Home » Temple : वर्षातले केवळ काही महिनेच होते ‘या’ ऐतिहासिक मंदिराचे दर्शन

Temple : वर्षातले केवळ काही महिनेच होते ‘या’ ऐतिहासिक मंदिराचे दर्शन

by Jyotsna Kulkarni
0 comment
Temple
Share

आजवर आपण अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांबद्दल ऐकले, वाचले, पाहिले असेल. कोणत्या मंदिराचे बांधकाम चांगले, कोणत्या मंदिराची मूर्ती खास, कोणत्या मंदिराची मान्यता वेगळी आदी अगणिक अशी मंदिरं भारतात आहे. मात्र आज आम्ही तुम्हला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जे मंदिरं भाविकांना वर्षातले काही महिनेच बघता येते, नंतर ते पाण्याखाली जाते.(Temple)

महाराष्ट्रात अनेक वैविध्यपूर्ण, ऐतिहासिक मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. यातलेच एक मंदिर म्हणजे पुण्यातील वाघेश्वर मंदिर. वर्षातले जवळपास ८ ते ९ महिने हे मंदिर पाण्याखाली असते आणि केवळ ३ ते ४ महिनेच भाविकांना या मंदिराचे दर्शन घेता येते. मग असे काय होते की हे मंदिर पाण्याखाली जाते? आणि मग पाण्याबाहेर कसे येते? कुठे आहे हे असे चमत्कारिक मंदिर? चला आपण या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.(Wagheshwar Temple)

हे ऐतिहासिक वाघेश्वर मंदिर पुण्यातील पवना धरणाच्या आत बांधलेले आहे. यामुळे वाघेश्वर मंदिर ८ महिने पाण्यात बुडलेलं असतं, तर फक्त ४ महिने पाण्याबाहेर असतं. हे अनोखे मंदिर पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं उन्हाळ्यात या धरण परिसरात येतात. वाघेश्वर मंदिर ७०० ते ८०० वर्ष जुनं असून, या मंदिराचा संबंध शिवाजी महाराजांशी देखील आहे. हे संपूर्ण मंदिर हेमाडपंथी शैलीत दगडांनी बनवलेलं आहे. (Social News)

Temple

माहितीनुसार, पवना धरण १९६५ मध्ये बांधण्यात आले होते. सन १९७१ पासून ते वापरण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून हे ऐतिहासिक मंदिर पाण्यात बुडाले. पवना धरणाच्या आवारात बांधलेले हे मंदिर उन्हाळ्यात तीन, चार महिनेच पाणी ओसरल्यावर दिसते. संशोधकांच्या सांगण्यानुसार या मंदिराचे बांधकाम ११ किंवा १२व्या शतकात करण्यात आले असावे. याचे कारण म्हणजे मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत. (Marathi Top Stories)

या मंदिराचे बांधकाम ६० बाय ४० फूट एवढे मोठे होते. तर त्या मंदिराचा गाभारा १५ बाय २० फूट एवढा मोठो होता. मंदिराचे पूर्ण बांधकाम हे दगडामध्ये होते. सद्य:स्थितीला या मंदिराचा फक्त गाभारा शिल्लक राहिला असून, तो ही आता कोसळू लागला आहे. या मंदिराभोवती एक नीळकमल तळेदेखील होते, असे नागरिकांनी सांगितले.(Marathi Latest News)

========

हे देखील वाचा : Statue Of Liberty : अमेरिकेची ओळखच पुसली जाणार !

========

या वाघेश्वर मंदिरात काही पुरातन शिलालेखही इतिहासकारांना सापडले आहेत. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं असून, मात्र आता या मंदिराचा फक्त ढाचाच उरला आहे. मंदिर शेकडो वर्ष जुने असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. तर,बाजूच्या भिंतीचे देखील आता फक्त काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. या मंदिराचा कळस पडला आहे. फक्त गाभारा सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. या मंदिराच्या चारही बाजूने भिंतींना भेगा पडल्या आहेत.(Marathi Trending News)

Temple

जाणकारांच्या माहितीनुसार या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही संबंध आहे. कोकण-सिंधुदुर्गची मोहिम यशस्वीरीत्या फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज याच वाघेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. छत्रपती शिवाजी महाराज तिकोणा आणि कठीणगड (तुंग) किल्यावर आले, की या मंदिरात दर्शनाला यायचे. मंदिराचा कळस उद्ध्वस्त झाला असून केवळ सभामंडप जरा स्थितीत आहे. या मंदिराभोवती सर्वत्र भेगा पडल्या आहेत.  या ऐतिहासिक मंदिराचे पुरातत्व विभागाने संरक्षण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.(Hindu Temple)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.