आपल्या भारतामध्ये लहान मोठी अशी असंख्य शहरं आहेत, आणि प्रत्येक शहराची आपली एक स्वतःची वेगळी ओळख असते. आपल्या देशातील प्रत्येक राज्याची आणि प्रत्येक शहराची एक वेगळी संस्कृती आहे. जसे की, शिक्षणाचे माहेरघर पुणे, वाईन कॅपिटल नाशिक, ऑरेंज सिटी नागपूर आदी. तुम्हाला माहित आहे का…? भारतमध्ये एक असे शहर आहे, ज्याची ओळख ब्लू सिटी म्हणून आहे. एकूण आश्चर्य वाटले ना…? मात्र हो हे खरे आहे. एक असे शहर आहे, ज्याला ‘ब्लू सिटी ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया याच शहराबद्दल.(India)
भारतातील राजस्थान हे अतिशय सुंदर आणि संस्कृतीप्रधान असे राज्य आहे. याच राज्यातील जोधपूर या शहराला ब्लू सिटी ऑफ इंडिया असे म्हटले जाते. अतिशय आकर्षक असलेल्या या शहराने आजही आपली परंपरा कायम ठेवली आहे. जोधपूर म्हटले की लगेच आठवते ते इथले चविष्ट पदार्थ, मारवाडी भाषा, ऐतिहासिक वारसा, राजेशाही आणि अनेक पर्यटन स्थळं. ब्लू सिटी ही याच शहराची एक वेगळी ओळख आहे. का या शहराला हे नाव पडले जाऊन घेऊया.(Blue City)
जोधपूर हे शहर सौंदर्याने बहरलेलं आहे. खासकरून सकाळी आणि सायंकाळी हे शहर निळ्याशार रंगाने नटलेलं दिसतं. पिंक सिटी असलेले जयपूर आणि ब्लू सिटी असलेले जोधपूर हे दोन्ही शहरं राजस्थानमध्ये आहेत. जोधपूर शहर त्याच्या रंगामुळे खूप लोकप्रिय आहे. सकाळी आणि सायंकाळी या शहराचं सौंदर्य काही औरच असते. सू्र्योदय आणि सूर्यास्तच्या वेळी हे शहर सौंदर्यात अक्षरशः न्हाहून निघते. जोधपूरला ‘सूर्यनगरी’ नावाने देखील ओळखलं जातं. कारण देशातील इतर भागांच्या तुलनेत सूर्य याठिकाणी जास्त काळ राहतो. (Marathi Latest News)
ब्लू सिटी का म्हणतात?
पूर्वी जोधपूरमधील ब्राह्मण समाजातील लोकं आपली घरे निळ्या रंगात रंगवायचे. यामुळे त्यांची घरं इतर जातींतील लोकांच्या घरापेक्षा वेगळे दिसतील आणि ओळखता येतील. हळूहळू ही परंपरा संपूर्ण शहरात पसरली आणि आता संपूर्ण जोधपूर शहर निळ्या रंगात आहे. यासोबतच अजून एक कारण म्हणजे राजस्थान हे उष्ण राज्य असून जोधपूरचे तापमान खूप जास्त असते. अशातच निळा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करून घरं थंड ठेवतो. यामुळेच येथील लोकांना आपल्या घरांना निळा रंग लावणे पसंत पडते. जुन्या समजुतीनुसार, डास आणि इतर कीटकांना घरापासून दूर ठेवण्यासाठी भिंतींवर निळ्या रंगाचा वापर केला जात असे. त्यामुळे ही परंपरा अधिक दृढ झाली. मुख्य म्हणजे निळ्या रंगामुळे अगदी दूरवरून पाहिल्यावर देखील हे शहर दिसून येते.(Top Marathi Stories)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
=======
मेहरानगड किल्ल्यावरून हे संपूर्ण शहर जणू निळाशार समुद्र असल्याचाच भास होतो. हे दृश्य इतके विलोभनीय असते की हे बघण्यासाठी खास देशविदेशातून पर्यटक जोधपूरमध्ये येतात. सूर्यास्ताची केशरी किरणे या निळ्या भिंतींवर टेकतात तेव्हाचे दृश्य तर नेत्रदीपक असते. निळ्या शहराच्या नावाने ओळखणारं हे सुंदर शहर जवळपास ५५८ वर्षांपूर्वी पहिल्यांदा राव जोधा यांनी बांधलं होतं. राव जोधा राठोड समाजाच्या प्रमुख व्यक्ती होत्या आणि वर्ष १४५९ मध्ये त्यांनी या शहराचा शोध लावला. राव जोधा जोधपूरचे १५ वे राजा होते.(Marathi Trending News)