भारतात अनेक रहस्यमयी मंदिरं पाहायला मिळतात. भारतातील प्रत्येक मंदिर त्यातील रहस्यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील या रहस्यमयी मंदिरांची रहस्य तर जगभरातील मोठमोठे वैज्ञानिक देखील सोडवू शकले नाहीत. त्यामुळेच की काय अशा रहस्यमयी मंदिरांवर लोकांचा जास्त विश्वास असतो. आपण कायम मंदिरामध्ये जाऊन प्रार्थना करतो आणि देवाकडे आपल्या मागण्या मागत असतो. सर्वच लोकं देवाकडे कायम एक गोष्ट मागतात आणि ती म्हणजे, ‘देवा मला उदंड आयुष्य मिळू दे.’ मनुष्याला सतत मरणाची भीती असल्याने तो कायम देवाकडे भरपूर आयुष्य मागतो. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितले की, भारतात एक असे मंदिर आहे, जिथे मृत्यूचे संकेत मिळतात तर? (Shravan Special News)
अशा मंदिरात जाणे लोकं नक्कीच टळतील, कारण मरण कोणालाच नकोय. पण असे अजिबातच नाहीये. अनेक लोकं या मंदिरामध्ये जातात आणि मृत्यूचा संकेत मिळतो की नाही हे तपासतात. भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहर म्हणून वाराणसी शहराला ओळखले जाते. भगवान महादेवाचे शहर म्हणून देखील या शहराची खास ओळख आहे. वाराणसी म्हटले की सर्वात आधी डोक्यात येते ते काशी विश्वनाथ मंदिर आणि मनकर्णिका घाट. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्वाचे ज्योतिर्लिंग म्हणून खासी विश्वनाथ मंदिर प्रसिद्ध आहे. मात्र याच काशी मध्ये एक असे मंदिर आहे, जिथे गेल्यास तुम्हाला तुमच्या मृत्यूचा संकेत मिळतो, अशी मान्यता आहे. (Marathi News)
धर्मेश्वर महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव असून, हे मंदिर काशीमधील मीरघाटाच्या उच्च ठिकाणी स्थित आहे. या मंदिरामध्ये एक विहीर सुद्धा आहे. मंदिरातील पुजाऱ्याच्या दाव्यानुसार, ही विहीर, आड, गंगा नदी पृथ्वीवर अवतरीत होण्याआधीची असल्याचा दावा आहे. ही विहीर सूर्यपूत्र यमराज यांनी बांधल्याचे देखील सांगितले जाते. गंगा अवतरीत होण्यापूर्वी यमराजाने येथे दीर्घ तपस्या केल्याची मान्यता आहे. (Todays Marathi Headline)
वाराणसी मधील धर्मेश्वर महादेव हे शेकडो वर्ष जुने मंदिर आहे. इथे असलेले शंकराचे शिवलिंग हे स्वयंभू असून, याची स्थापना मृत्यूची देवता अशी ओळख असणाऱ्या यमदेवांनी केली असल्याचे सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या ठिकाणी यमदेवांनी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्ष तपश्चर्या केली होती. या मंदिरात कायम लोकांची गर्दी असते. मात्र श्रावण महिन्यात मंदिराचे महत्व आणि इथे येणाऱ्या लोकांची गर्दी कमालीची वाढते. श्रावणात इथे लोकं महादेवाची पूजा करतात, रुद्राभिषेक करतात आणि भोलेनाथाला खुश करण्याचा प्रयत्न करतात. (top Marathi News)
प्राप्त माहितीनुसार या मंदिरात धर्मेश्वर महादेव स्थित आहे. येथे सूर्यपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यमदेवांनी चार युगांपर्यंत कठीण तप केले. त्यानंतर त्यांना शंकरांनी दर्शन दिले आणि त्यांचे नाव यमराज ठेवले. जेव्हा भाग्यवान शिवणे यमराजला विचारले तुला काय पाहिजे त्यावर यमदेव म्हणाले, “देवा मी तुमचे कार्य करू इच्छितो. तेव्हा भोलेनाथानी यमराज यांना पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वच प्राणी, मनुष्य यांच्या पाप आणि पुण्याचे मापन करून त्यांना दंड देण्याचे काम सोपवले.” तेव्हापासून यम यांना मृत्यूची देवता म्हणून देखील ओळख मिळाली.(Top Trending News)
मृत्यूचा संकेत
या मंदिराबाबत अशी मान्यता आहे की, इथे असलेली एक रहस्यमयी विहीर मृत्यूचे संकेत देते. असे सांगितले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला या विहिरीत त्याची सावली दिसली तर त्याला मृत्यूचे भय नाही, मात्र जर त्याला त्याची सावली दिसली नाही तर तो पुढील ६ महिन्यात मरण पावणार, हे निश्चित मानले जाते. इथे असणाऱ्या पुजाऱ्यांच्या मते, अनेक लोकांना त्याचा अनुभव आला आहे. अनेकांचा त्यावर विश्वास नव्हता. पण काही घटना तशा घडल्याचा दावा करण्यात येतो. (Latest Marathi News)
==========
हे देखील वाचा : Shravan : श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय? पहिला श्रावणी सोमवार कधी?
===========
धर्मेश्वर महादेव मंदिर हे सकाळी ५ वाजता उघडते आणि दुपारी १२ वाजता बंद होते. रात्री १० ला देवाची शयन आरती केली जाते. या मंदिरात शंकराची दोन वेळा आरती केली जाते. असे म्हटले जाते की, या मंदिरात जर तुम्ही एकवेळ जरी गायत्री मंत्र म्हटला तरी १००० वेळा गायत्री मंत्र म्हटल्याचे पुण्य मिळते. शिवाय इथे मनोभावे पूजा आणि देवाची आराधना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवाय या मंदिरात दर्शन घेतल्यास अकाल मृत्यू होत नाही. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics