Home » शरीरावरील प्रत्येक तीळ सांगते तुमचा गुण आणि स्वभाव

शरीरावरील प्रत्येक तीळ सांगते तुमचा गुण आणि स्वभाव

by Jyotsna Kulkarni
0 comment
Mole On Body
Share

स्त्री असो किंवा पुरुष आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर कोणत्या ना कोणत्या भागावर तीळ असते. ही तीळ आपल्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते. काहींना तीळ नसेल तर ते काळ्या रंगाची टिकली किंवा कुंकू देखील लावताना दिसतात. मात्र तुम्हाला माहित आहे की हे तीळ आपले सौंदर्य वाढवण्यासोबतच आपल्या भविष्याबद्दल देखील आपल्याला संकेत देत असतात.

शरीराच्या विशिष्ट भागावर तीळ असण्याचा काही अर्थ असतो असे आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकले असेलच. आपल्या ज्योतिशास्त्रामध्ये आपल्या शरीरावर असलेल्या प्रत्येक तिळीचा एक अर्थ आणि कारण सांगितले गेले आहे. शरीराचा आकार किंवा त्यावर असलेल्या तीळाच्या खुणा पाहून भविष्याचा अंदाज सामुद्रिक शास्त्रात केला जातो. आज आपण या लेखातून शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तीळबद्दल जाणून घेऊया.

– दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो. हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात.

– पाठीवर तीळ असणाऱ्या व्यक्तींना फिरायला खूप आवडते. त्या शिवाय या व्यक्ती रोमँटिक असतात. कुटुंबाची अतिशय काळजी घेतात. कमी वयात मोठ्या पदावर पोहचतात

– ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याच्या खाली तीळ असतो, ते लोक खूप कामुम असतात. या लोकांना इतरांची मदत करणे खूप आवडते.

– ज्या लोकांच्या उजव्या डोळ्याखाली नाकाजवळ तीळ असतो ते स्वभावाने थोडे रहस्यमयी असतात. यांना समजून घेणे फार अवघड असते.

– ज्या लोकांच्या एकदम डाव्या डोळ्याखाली तीळ असतो ते वासनात्मक स्वभावाचे असतात. यांचे वैवाहिक जीवनाचे विविध अनुभव असतात.

– ज्या लोकांच्या डाव्या डोळ्याजवळ तीळ असतो ते लोक आपल्या प्रेमासाठी भांडण णारे असतात. हे लोक आपले प्रेम मिळवण्यासाठी एखादा गुन्हाही करू शकतात.

– अशा व्यक्तींना समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळतात. या व्यक्ती अतिशय हसतमुख राहतात. फिरायला फार आवडते. या व्यक्ती पैसे फक्त मौजमजेसाठी पैसे खर्च करतात

– जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असेल तर समजून घ्यावे की,तो व्यक्ती तल्लख बुद्धीचा आहे.

– बेंबीच्या वरच्या भागावर तीळ असेल तर ती व्यक्ती खाण्यापिण्याची शौकीन असते. जर बेंबीच्यामध्ये तीळ असेल तर व्यक्तीला भरपूर धनसंपत्ती प्राप्त होते.

– नाकावर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. अशा लोकांना प्रेम संबंधांमध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागते.

– ज्या लोकांच्या उजव्या गालाच्या हाडावर तीळ असतो, ते जास्त भावूक असतात. भावनांच्या आहारी गेल्यामुळे हे संकटात सापडू शकतात.

– उजव्या गालावर तीळ असणारे लोक जास्त कामुक असतात. जोडीदारासोबत यांचे सतत भांडण होत राहते.

– डाव्या ओठाच्या वर तीळ असणारे लोक आपल्या मुलांवर खूप प्रेम करणारे असतात. या लोकांच्या उदारतेमुळे घरामध्ये सुख-समृद्धीचे वातावरण राहते. हे लोक विश्वासपात्र असतात.

– उजव्या बाजूच्या ओठांच्यावर तीळ असणारे लोक बुद्धिमान आणि यांची कल्पनाशक्ती उत्तम असते.

– उजव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे प्रेमी स्वभावाचे असतात.

– ज्या लोकांच्या डाव्या गालावर तीळ असतो, त्यांची बौद्धिक क्षमता उच्च असते. या लोकांना एकसारखे आहे तसे आयुष्य जगणे आवडत नेहमी.

– डाव्या ओठांच्या एकदम जवळ तीळ असणारे लोक जास्त कामुक असतात. कामुक स्वभामुळे यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

– हनुवटीच्या डाव्या बाजूस तीळ असणारे लोक अध्यात्म, धर्मामध्ये आवड असणारे असतात. हे लोक भौतिक सुख-सुविधांकडे आकर्षित होतात.

– हनुवटीच्या मधोमध तीळ असणारे लोक परंपरावादी असतात. हे लोक नेहमी कुटुंबाला सुख देण्याच्या प्रयत्नात असतात. इतर लोकांशी यांचे संबध चांगले राहतात. हे लोक स्वभावाने शांत असतात परंतु कधीकधी खूप रागात येतात.

(टीप : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.