Home » Onion : तुमच्या घरातील कांद्यावर काळे डाग असतात का…? मग हा लेख तुमच्यासाठी

Onion : तुमच्या घरातील कांद्यावर काळे डाग असतात का…? मग हा लेख तुमच्यासाठी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Onion
Share

कांद्याशिवाय आपल्या भारतीय लोकांची सकाळच सुरु होत नाही. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कांदा आपल्या जेवणाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. कांद्याचे आरोग्याच्या दृष्टीने असणारे महत्वाचे गुणधर्म बघता कांदा हा सगळ्याच स्वयंपाकाचा राजा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या जेवणाला चव देणारा कांदा, अतिशय गुणी आणि फायदेशीर आहे. उन्हामध्ये तर कांदा अमृतासमान उपयुक्त आहे. (Onion)

कांद्याच्या नियमित सेवनामुळे पचनक्रिया सुधारते. आतड्यांसाठीही कांदा उत्तम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. कांद्याचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. कांदा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचे देखील काम करतो. दररोज कांद्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील काही ऍलर्जी दूर होतात. यासोबतच कांदा डोळ्यांना खाज सुटणे, घसा खाज येणे आणि इतर अनेक सामान्य आजारांपासून मुक्ती देण्याचे काम करतो. याच कांद्यांबद्दल आज आम्ही तुम्हाला एक वेगळी माहिती देणार आहोत. (Health News)

Onion

आपण नेहमीच कांदा बाजारून विकत आणतो आणि जेव्हा तो वापरायला घेतो, तेव्हा कांदा चिरताना आपल्या लक्षात येते की, काही कांद्याच्या आतल्या बाजूला काळ्या रंगाचे डाग असतात. हे डाग आपल्या हाताला देखील लागतात. मात्र आपल्या हे समजत नाही की नक्की कोणते डाग आहेत. शिवाय असे डाग असलेले कांदे खायचे की, फेकून द्यायचे. चुकून असे कांदे खाल्ले तर काही त्रास नाही होणार ना? असे डाग पाण्याने धुऊन मग कांदा चिरून वापर तर चालतो का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. (Social News)

कांद्यावर काळे डाग का पडतात?
कांद्यावर दिसणारे काळे डाग बहुतेकदा बुरशीजन्य संसर्गामुळे होतात. हे काळे डाग ‘ब्लॅक मोल्ड’ किंवा ‘अ‍ॅस्परगिलस नायजर’ नावाच्या बुरशीमुळे कांद्यावर पडतात. ही बुरशी ओलसर आणि उबदार परिस्थितीत वेगाने वाढते. खासकरून तेव्हा जेव्हा कांदे कापल्यानंतर योग्यरित्या वाळवले जात नाहीत किंवा साठवले जात नाहीत. तेव्हा ही समस्या शेतात सुरू होऊ शकते, परंतु बहुतेकदा हे काळे डाग साठवणुकीदरम्यान देखील कांद्यावर येतात. (Top Marathi NEws)

तज्ज्ञांच्या मते अशा बुरशीयुक्त कांद्याचे सेवन केल्याने अनेक आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होऊ शकतात. ही बुरशी जमिनीत आढळणारी एक सामान्य बुरशी असली तरी ती विषारी असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. न्यूमोनिया, ऍलर्जी आणि किडनी फेल होणे आदी आजारांसाठी ही एस्परगिलस नायगर बुरशी जबाबदार असू शकते. ही बुरशी कांद्याप्रमाणे जर्दाळू, द्राक्षे आदी काही खाद्यपदार्थांच्या बाहेरील भागावर देखील काळा थर निर्माण करते. दमा किंवा श्वसनाचा त्रास, फुफ्फुसाचा त्रास असल्यासही असा कांदा खाऊ नये. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. (Marathi Treding News)

Onion

असा बुरशीयुक्त कांदा खावा की नाही?
बहुतकरून हे काळे डाग कांद्याच्या वरच्या आवरणांमध्येच असतात. तज्ज्ञ सांगतात की, कांद्यावरील काळ्या बुरशीपासून वाचण्यासाठी, खाण्याआधी जिथे काळे डाग पडलेले आहेत तो भाग कापून टाकावा. पण जर संपूर्ण कांदा असा काळा बुरशीजन्य झाला असेल तर तो कांदा फेकून देण्यातच भले आहे. हे काळे डाग सहसा कांद्याच्या बाह्य सालीपर्यंत मर्यादित असतात. (Marathi Top News)

=======

हे देखील वाचा : वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?

Muskmelon : उन्हाळ्यात खरबूज खा आणि ‘हे’ चमत्कारिक लाभ मिळवा

========

जर कांदा सोलून धुतला असेल आणि आतील भाग स्वच्छ आणि निरोगी दिसत असेल तर तो खाण्यात काहीही नुकसान नाही. परंतु जर कांद्याच्या आतील भागात डाग पसरले असतील किंवा दुर्गंधी येत असेल तर असा कांदा वापरू नये. यासाठीच कांदा नेहमी थंड, कोरड्या, हवेशीर जागेत साठवणे चांगले असते. ज्यामुळे कांदा काळा पडणार नाही आणि ते खराब देखील होणार नाहीत.(Marathi Latest News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.