सध्या नेपाळ सर्वत्र कमालीचे गाजताना दिसत आहे. नेपाळमध्ये जे हंसक आंदोलन सुरु आहे, त्याची चर्चा केवळ नेपाळ नाही तर संपूर्ण जगात होत आहे. सोशल मीडियावर देखील हे आंदोलन खूपच व्हायरल झाले आहे. नेपाळमध्ये सरकारने काही दिवसांपूर्वी फेसबुक, एक्स (ट्विटर), व्हॉट्सअॅपसह तब्बल २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाच्या निषेधार्थ राजधानी काठमांडूसह अनेक ठिकाणी तरुणाईने हिंसक निदर्शने केली. निदर्शक आणि पोलिसांमधील संघर्षात आतापर्यंत जवळपास २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे. (Marathi News)
नेपाळ भारताचा शेजारी आहे. नेपाळमध्ये देखील हिंदू लोकसंख्या अधिक आहे. याशिवाय नेपाळ आणि भारताचे संबंध देखील चांगले आहेत. त्यामुळे नेपाळबद्दल कायम भारताला आणि भारतीयांना प्रेम वाटत असते. सध्या आपण नेपाळमध्ये होणाऱ्या आंदोलनाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर, टीव्हीवर बघत असू. यामध्ये तुम्ही एका गोष्टीचे निरीक्षण केले का? नेपाळचा राष्ट्रध्वज. जर तुम्ही नीट पाहिले असेल तर अनेक ठिकाणी आपल्याला नेपाळचा राष्ट्रध्वज दिसला. मात्र हा राष्ट्रध्वज इतर देशांच्या राष्ट्रध्वजापेक्षा खूपच वेगळा आणि लक्षवेधक आहे. या देशाचा झेंडा आपल्या आगळ्यावेगळ्या डिझाइनमुळे हटके ठरतो. (Todays Marathi Headline)
नेपाळचा राष्ट्रध्वज हा जगातील एकमेव राष्ट्रध्वज आहे ज्याचा आकार आयताकृती नाही. आकाराच्या बाबतीत जगभरातील राष्ट्रध्वज एकसारखे दिसतात. एकीकडे जगभरातील देशांचे राष्ट्रध्वज आयताकृती असतांना दुसरीकडे आपल्याला नेपाळचा त्रिकोणी आकाराचा राष्ट्रध्वज पाहून अनेकांना याबद्दल विविध प्रश्न पडत असतील. (Top Marathi Headline)
नेपाळच्या राष्ट्रध्वजामागे असलेली भोगोलिक आणि सांस्कृतिक मान्यता आहे. प्रत्येक देश हा त्या देशाची संस्कृती, तत्व, मान्यता, परंपरा आदी गोष्टींचा विचार करून यांच्या आधारावर स्वतःचा राष्ट्रध्वज तयार करत असतो. कोणत्याही सार्वभौम देशावर राष्ट्रध्वज स्वीकारण्यासाठी कोणाचे बंधन नसते. नेपाळच्या राष्ट्रधवजात दोन त्रिकोण दिसतात. हे त्रिकोण हिमालय पर्वतरांगांचे प्रतीक मानले जातात. तसेच ध्वजामध्ये असलेले सूर्य आणि चंद्राचे चिन्ह नेपाळी संस्कृतीत अमरत्व, स्थैर्य आणि शांती यांचे प्रतीक आहे. सूर्य-चंद्राच्या उपस्थितीमुळे नेपाळचे अस्तित्व सदैव टिकून राहील, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. (Latest Marathi News)
या ध्वजाचा लाल रंग शौर्य, धैर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. लाल हा नेपाळचा राष्ट्रीय रंगही आहे. तर ध्वजाभोवती असलेली निळी किनार शांती आणि सामंजस्याचे द्योतक आहे. त्यामुळे हा ध्वज केवळ भौमितिक दृष्ट्या वेगळा नसून सांस्कृतिक अर्थानेही समृद्ध आहे. आज संयुक्त राष्ट्रसंघापासून ते विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर नेपाळचा त्रिकोणी ध्वज सहज लक्ष वेधून घेतो. प्रत्येक देशाचा ध्वज आपले वेगळेपण सांगतो. राजे पृथ्वी नारायण शाह यांनी १७६८ मध्ये हिमालयातील डोंगराळ भागातील सर्व लहानमोठ्या संस्थानांना एकत्र करून गोरखा साम्राज्याची स्थापन केली आणि नेपाळ हा देश अस्तित्वात आला. तेव्हा त्यांनी नेपाळच्या गोरखा साम्राज्याचा नवीन ध्वज तयार केला होता. (Top Trending News)
=========
Nepal : भारतावर ताबा मिळवणाऱ्या मुघलांना नेपाळ का जिंकता आला नाही?
=========
ध्वजामध्ये लाल रंगाचा वापर करण्यात आलाय आणि त्याला निळ्या रंगांची जाड किनार देण्यात आली आहे. ध्वजात लाल रंग असण्याचे कारण म्हणजे, नेपाळमध्ये असणारी फुले. हिमालयामध्ये बुरांश नावाचे लाल रंगाचे फुलझाडं सापडते. हे फुल नेपाळचे राष्ट्रीय फुल आहे आणि नेपाळचा राष्ट्रीय रंग लाल आहे. हे यामागचे भौगोलिक कारण आहे. तर लाल रंगच हिंदू धर्मात वापर केला जातो. लाल रंग हा पवित्र मानले गेले आहे. याचा वापर राष्ट्रध्वजाचा करण्यात आला आहे. यासोबतच लाल रंग युद्धातील विजयाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे नेपाळच्या पहिल्या राजाने युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून ध्वजात लाल रंगाचा वापर करण्यात आला असल्याचे सांगितले जाते. (social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics