आजच्या आधुनिक काळातील मुलामुलींना लग्नाबद्दल विचारेल तर त्यांचे सर्वात पहिले उत्तर असते, अजून नाही. आजच्या काळात मुलं असो किंवा मुली सर्वानाच आधी करियर करायचे आहे. चांगल्या बक्कळ पगाराचा जॉब मोठी पोस्ट पाहिजे आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी किंवा एकंदरीत नवीन पिढीसाठी लग्न, मुलं या गोष्टी आपसूकच दुय्यम ठरताना दिसत आहे. जिथे पूर्वी तिशीच्या आत महिलांना दोन मुलं झालेली असायची तिथे आज मुलं मुली लग्नाचा विचार देखील करत नाही. यामुळे साहजिकच उशिरा लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सीसाठी देखील अशा जोडप्यांना उशीर होतो. (Egg Freezing)
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक स्त्रीने वयाच्या तिशीपर्यंत मुलं होऊ देणे हे सर्वात योग्य ठरते. २० ते ३० हे प्रेग्नन्सीसाठी योग्य वय असल्याचे सांगितले जाते. मात्र आजच्या काळातील पिढीसाठी हा नियम लागू होताना दिसत नाही. लग्न करायचे, मुलं देखील पाहिजे पण आता नाही काही वर्षांनी. पण ४० नंतर मुलं होऊ देणे हे हायरिस्क प्रेग्नन्सीमध्ये येते. अशावेळी महिलांना अनेक समस्यांना समोरे जावे लागते. बाळाला देखील या प्रेग्नन्सीमध्ये काही त्रास होण्याचा किंवा आजार असण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. (Marathi)
मग अशावेळेस काय करता येईल? याचा विचार अनेक मुली, महिला करतात. अशातच मधल्या काही काळापासून अनेकदा कानावर एग फ्रिजिंग हा शब्द पडत असेल. याला आपल्या मराठी भाषेत अंडी गोठवणे असे म्हटले जाते. मनोरंजनविश्वातील तर अनेक अभिनेत्रींनी एग फ्रिजिंग केल्याचे आपण ऐकत असतो, वाचत असतो. या एग फ्रिजिंगमुळे तुम्ही चाळिशीनंतर देखील आई होऊ शकता आणि मातृत्वाचा आनंद घेऊ शकता. मग हे एग फ्रिजिंग नक्की आहे तरी काय? ते का करतात? एग फ्रिजिंग कसे करतात? त्याचे फायदे काय? आदी सर्व प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊया. (Marathi News)

आजच्या काळात एग फ्रीजिंग ट्रेंड वाढत आहे. या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत oocyte cryopreservation म्हणतात. ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये गर्भधारणेच्या वास्तविक वयात महिलाकडून अंडी काढून घेतली जातात आणि सुरक्षित ठेवली जातात. एग फ्रीझिंग ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांकडून अंडी काढून कमी तापमानात साठवली जातात. या प्रक्रियेचा मुख्य उद्देश भविष्यातील वापरासाठी महिलांची प्रजनन क्षमता जपणे आहे. (Women’s Health)
एग फ्रीजिंगमुळे गर्भधारणेचे योग्य वय उलटून गेल्यानंतरही महिलांना गर्भधारणेची सुविधा मिळते. ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत, डॉक्टर महिलेची संपूर्ण तपासणी करतात. एका महिलेच्या शरीरात दर महिन्याला एक अंडे तयार होते. मात्र प्रत्येक महिन्याला तयार होणारे अंडे उत्तमच असते असे नाही. मग नक्की कोणत्या महिन्याला तयार होणारे अंडे चांगले असते, हे डॉक्टर त्या महिलेला तपासल्यानंतरच सांगू शकतात. एग्ज हे ओवरी मधून काढण्याच्या प्रक्रीयेला रिट्रीवल असे म्हणतात आणि यात जास्त वेळ सुद्धा लागत नाही. याशिवाय एग फ्रिजिंग प्रक्रियेत कोणता धोका सुद्धा नसतो. (Todays Marathi Headline)
एग फ्रिजिंगची प्रक्रिया कशी केली जाते?
