या जगात अनेक अशा असामान्य गोष्टी आहे, ज्या निसर्गाच्या नियमाच्या अगदी विरोधात आहे. पृथ्वीवरच्या या गोष्टी पाहून मोठमोठे संशोधक देखील अवाक आहेत. अशा आश्चर्यकारक गोष्टींची गुत्थी आजही शास्त्रज्ञ सोडू शकलेले नाही. भारत देखील अशा गोष्टींमध्ये मागे कसा राहील. भारतात देखील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या पाहून सर्वांचेच बोटं तोंडात जातील. यातीलच एक गोष्ट म्हणजे महाबलीपूरम येथील कृष्णाचा बटर बॉल. (Stone)
साऊथ इंडियामधील तामिळनाडू राज्यातील महाबलीपूरम शहरात कृष्णाचा बटर बॉल नावाने एक मोठा दगड आहे, जो पाहून पहिल्यांदा धडकीच भरते. कारण हा दगड पाहून आपल्याला प्रथमदर्शी असे जाणवते की, तो कधीही कोसळेल आणि आपल्याकडे जोरात येईल. डोंगरावर ४५ डिग्री उतारावर हा दगड तब्बल १ हजार ३०० वर्षांपासून हा दगड भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत उभा आहे. डोंगरावर झुकलेल्या अवस्थेत असलेल्या या दगडाचे वजन २५० टन इतके असून, तो २० फूट उंच आणि ५ मीटर लांब आहे. अतिशय धोकादायक आणि झुकलेल्या अवस्थेत असलेला हा दगड हटवण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले पण कोणालाच यश आले नाही. (krishna’s butterball)
मुख्य म्हणजे अगदी गुरुत्वाकर्षणाचा देखील या दगडावर कोणताही परिणाम होत नाही. येथील स्थानिक लोकांच्या मते हा दगड देवाने महाबलीपूरम येथे ठेवला होता. देवाला तो किती ताकदवर आहे हे दाखवायचे होते, त्यासाठी त्याने स्वर्गातून हा दगड पृथ्वीवर आणला आणि येथे ठेवला. तर भूवैज्ञानिकांच्या माहितीनुसार पृथ्वीवर झालेल्या काही नैसर्गिक घटनांमुळे या दगडाची निर्मिती झाली असावी आणि तो अशा या असामान्य अवस्थेत उभा राहिला आहे.(Marathi Top Stories)
तर स्थानिक हिंदू लोकांच्या सांगण्यानुसार हा दगड श्रीकृष्णाचे लोणी आहे. श्री कृष्ण आईने तयार केलेली लोणी लपून घ्यायचे. कृष्णाने चोरलेले लोणी घट्ट होऊन हा दगड तयार झाला असल्याचे मानले जाते. म्हणूनच या दगडाला कृष्णाचा बटर बॉल असे म्हणतात. आपण या दगडाकडे पाहिले तर असे वाटते की, तो कधीही पडेल. मात्र मागील १३०० वर्षात असे झाले नाही. हा दगड थोडा देखील हलला नाही. हा दगड स्वर्गातून पृथ्वीवर आल्यामुळे त्याला कोणी हात लावू शकत नाही असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. हा दगड बाजूला करण्यासाठी अनेक लोकांनी मोठमोठे प्रयत्न केले. सर्वात आधी ६३० ते ६६८ मध्ये दक्षिण भारतावर राज्य करणारा पल्लव शासक नरसिंह वर्मा यांनी हा दगड हटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते हा दगड हटवण्यात अपयशी ठरले. (Trending News)
==============
हे देखील वाचा : Gudipadwa : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात ‘गुढीपाडवा’
===============
ब्रिटिशांच्या काळात १९०८ मध्ये मद्रासचे गव्हर्नर आर्थर लावले यांनी हा दगड हटवण्याचा प्रयत्न केला होता. हा दगड कधीही घसरेल आणि डोंगराच्या खाली राहणाऱ्या गावावर कोसळेल. यामुळे मोठी दुर्घटना होईल या भीतीने त्यांनी हा दगड हलवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी सात हत्तींची मदत घेतली. अनेक वेळा प्रयत्न करुन देखील हा दगड त्याच्या मूळ जागेवरून किंचितही हलला नाही. अखेर गव्हर्नर लावले यांनी देखील हार मानली होती. (Social News)
काहींच्या मते हा दगड झुकण्याचे मुख्य कारण म्हणजे घर्षण आणि गुरुत्वाकर्षण होय. घर्षणामुळे हा दगड घसरत नाही तर गुरुत्वाकार्षणाचे केंद्र या दगडाला ४ फूटाच्या आधारावर उभा करतो. कारण वैज्ञानिक असो किंवा धार्मिक किंवा इतर काही, पण हा दगड आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे. दुरून दुरून लोकं केवळ हा दगड बघण्यासाठी आणि येथे फोटो काढण्यासाठी येतात.