आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे रक्त. रक्त हे मानवी शरीरातील एक महत्त्वाचे द्रव्य आहे. रक्त हे आपल्या शरीरात ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि हार्मोन्स पोहचवण्याचे आणि टाकाऊ पदार्थ शरीरातून बाहेर काढण्याचे काम करते. तसेच, रक्त हे शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते आणि संसर्गापासून संरक्षण करते. प्रत्येकाच्याच शरीरात रक्त किती असावे याचा एक विशिष्ट आकडा असतो. त्यापेक्षा कमी रक्त शरीरात असल्यास हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कायम आपल्या शरीरातील रक्ताची योग्य पातळी राखणे आपले महत्वाचे काम असते. (Blood)
शरीरातील रक्त कमी झाल्यास डॉक्टर रक्त चढवण्याचा सल्ला देतात. आता कोणत्याही व्यक्तीचे रक्त कोणालाही देऊन चालत नाही. प्रत्येकाच्याच शरीराच्या रक्तगटानुसार त्याला रक्त द्यावे लागते. A, B, AB आणि O हे चार रक्तगट आपल्याला माहित असतात, जे पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा प्रकारांमध्ये विभागलेले असतात. याच रक्तगटावरून कोणत्या व्यक्तीने कोणाला रक्त द्यायचे हे ठरते. मात्र तुम्हाला माहित आहे का…की या चार रक्तगटाव्यतिरिक्त देखील एक खास रक्तगट आहे जो खूपच दुर्मिळ असतो. (Marathi News)
हा इतका दुर्मिळ असणारा रक्तगट केवळ ४५ लोकांमध्येच आढळला आहे. या रक्तगटाचे नाव आहे Rh-null. या रक्तगटाची अतिशय खास वैशिष्ट्ये असल्यामुळे याला ‘गोल्डन ब्लड’ असेही म्हटले जाते. हा रक्तगट इतका दुर्मिळ आहे की संपूर्ण जगामध्ये केवळ ९ लोकंच या रक्तगटाचे नियमित रक्तदान करतात, आणि बाकी लोकं स्वतःच या रक्तावर अवलंबून असतात. १९६१ मध्ये पहिल्यांदा गोल्डन ब्लड सापडले. ऑस्ट्रेलियातील एका आदिवासी महिलेच्या शरीरात गोल्डन ब्लड सापडले आहे. या रक्तात आरएच प्रतिजन नसतात. हा एक प्रकारचा प्रथिने आहे, जो लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील प्रथिने आहे. (Top Marathi Headline)
आरएच फॅक्टर हे लाल रक्तपेशींच्या अर्थात आरबीसीच्या पृष्ठभागावर आढळणारे एक विशेष प्रकारचे प्रोटीन आहे. जर हे प्रोटीन आरबीसीमध्ये असेल तर रक्त आरएच पॉझिटिव्ह असते आणि जर हे प्रोटीन नसेल तर रक्त आरएच-निगेटिव्ह असते. पण, आरएच नल रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या आरबीसीमध्ये आरएच फॅक्टर नेहमीच शून्य असतो. हे रक्त इतर सामान्य रक्तगटांपेक्षा खूप वेगळे आहे, त्यामुळे त्याला ‘गोल्डन ब्लड’ म्हणतात. जेव्हा आपल्याला एखाद्या आजारी व्यक्तीसाठी रक्ताची गरज भासते तेव्हा रक्तपेढीमध्ये सामान्य रक्त देऊन आपण आपल्या गरजेनुसार रक्त मिळवू शकतो, परंतु जेव्हा सोनेरी रक्त येते तेव्हा ते इतके दुर्मिळ असते की त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त असते. (Todays Top Headline)
तज्ज्ञांच्या मते, उत्परिवर्तनामुळे गोल्डन ब्लड एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते. चुलत भाऊ, भाऊ-बहीण किंवा दूरचे नातेवाईक यांच्यातील विवाहामुळे त्यांच्या मुलांमध्ये गोल्डन ब्लड येण्याची शक्यता असते. या रक्तगटाच्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते. याशिवाय आजारी रक्तगट असलेले लोकही अॅनिमियाचे बळी ठरू शकतात. २०१८ मध्ये या रक्ताचा संपूर्ण जगभरात शोध घेण्यात आला होता. तेव्हा असे लक्षात आले की, जगात केवळ ४५ लोकांच्या शरीरात या विशेष गटाचे रक्त आहे. (Marathi Latest NEws)
या रक्तगटाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे रक्त कोणालाही चढवता येते. या रक्तगटाचं रक्त इतर कोणत्याही रक्तगटाशी सहज जुळतं. पण, आरएच नल रक्त गटातील व्यक्तीला आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासल्यास तिला लवकर रक्त मिळत नाही. या कारणास्तव हे जगातील सर्वात महाग रक्त आहे. या रक्तगटाचे लोक अमेरिका, कोलंबिया, ब्राझील आणि जपानमध्ये आढळतात. (Top Stories)
=========
हे देखील वाचा : पायांना येणाऱ्या दुर्गंधीवर घरगुती उपाय, वाचा टिप्स
पावसाळ्यात कोरड्या केसांसाठी कोणते हेअर मास्क लावावेत?
=========
गोल्डन ब्लडचे अनेक फायदे आहेत, जसे की हा रक्तगट इतर कोणत्याही Rh गटाच्या व्यक्तीला दिला जाऊ शकतो, त्यामुळे आपत्कालीन स्थितीत तो जीवनदान ठरू शकतो. शिवाय वैद्यकीय संशोधनासाठीदेखील हे रक्त अमूल्य मानले जाते. मात्र या गोल्डन ब्लडचे काही तोटे देखील आहेत. ज्यांच्याकडे Rh-null रक्तगट आहे, त्यांना इतर कोणताही रक्तगट लागू पडत नाही, त्यामुळे त्यांना स्वतःच्या रक्तगटाचे रक्त मिळवणे अत्यंत अवघड असते. अँटीजेनचा अभाव असल्यामुळे त्यांना अनेकदा रक्ताशी संबंधित आजार किंवा अशक्तपणा जाणवतो. या रक्ताची आंतरराष्ट्रीय वाहतूक फारच गुंतागुंतीची आणि महागडी असते. अॅक्टिव्ह ब्लड डोनर्सकडून मिळालेलं रक्त साठवूण ठेवले जाते. ते इतर कोणालाही दिलं जात नाही. जेव्हा या रक्ताची गरज भासते तेव्हा ते पुन्हा त्याच व्यक्तीला दिले जाते. (Social Updates)