Home » Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची प्रेमकहाणी देखील आहे खूपच खास

Shubhanshu Shukla : अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची प्रेमकहाणी देखील आहे खूपच खास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shubhanshu Shukla
Share

आज सगळीकडे फक्त शुभांशु शुक्ला यांचीच चर्चा होताना दिसत आहे. आणि का होऊ नये, कारण शुभांशु यांची इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी झालेली निवड खूपच खास आहे. ही मोहीम भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. मागील अनेक महिन्यांपासून या मोहिमेच्या चर्चा सुरु होत्या. आज अखेर २५ जूनच्या मुहूर्तावर शुभांशु शुक्ला एक्सिओम-4 मिशनसाठी अवकाशात रवाना झाले. दुपारी १२.०१ मिनिटांनी मिशन लॉन्च झाले. त्यांच्यासोबत इतर तीन अंतराळवीरही अंतराळ स्थानकात गेले आहेत. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले आणि अंतराळात जाणारे दुसरे भारतीय असणार आहेत. याच निमित्ताने जाणून घेऊया शुभांशु या वैयक्तिक आयुष्याबद्दल. (Todays Marathi Headline)

कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा जन्म १० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौ, उत्तर प्रदेश येथे झाला. १९९९ मध्ये झालेल्या कारगील युद्धातील शौर्य कथा ऐकून शुभांशु शुक्ला यांना सैन्यात सामील होण्याची प्रेरणा मिळाली. शुभांशु शुक्ला यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी मध्ये शिक्षण घेतल्यानंतर १७ जून २००६ रोजी भारतीय हवाई दलात प्रवेश केला. शुभांशु हे त्यांच्या कुटुंबातील सशस्त्र दलात सामील होणारे पहिले सदस्य आहेत. (Marathi Latest News)

शुभांशु शुक्ला यांनी टॅक्टिक्स अँड कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट स्कूलमध्ये फायटर कॉम्बॅट लीडरचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यांनी टेस्ट पायलट म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शुभांशु हे लढाऊ नेता आणि चाचणी वैमानिक आहेत त्याच्याकडे सुमारे दोन हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी Su-30 MKI, MiG-21, MiG-29, Jaguar, Hawk, Dornier, AN-32 ही विमाने उडवली आहेत. ३९ वर्षीय शुभांशु शुक्ला हे ISS मोहिमेसाठी निवडले गेलेले सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर आहेत. त्यांची निवड अंतराळवीर होण्यासाठी त्यांनी रशिया आणि अमेरिकेत विशेष प्रशिक्षण घेतले. यामध्ये त्यांनी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण, आपत्कालीन हाताळणी आणि वैज्ञानिक प्रयोगांमध्ये काम करण्याचे प्रशिक्षण घेतले. (Top Marathi Headline)

Shubhanshu Shukla

दरम्यान शुभांशु हे मूळचे लखनऊचे आहेत. तर त्यांचे वडील शंभू द्याल शुक्ला हे एक रिटायर्ड सरकारी अधिकारी आहेत. त्यांची आई आशा शुक्ला या गृहिणी आहेत. शुभांशु हे तीन भावा-बहिणींमध्ये सगळ्यात छोटे आहेत. शुभांशु शुक्ला यांनी ७ वर्षांपूर्वी कामना शुक्ला यांच्याशी लग्न केले. कामना या डॉक्टर असून त्या डेंटिस्ट आहेत. शुभांशु आणि कामना यांचा एक ६ वर्षांचा मुलगा देखील आहे. (Top Marathi News)

==========

हे देखील वाचा :  Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्ला यांची गगनभरारी, मिशन Axiom-4 साठी अंतराळात रवाना

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांनी अवकाश मोहिमेसाठी गाजर हलव्यासोबतच घेतल्या ‘या’ खास गोष्टी

===========

शुभांशु आणि कामना यांचे लव्ह मॅरेज झाले आहे. शुभांशु आणि कामना हे दोघं लहानपणापासूनच एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांची पहिली भेट ही ते तिसरीच्या वर्गात असताना झाली. एका मुलाखतीमध्ये कामना यांनी सांगितले की शुभांशु लहाणपणापासून लाजाळू होते. मात्र आज ते लाखो लोकांची प्रेरणा बनले आहेत. आज शुभांशु स्पेस मिशनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असून, दुसरीकडे त्यांची पत्नी ही हजारो रुग्णांची सेवा करत आहे. (Social Updates)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.