प्रथम महिलेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतर निरोगी आणि सक्षम अंडी तयार होण्यासाठी आवश्यक उपचार दिले जातात. अंडी तयार झाल्यावर ती सूक्ष्म शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून काढली जातात. त्यानंतर ही काढलेली अंडी विशेष तापमानात गोठवून सुरक्षित ठेवली जातात. जगात ही प्रक्रिया अतिशय प्रसिद्ध असून यशस्वी होण्याचे प्रमाण खूप आहे. (Latest Marathi Headline)
एग फ्रिजिंग किती काळासाठी ठेवता?
फ्रीज केलेली अंडी साधारण १० ते १५ वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवली जाऊ शकतात. भविष्यात जेव्हा महिलेने आई होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ह्याच अंड्यांना प्रयोगशाळेत फलित करून गर्भधारणेची प्रक्रिया सुरू केली जाते. (Top Marathi Headline)

एग फ्रीजिंग कोणत्या वयात करावे?
डॉक्टरांच्या माहितीनुसार ३४ वर्षांच्या स्त्रियांना १० एग्ज फ्रीज करावे लागतात तर ३७ वर्षांच्या स्त्रीला या प्रक्रीयेसाठी २० एग्ज द्यावे लागतात. जर स्त्री ४२ वर्षाची असेल तर तिला तब्बल ६१ एग्ज द्यावे लागतात. यामुळेच या प्रक्रियेसाठी विशिष्ट वय ठरवण्यात आले आहे. प्रजननक्षम वय २० ते ३० दरम्यान सर्वोत्तम मानले जाते. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जर महिलेला एग फ्रीजिंगचा पर्याय घ्यायचाच असेल, तर ३४ व्या वर्षाच्या आधी हा निर्णय घेणे अधिक चांगले आणि योग्य मानले जाते. (Top Trending News)
अंडी गोठवणे हे सामान्यतः सुरक्षित मानले जाते आणि ही प्रक्रिया अनेक दशकांपासून यशस्वीरित्या पार पाडली जात आहे. तरी ही, या प्रक्रियेचे देखील काही छोटे धोके असू शकतात. जसे की डिम्बग्रंथि उत्तेजित होण्याच्या प्रक्रियेत, ज्यामध्ये अंडी उत्पादनास उत्तेजन देण्यासाठी हार्मोनल इंजेक्शन्सचा समावेश होतो, त्यामुळे तात्पुरते दुष्परिणाम होऊ शकतात जसे की सूज येणे, स्तनाची कोमलता, मूड बदलणे आणि सौम्य अस्वस्थता. (Latest Marathi News)
एग फ्रीजिंगसाठी किती येतो खर्च ?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, अमेरिकेत एका वेळी अंडी काढण्याची किंमत १० हजार डॉलर्सपर्यंत येऊ शकते. यानंतर, अंडी जितके दिवस फ्रीज केली जातात, त्याचा खर्च वेगळा असतो. १० ते १५ वर्षे अंडी फ्रीज करता येतात. भारतात हा खर्च 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त येऊ शकतो. (Top Marathi News)
=======
Health : महिलांनी कॅन्सर होऊ नये म्हणून ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी
=======
एग फ्रीजिंग कोणत्या महिलांसाठी फायदेशीर आहे?
ज्या महिलांना सध्या प्रेग्नन्सी नको आहे, मात्र भविष्यात गर्भधारणेच्या आपल्या क्षमतेबद्दल खात्री हवी आहे, अशा महिला एग फ्रीजिंगचा सुरक्षित पर्याय निवडू शकतात. ज्या महिलांना अनुवांशिक रोग, कॅन्सर, किंवा इतर संसर्गाशी संबंधित रोग किंवा ज्यांचे अवयव निकामी आहेत त्यांच्यासाठी एग फ्रीजिंग हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. (Social News)
(टीप- कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
