भारताला मोठा आणि अतिशय जुना असा ऐतिहासिक वारसा आहे. या देशामध्ये देखील अनेक गावं, शहरं अशी आहेत, ज्यांना देखील हजारो वर्षांचा इतिहास आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला ओळखले जाते. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असे ठिकाण आहे, जिथे भारत सरकारचे कोणतेही कायदे लागू होत नाही. हो भारतामध्ये असलेले किंबहुना भारताचाच एक भाग असलेले हे मलाणा गाव भारताच्या हिमाचल प्रदेशात वसलेले असले तरी या गावातील लोक त्यांना भारताचा भाग मानत नाहीत.
या मलाणा गावाची स्वतःची न्यायव्यवस्था आहे. हे गाव द्विसदनी संसदेद्वारे कार्य करते. ज्यामध्ये कनिष्ट नावाचे खालचे सभागृह आणि जेष्ठ नावाचे वरचे सभागृह आहे. यागावाबद्दल अनेक अशा बाबी आहेत किंवा रहस्ये आहेत, जी ऐकून नक्कीच तुम्ही अचंभित व्हाल. चला जाणून घेऊया या मलाणा गावाबद्दल अधिक माहिती.
निसर्गाने भरभरून वरदान दिलेला भारतातील भाग म्हणजे हिमाचल प्रदेश हे राज्य. या राज्याला खऱ्या अर्थाने नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. पर्यटकांना नेहमीच हे राज्य खुणावत असते. या राज्यामध्ये अनेक ठिकाणं, गोष्टी बघण्यासारख्या आहेत. मात्र सगळ्याच पर्यटकांचे मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये असणारे ‘मलाणा’ गाव. हिमालयाच्या दुर्गम भागातील पायथ्याला असलेल्या मलाणा या छोट्या गावाची ‘लिटिल ग्रीस’ अशी हटके ओळख संपूर्ण जगभर आहे.
इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गावाच्या दिशेने येत असतात. याशिवाय अंमली पदार्थ मिळण्याचे मुख्य ठिकाण म्हणून पश्चिमी देशात या गावाला ‘मलना क्रीम’ या नावाने ओळखले जाते. जगातील सर्वात मोठं मोठ्या शहरातील हॉटेलमध्ये या मलाणा गावात मिळणाऱ्या अंमली पदार्थांना सर्वात जास्त किंमत मिळताना दिसते. जगभरातील माफियांमध्ये मलाणा गावातील चरस, गांजा प्रसिद्ध आहे.
– भारतामध्ये चरस आणि गांजाची शेती करण्यावर बंदी आहे. मात्र या दुर्गम भागातील भौगोलीक परिस्थितीचा आणि इथल्या वेगळ्या कायद्याचा फायदा घेऊन अंतरराष्ट्रीय माफिया चरस आणि आफूची शेती करतात. इथले नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गावात नेहमीच विदेशी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. समुद्र सपाटीपासून ३००० फुट उंचीवर असलेले मलाना गावाबद्दल काही वर्षापूर्वी खूप कमी लोकांना माहिती होती. मात्र आता हळूहळू या गावाबद्दल आणि इथल्या लोकांबद्दल जगभरात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे.
– मलाना गांव भारतातील सर्वात प्राचीन लोकशाही व्यवस्था असल्याचा या गावातील लोकांचा दावा आहे. गावात साधारणतः ३०० कुटुंब असून गावाची लोकसंख्या ३००० इतकी आहे. या गावाला अतिशय प्राचीन इतिहास आहे. ‘जमलू’ नावाच्या ऋषीची या गावात पूजा केली जाते कारण पुरातन काळात याच ऋषीने या गावाचे नियम बनविले असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळेच या गावात खास ‘जमलू’ देवतेच्या पूजेसाठी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
– या गावातील लोक स्वतःला सिकंदराच्या फौजेतील सैनिकांचे वंशज मानत असल्याने इतर लोकांना ते कनिष्ठ मानतात. त्यामुळे तुम्ही त्यांना स्पर्श करू शकत नाही. याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या गावाला भेट देतात परंतु ते गावात राहू शकत नाहीत. भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना आपली निवासाची व्यवस्था गावाबाहेर तंबू ठोकून करावी लागते.
– या गावात प्रवेश केला की गावातील लोकांच्या नजरा तुमच्यावरच असल्याचे जाणवत असते. हे लोकं याचे एक महत्वाचे कारण आहे. कारण तुम्ही जर कुठल्याही गोष्टीला स्पर्श केला तर तुम्हाला येथील कायद्यानुसार १००० ते २५०० रुपये दंड भरावा लागू शकतो. तशा पद्धतीचे बोर्ड जागोजागी गावात बघायला मिळतात.
– या मलाणा गावात मिळणारी ‘मलाना क्रीम’ जगभरात प्रसिद्ध आहे. ही मलाना क्रीम म्हणजे एक प्रकारची चरस असते. या चरसमध्ये उच्च गुणवत्तेचं नैसर्गिक तेल असल्याने ती सर्वोत्तम समजली जाते. ही चरस तुम्हाला जवळपास ८००० रुपये तोळा एवढी किंमत मोजून विकत घ्यावी लागते. जगप्रसिद्ध असणाऱ्या या ‘मलाना क्रीम’ची विदेशात मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ‘चरस’ शिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचं गावात उत्पन्न घेतलं जात नाही.
=========
हे देखील वाचा : गूढ पद्मनाभस्वामी मंदिराची चकित करणारी रहस्य
=========
– या गावात खूप विचित्र परंपरा आहेत. या गावात न्यायनिवाड्यासाठी पोलीस किंवा न्यायाधीश नाही तर गावाची एक वेगळीच परंपरा आहे. या गावामध्ये जर दोन गटांमध्ये वाद झाला तर दोन्ही बाजूकडून दोन बकरे घेतले जातात. या बकऱ्यांच्या पायामध्ये विषारी चारा टाकला जातो. ज्याचा बकरा आधी मरण पावेल तोच दोष असतो. या निर्णयावर कोणीही शंका घेऊ शकता नाही. त्यामुळे हे गाव अजब परंपरेसाठी ओळखले जाते.
– या गावात अनेक नियम आहेत. बाहेरगावचे लोक या गावात एक रात्रही राहू शकत नाहीत. त्यांना गावाबाहेर तंबूत राहावे लागते. या गावाच्या भिंतीला स्पर्श करण्यासही मनाई आहे. या गावामध्ये कनाशी भाषा बोलली जाते. या कनाशी भाषेमध्ये संस्कृत आणि तिबेटन भाषेता मिलाप आढळतो.