Home » Neelkanti Patekar: IITचा अभ्यास सोडून अभिनयाची निवड केलेल्या नीलकांती पाटेकर यांचा अभिनयप्रवास

Neelkanti Patekar: IITचा अभ्यास सोडून अभिनयाची निवड केलेल्या नीलकांती पाटेकर यांचा अभिनयप्रवास

by Jyotsna Kulkarni
0 comment
Neelkanti Patekar
Share

बॉलिवूडसोबतच मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय असणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि शैलीने अभिनयविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. नाना कायमच त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. मात्र असे खूप कमी वेळा होता की, नाना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि कारणांमुळे प्रकाशझोतात येतात. नानांनी कायम त्यांचे वैयक्तिक आयुष्य मीडियापासून लांब ठेवले होते. खूप कमी लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती असेल. आज आपण नाना यांच्या पत्नीबद्दल, अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. (Neelkanti Patekar)

नीलकांती पाटेकर यांच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित असेल. नीलकांती या उत्कृष्ट आणि प्रभावी अभिनेत्री आहे. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलक दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सुपरहिट अशा ‘छावा’ सिनेमात नीलकांती यांनी धाराऊ ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका खूपच लोकप्रिय झाली आणि त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. छावा सोबतच नीलकांती यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आज आपण नीलकांती यांच्या अभिनय प्रवासाबद्दल. (Marathi News)

नीलकांती पाटेकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांच्या वडिलांची नोकरी केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात असल्यामुळे त्यांचे बालपण देशाच्या विविध भागांत गेले. वडिलांच्या सततच्या होणाऱ्या बदल्यांमुळे नीलकांती यांना देशातील विविध संस्कृती आणि वातावरणाला अगदी जवळून अनुभवता आले. याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर एक वेगळाच परिणाम झाला. दरम्यान नीलाकांती यांनी १९६६ मध्ये बालकलाकार म्हणून काम करत नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासोबतच त्या बँकेत उच्च पदावर देखील काम करत होत्या. (Bollywood News)

Neelkanti Patekar

नीलकांती यांनी आपल्या प्रभावी अभिनयाने मराठी रंगभूमीवर एक वेगळीच छाप सोडली. त्यांनी १९७३ मध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुवर्णपदकासह अनेक पुरस्कार पटकावले. नाटकांमध्ये काम करत त्यांनी चित्रपटांमध्ये देखील भूमिका केली. १९८९ मध्ये आलेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘आत्मविश्वास’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. या सिनेमातील त्यांचा जिवंत अभिनय पाहून प्रेक्षक अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडले. नीलकांती यांना ‘आत्मविश्वास’ या सिनेमातील त्यांच्या अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. (Top Marathi Trending News)

नीलकांती यांना विज्ञानाची खास आवड होती. त्यांनी फिजिक्समधून पदवी संपादन केली. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून आयआयटीची प्रवेश परीक्षा दिली आणि त्या ती यशस्वीपणे उत्तीर्णही झाल्या. असे असून देखील त्यांचे मन रमत नव्हते. त्यांना नेहमीच कला आणि अभिनयामध्ये रस होता. याच कारणामुळे त्यांनी आयआयटीला रामराम ठोकला आणि रंगभूमीला निवडले. (Top Marathi Headline)

नीलाकांती आणि नाना यांची प्रेमकथा
नीलाकांती आणि नाना पाटेकर यांची प्रेमकथा एका मराठी नाटकादरम्यान सुरू झाली. त्यांची मैत्री लवकरच प्रेमात बदलली. त्यांनी १९७८ मध्ये लग्न केले. लग्नानंतर काही वर्षांनंतर, त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले, मात्र दुर्दैवाने तो फक्त अडीच वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. नंतर पुढे काही वर्षांनी या दांपत्याला मल्हार नावाचा आणखी एक मुलगा झाला. नाना यांचा मुलगा मल्हार नाम फाउंडेशनसाठी काम करतो. त्याचबरोबर त्याने ‘द लिटिल गॉडफादर’ या सिनेमातही भूमिका साकारली होती. इतकंच नव्हे तर त्याने, ‘द अटॅक्स ऑफ २६/११’ आणि ‘अब तक छप्पन’ या सिनेमांच्या सीक्वेलसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. (Celebrity News)

Neelkanti Patekar

नाना आणि नीलकांती यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते दोघं आता एकमेकांपासून वेगळे राहतात. जरी त्यांचं कायदेशीररित्या घटस्फोट झालेला नसला तरी ते वेगळे राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांच्यातील या दुराव्याचे सर्वात मोठे कारण नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यातील वाढती जवळीक असल्याचे सांगितले जाते. (Marathi Latest News)

एका मुलाखतीमध्ये नानांना विचारण्यात आले होते की, नाना पाटेकर आणि निलकांती यांची भेट कधी झाली? ‘जात न पुछो साधु की’ या नाटकाच्या वेळी का?’ या प्रश्नाला उत्तर देताना नाना म्हणाले, ”हो तेव्हाच भेटलो. ती नाटकात काम करायची आणि बँकेत अधिकारी होती. आम्हाला त्याकाळी एका शो चे ५० रुपये मिळायचे आणि तिला अडीच हजार रुपये पगार होता. मी १५ ते २० शो केले तर ७५० रुपये मिळायचे. पूर्ण महिना ३० शो केले तर दुप्पट मिळायचे, पण तरी देखील मला फक्त १५०० रुपयेच महिन्याला मिळायचे. (Top Stories)

=========

हे देखील वाचा : June : 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का असतो?

Yoga Day : २१ जूनलाच का साजरा होतो आंतरराष्ट्रीय योग दिवस ?

=========

तिने मला सांगितले की, तुम्हाला अभिनयात करिअर करायचे असेल तर करा, माझ्या पगारातून मिळणाऱ्या पैशांमध्ये मी घर चालवेल. माझ्यावर तिचे खूप उपकार आहेत. तिच्यामुळेच मी या प्रोफेशनमध्ये करिअर करू शकलो. यश मिळेल की नाही हे त्यावेळी माहीत नव्हते. तिने ‘आत्मविश्वास’ या सिनेमात काम केले होते. पण त्यानंतर तिने कोणत्याही सिनेमात काम केलं नाही. कारण तेव्हा माझा मुलगा मल्हार लहान होता, माझी आई होती, त्यामुळे तिने काम केलं नाही. मी वेगळा रहायचे, मल्हार, माझी आई आणि नीलकांती एकत्र राहायचे आणि मी एकटाच राहत होतो.” (Social Updates)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.