Home » Nagpanchami : नागपंचमीच्या दिवसाला आहे अलौकिक इतिहास जाणून घ्या त्याबद्दल

Nagpanchami : नागपंचमीच्या दिवसाला आहे अलौकिक इतिहास जाणून घ्या त्याबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Nagpanchami
Share

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी या तिथीला येतो. श्रावणातील पहिला सण असलेल्या नागपंचमीच्या महत्व मोठे आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवाला समर्पित असलेला महिना. या महिण्याची सुरुवात नागपंचमीच्या होते. भगवान शंकरांना प्रिय असलेल्या नागाची जर आपण या दिवशी मनोभावे पूजा केली तर भगवान शिव प्रसन्न होतात. शिवाय आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला उदंड निरोगी आयुष्य लाभते आणि आर्थिक सुबत्ता येते. नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन केले जाते. या पूजनामुळे कालसर्प दोष देखील नाहीसा होतो अशी मान्यता आहे. (Nagpanchmi NEws)

भगवान विष्णू नागाच्याच शय्येवर विराजमान असतात तर शिव शंकर नागाला परिधान करतात. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी आपण नागोबाची पूजा केली तर भगवान विष्णू आणि शंकर या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो. नाग देवतेचे पूजन केल्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होण्याचे संकट टळते. नागपंचमी या सणाला मोठा इतिहास आहे. हा सण अनेक युगांपासून साजरा करण्याची पद्धत आहे. शिवाय या दिवशी इतिहासामध्ये अनेक मोठ्या आणि अविस्मरणीय घटना घडल्या आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

कालियामर्दन
भगवान श्रीकृष्णाने कालिया नावाच्या सर्पाचा पराभव केला. कालिया यमुनेच्या डोहात राहत होता. यमुनावासियांना त्रास देण्यासाठी तो यमुनेच्या डोहात विष कालवीत असे. यमुनेचे पाणी विषारी झाल्याने लोकांचे हाल होत होते. त्याला हाकलून देऊन , यमुनेचे पाणी सर्वाना पिण्यासाठी स्वच्छ करावे म्हणून श्रीकृष्ण एकटाच कालियाचा पराभव करायला निघाला. यमुनेच्या डोहात श्रीकृष्ण आणि कालिया नागाचे युद्ध झाले. (Nagpanchami History)

 

Nagpanchami

श्रीकृष्णाने कालियाच्या डोक्यावर नृत्य करू लागला. कालिया कासावीस झाला. त्याची बायका, मुले घाबरली आणि कालियासाठी जीवदान मागू लागली. अखेर आपल्या सर्व परिवारासह तेथून निघून जाण्याचे व पुन्हा कधीही ब्रजवासियांना त्रास न देण्याच्या अटीवर कृष्णाने त्याला सोडले.

कालियाने यमुनेतील सर्व विष शोषून घेतले. भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन, त्याला वरदान दिले की त्याच्या या कर्तृत्वासाठी श्रावण शुक्ल पंचमीला नागपंचमीचा सण साजरा केला जाईल आणि नागांची पूजा केली जाईल. दरम्यान असे ही सांगितले जाते की, ज्या दिवशी श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता आणि तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते.

=========

हे देखील वाचा : Nagpanchami : श्रावण महिन्याच्या पंचमी तिथीला साजरी होणारी ‘नागपंचमी’

=========

महाभारत
नागपूजा महाभारताच्या काळापासून सुरु आहे. महाभारतात नागपूजे संदर्भात काही महत्त्वाच्या नोंदी आहेत. आर्य लोक भारतात आले. त्यांनी गंगा, यमुना नदीच्या खोऱ्यात वस्ती केली. कालांतराने तो भाग अपुरा पडायला लागल्यावर ते पूर्व भागाकडे सरकू लागले. तेथे त्यांच्या ही पूर्वी वस्ती केलेले लोक होते. ते नागवंशाचे लोक होते. (Marathi )

आपल्या प्रांतावर हे आर्य लोक आक्रमण करीत आहेत, हे पाहिल्यावर त्यांनी विरोध केला. त्यांच्यात युद्धे होऊ लागली. एकदा नागराज तक्षक याने आर्यांचा राजा परिक्षित याचा वध केला. यामुळे त्याचा मुलगा जन्मेजय भयंकर संतापला. त्याने आपल्या पित्याचा सूड घ्यायचे ठरविले आणि नाग लोकांना मारण्याचा सपाटा लावला. (Marathi Latest NEws)

Nagpanchami

यज्ञात समिधा जशा जळून भस्म होतात, तसे नाग लोक जन्मेजयाच्या क्रोधाग्नीत नाहीसे होऊ लागले. यांचा हा संघर्ष शेवटी आस्तिक ऋषींनी मिटवला. आस्तिक ऋषी दोन्ही बाजूंशी संबंधित होते. त्यांचे वडील आर्य होते आणि माता नागवंशी होती. मात-पिता या दोघांचीही नावे ‘जरत्कारू’ अशीच होती. आर्य आणि नागवंश यांच्या विवाह व्हावा, एवढे ते एकमेकांच्या सहवासात आले होते. महाभारत काळात असे विवाह होतही होते. (Top Headline In Marathi)

अर्जुनाचा विवाह नागकन्या उलुपीशी झाला होता. हे नाग लोक सुधारलेले होते, शूर होते, कलारसिक होते. त्यांचे नगर-रचना-कौशल्यही वाखाणण्यासारखे होते. तेव्हा अशा प्रगत वंशाशी चाललेला संघर्ष आस्तिक ऋषींनी संपविला. त्यांच्यात ऐक्य निर्माण केले. शेवटी ते नागलोक आर्यांत मिसळून गेले आणि कदाचित या ऐक्याप्रीत्यर्थ, आनंदाप्रीत्यर्थ हा सण नागपूजा म्हणून आर्यांच्या सणात घेतला गेला असावा, असे सांगितले जाते. (Marathi Top HEadline)

महिलांचा भाऊ म्हणून नागांची पूजा
पाच युगांपूर्वी सत्येश्‍वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्‍वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्‍वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्‍वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी ‘भाऊ म्हणून पूजा करील’, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नाग देवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते. (Top Headline)

समुद्रमंथनातील नागांचे योगदान
नागपंचमीसंदर्भात एक कथा अशी सांगतिली जाते, जेव्हा समुद्रमंथन झाले त्यावेळी वासुकी नागाचा उपयोग दोरीसारखा करण्यात आला होता. देवतांनी वासुकी नागाची शेपटी धरली, तर राक्षसांनी त्याचे तोंड धरले. मंथनाच्या वेळी पहिले विष बाहेर पडले जे भगवान शिवाने ते हलाल प्राशन करून संपूर्ण जगाचे रक्षण केले. यानंतर बाहेर आलेले अमृत देवांनी घेतले. श्रावण शुक्ल पंचमी तिथीला ही घटना घडली. समुद्रमंथनात सापांचे मोठे योगदान होते ते लक्षात ठेवण्यासाठी नागपंचमी सण म्हणून साजरा केला जाऊ लागला असे ही सांगितले जाते. (Top Trending News)

Nagpanchami

शिवाय सागरमंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला साहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले. त्यांनीही हलाहलाचा अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी ‘मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागांची पूजा करेल’, असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून नऊ नाग मनुष्याला पूजनीय झाले. नऊ नाग हे नऊ प्रकारची पवित्रके (चैतन्यलहरी) ग्रहण करणारे घटक आहेत. (Marathi News)

नागपंचमीची कथा
आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला. (Top Marathi News)

तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली. (Top Marathi HEadline)

तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. (Latest Marathi News)

Nagpanchami

मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस ? तुझे आई-बाप कोठे आहेत ? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले. (Top Stories)

ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही. तिने मुलीला सारी हकिकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले.ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली. तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली. सगळयांना आनंद झाला. (Social News)

=========

हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?

 Deep Amavasya : ‘तिमिरातुनी तेजाकडे’ जाण्याचा संदेश देणारी दीप अमावस्या

=========

तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेंव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला. जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.