जेवताना किंवा मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर अनेकांना काकडी खायला फार आवडते. काकडी कापून त्यावर तिखट मीठ टाकून खाण्याची मजा काही औरच असते. ही काकडी आपण आवडते म्हणून खात असतो, मात्र काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. जे ऐकून काकडी न खाणारे लोकं देखील काकडी खातील. काकडीचे सेवन करणे हे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यापासून ते अनेक पोषक तत्व मिळण्यासाठी काकडी खाणे लाभदायक ठरते. काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते.
काकडीची आपण कोशिंबीर किंवा सॅलड करुन खातो. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्त्व असतात. जे मानवी शरीरासाठी खूप आवश्यक असतात. काकडी आपल्याला वेट लॉस मध्ये मदत करते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. त्याशिवाय काकडी खाल्ल्याने शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही आणि त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी काकडी हा चांगला पर्याय आहे.
शरीराला हायड्रेड ठेवते
काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. यामुळे हे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवते.
त्वचेसाठी फायदेशीर
काकडी एक असा पदार्थ आहे जो त्वचेला विविध प्रकारच्या समस्यापासुन दूर ठेवण्यात मदत करते. टॅनिंग, सनबर्न, रॅशेज आदि अनेक त्रासांमध्ये ही काकडी लाभदायक आहे. रोज काकडी खाल्याने रुक्ष त्वचेत ओलावा पुन्हा येतो. यामुळे हे नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. थंडीमध्ये कोरड्या होणाऱ्या त्वचेसाठी काकडी खाणे चांगले असते.
हँगओवर कमी होतो
दारु प्यायल्याने दुस-या दिवशी हँगओवरचा सामना करावा लागतो. यापासुन वाचण्यासाठी रात्री काकडी खाऊन झोपल्याने फायदा होतो. कारण काकडीमध्ये व्हिटॅमिन बी, शुगर आणि इलेक्ट्रोलाइट असतात जे हँगओवर कमी करण्यास खुप मदत करता.
अॅंटीऑक्सिडंटचा स्त्रोत
अॅंटीऑक्सिडंट्स ते मॉलिक्युल असतात जे शरीरातील ऑक्सीकरण नियंत्रित करतात, ज्यामुळॆ तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहतात. चरबीयुक्त आहाराचे ऑक्सीकरण थांबवण्यासाठी आहारामध्ये एखादा असा पदार्थ अॅंटीऑक्सीडंट समाविष्ट केला पाहिजे, हे काम काकडी करते.
वजन कमी करण्यासाठी
आपल्या जेवण्यामध्ये काकडीचा वापर नियमित केल्यास त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशरमध्ये लाभदायक
काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेव्हल कमी करायला आणि डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत करतात. काकडीच्या रसामध्ये अशी तत्वे असतात जे पॅनक्रियाजला सक्रिय करतात. पॅनक्रियाज सक्रिय झाल्यामुळे शरीरामध्ये इन्शुलिन तयार होते. यानंतर इन्शुलिन डायबिटीसशी लढायला मदत करते. काकडीमध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते जे ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवायला मदत करते.
=======
हे देखील वाचा : हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरासाठी ठरेल वरदान
=======
अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये मदत
काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जाते आणि यामध्ये असलेले सॉल्युबल फायबर्स पोट साफ करतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो तसेच अन्नपचन व्हायला खूप मदत मिळते. यासोबतच यामध्ये इरेप्सिन नावाचे अॅन्झाइम असते जे पोटासाठी खूप चांगले असते. हे खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन यासारखे पोटाशी संबंधित आजार होत नाहीत.