आपल्या निरोगी आरोग्याचे गुपित हे आपल्या आहारात असते असे सांगितले जाते. हे खरे देखील आहे, कारण तुम्ही जितके शुद्ध, सात्विक, सकस जेवण कराल तितकेच तुमचे आरोग्य उत्तम राहील. पूर्वीचे लोकं ऋतुकालमानानुसार आपल्या आहारात बदल करायचे. जो ऋतू सुरु असेल त्या ऋतूमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेला आणि लाभदायक ठरणार आहार जर आपण घेतला तर नक्कीच आपले आरोग्य चांगले राहते. यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये त्याला अनुसरून आहारात बदल करणे गरजेचे आहे. आता पावसाळा ऋतू सुरु असून, आरोग्याच्या दृष्टीने हा ऋतू तसा त्रासदायकच ठरतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणता आहार घेतला पाहिजे आणि काय खाल्ले पाहिजे? काय खाऊ नये याबद्दल सांगणार आहोत. (Marathi News)
पावसाळ्यात पचनक्रिया निरोगी ठेवणारा आहार घ्यावा. कारण पावसाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढलेल असते, आणि यामुळे बॅक्टेरिया वाढतात. या दिवसांमध्ये अतिसार, फ्लू, सर्दी पडसं, मळमळ आदी समस्या खूप लवकर उद्भवतात. यासोबतच जठराग्नी मंद झालेला असतो त्यामुळे अपचन, पॉट दुखी आदी पोटाशी संबंधित विकार देखील होतात. शिवाय का दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती देखील कमी झालेली असते, त्यामुळे पावसाळ्यात योग्य आहार घ्यावा. पावसाळ्यात हलके पचायला सोपे आणि ताजे शिजवलेले पदार्थांचे सेवन करावे. असा आहार घेतल्याने तुम्ही पावसाळ्यात आजारी पडण्यापासून स्वतःचे रक्षण करू शकता. (Health)
पावसाळ्यात काय सेवन करावे?
पावसाळ्यात आपली रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करणारा आणि पचनास हलका असा आहार घ्यावा. पावसाळ्यामध्ये भरपूर भाज्या घालून केलेली खिचडी, मूग डाळ, डोसा, इडली, चिल्ला यासारखे तसेच नाचणी पासून तयार केलेले पदार्थ खा. याशिवाय आहारात भरपूर बाजरीचा समावेश करा. कारण पावसाळ्यात यांच्या सेवनाने तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहते. यासोबतच तुम्ही बदाम देखील खाऊ शकता. बदामामध्ये कॉपर, झिंक, फोलेट व आयर्न यांसारखे १५ आवश्यक पौष्टिक घटक असतात, जे आरोग्य उत्तम राखण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास पावसाळ्यादरम्यान होणारे संसर्ग, आजारांशी लढण्यास मदत होते. तसेच, बदाम पावसाळ्यामधील कंटाळवाण्या दिवसांदरम्यान तुम्हाला उत्साही ठेवतात. (todays Marathi Headline)
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी दररोज एक लिंबू आहारात असायला पाहिजे. असे आहारतज्ञ सांगतात. यासोबतच हळद, आलं, तुळशीचा चहा, दूध, हर्बल टी आदी पदार्थ देखील रोगप्रतिकारक शक्ती मजबुत करण्यास लाभदायक ठरतात. दुधी, पडवळ यांसारख्या भाज्याचे सेवन देखील पावसाळ्यात फायदेशीर ठरते. कारण या भाज्या पचण्यास सोप्या असतात आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. याशिवाय तुम्ही सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरे, बडीशेप यांचा समावेश देखील आहारात करावा. ताप किंवा इतर आजारांत मूग डाळीचे वरण, भाताची पेज, बाजरीची भाकरी खा. धान्याच्या लाह्या, मुगाच्या डाळीचे कढणही पावसाळ्यात पोषक ठरते. पावसाळ्यात एक काळजी नक्की घ्या ती म्हणजे फळं, भाज्या स्वच्छ धुवूनच खा. सोबतच आहारात तूपाचा समावेश आवर्जून करावा. (Top Marathi Headline)
पावसाच्या दिवसांमध्ये फळांमध्ये तुम्ही सफरचंद, डाळींब, बेरी, केळी अशा ताज्या फळांचे सेवन करू शकता. यामध्ये व्हिटॅमिन्स व अॅण्टीऑक्सिडण्ट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि अन्नपचनास मदत करतात. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात असतात. जोरदार पावसात नेहमीच काहीतरी गरम गरम खाण्याची इच्छा नेहमीच होते. अशावेळस व्हेजीटेबल सूप घेणे चांगले आहे. ते सहजपणे पचते, शरीराला उबदार ठेवण्यास मदत करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आवश्यक हायड्रेशन देते. त्यामुळे पावसाळ्यत जर तुम्ही तुमच्या आहारात देखील बदल केला तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होईल. (Latest Marathi News)
पावसाळ्यात काय खाऊ नये?
पावसाळ्यात नेहमीच बळावणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी बीट, गाजर खावे. काकडी, तळलेले पदार्थ टाळावे. या दिवसात चुकीच्या आहाराच्या पद्धतीमुळे पोटदुखी, गॅस, अपचनासोबत पोटाच्या तक्रारी होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात जठराग्नी मंद झालेला असतो. त्यामुळे पचनास अतिशय हलका आहार घ्यावा. या दिवसात तळलेले पदार्थ खाऊ नये किंवा अतिशय कमी प्रमाणात खावे. रस्त्यावरील फूड, पचायला जड जाणारे व तेलकट पदार्थ सेवन मांस, अतिउष्ण पदार्थांचा अतिरेक टाळा, पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नये. (TOp Trending News)
=========
हे ही वाचा : Health : पावसाळ्यात सततचा सर्दी खोकला त्रास देतोय? मग करा ‘हे’ सोपे उपाय
=========
पावसाळ्यात सीफूड पदार्थ खाणे टाळावे, जर तुम्ही पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ खात असाल तर लक्षात ठेवा की जर ते चिकन असेल तर ते ताजे असावे. तळलेले आणि मसालेदार मांसाहारी पदार्थ खाण्याऐवजी ते कमी मसाल्यांनी ग्रिल केलेले किंवा शिजवुन खा. अर्धशिजवलेले किंवा कच्चे मांसाहारी पदार्थ खाणे टाळा. शिवाय शिळे अन्न सेवन करणे टाळा आणि उरलेले अन्न हवाबंद डब्यांमध्ये स्टोअर करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. पावसात कच्च्या भाज्या खाणे टाळा. कच्च्या भाज्या, सलाड खाणार असला तर त्याचे नीट निर्जंतुकीकरण करा. सॉफ्ट ड्रिंक्स आणि रस्त्यावरील ज्यूस, कापलेली उघडी फळं देखील खाऊ नये. (Social Updates)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics