकांशी ओळख करून द्या. या मुलांना मैदानी खेळ खेळायला लावा. त्यांना मोबाईल आणि टीव्हीपासून लांब ठेवा. विविध फोटोंद्वारे मुलांना गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. या मुलांच्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबानी हा आजार झाल्याचे स्वीकारावे आणि साकारत्मकतेने उपचार करण्यास सुरुवात करावी. या मुलांना कायम व्यस्त ठेवा, त्यांना टेरेसवर किंवा इमारतीच्या आवारात फिरायला घ्या. या मुलांना केवळ आपले प्रेम आणि समर्थनाची आवश्यकता आहे. हा आजार बरा नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे आपण सकारात्मक राहून मुलांना पाठिंबा द्या. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics