वाढत्या उन्हामुळे सगळ्यांच्याच अंगाची लाहीलाही होत आहे. शरीराला थंड ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती विविध उपाय करताना दिसत आहे. थंड पदार्थ खाणे, थंड पेय पिणे, दिवसातून दोन वेळा अंघोळ आदी अनेक गोष्टी करूनही शरीराला आराम मिळत नाही. या कडक उन्हामध्ये थंडगार अनुभव घेण्यासाठी प्रत्येकालाच सर्वात आधी आठवतो तो एसी. एसीच्या थंडगार वाऱ्यामुळे आपल्याला अतिशय शांत आणि निवांत वाटते. त्यामुळे सगळेच लोकं उन्हामध्ये एसी लावणे आणि त्यामध्ये राहणे पसंत करतात. (AC)
दिवसातील अनेक तास आणि रात्री देखील एसीमध्ये राहणे आपल्या शरीराच्या दृष्टीने खूपच घातक आहे. आजच्या काळात जवळपास सर्वच ऑफिसेसमध्ये आणि घरी एसीच आपल्याला पाहायला मिळतात. एसीच्या थंड हवेत बसून काम करताना, आराम करताना आपल्याला छान वाटतं, मात्र हे सुख आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगले नाहीये. हो आज उन्हाळ्यात एसीची थंडगार वाटणारी हवा भविष्यात आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते. मग एसी वापरण्यामुळे नक्की कोणकोणते दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात चला जाणून घेऊया. (Marathi Top News)
लठ्ठपणा
एसीच्या अधिक वापरामुळे लठ्ठपणा वाढतो. थंड ठिकाणी आपल्या शरीराची ऊर्जा अजिबातच खर्च होत नाही, त्यामुळे शरीरावरील चरबी वाढते. एसीमध्ये सतत राहिल्यानं थकवा जाणवतो. थकलेलं शरीर व्यायाम करू शकत नाही. त्यामुळं कॅलरी खर्च होत नाहीत. परिणामी शरीरावर चरबी जमा होत जाते. (Latest News)
=========
हे देखील वाचा : Breast cancer : जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची माहिती आणि लक्षणं
==========
डोकेदुखी
एसीचे तापमान खूपच कमी असेल तर डोकेदुखी आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो. कारण आपल्या मेंदूच्या शिरा तापमानातील बदल पेलू शकत नाहीत.
सर्दी
एसीमधून सामान्य तापमानात किंवा गरम ठिकाणी गेल्यावर आपल्याला ताप येऊ शकतो. एक – दोन दिवस नव्हे तर अनेक दिवस हा ताप राहाण्याची शक्यता असते. सर्दी, ताप यापासून सुरुवात होऊन ताप मेंदूत जाऊ शकतो. उन्हाळ्यात मेंदूत ताप जाण्याचे मुख्य कारण म्हणजे एसीच्या थंडगार हवेतून बाहेर पडून सामान्य तापमानात किंवा अती उष्ण तापमानात जाणे हेच असते. (Top Stories)
कोरडी त्वचा
एसीच्या हवेचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येतात. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा नष्ट होतो आणि आपली त्वचा कोरडी होते. विशेषत: चेहऱ्याची त्वचा ताणली जाते. त्यामुळं तुम्ही दीर्घकाळ एसीत राहात असाल तर, मॉइश्चरायझरचा वापर करणं आवश्यक असते.
सांधे दुखी
सतत एसीच्या कमी तापमानात बसल्यानं गुडघेच नाही तर शरीरातील सगळे सांधे दुखू लागतात. त्यामुळं सांध्यांची कार्यक्षमताही कमी होते. याकरता खुर्चीवर बसल्या बसल्या छोटे, छोटे व्यायाम करणं आवश्यक आहे. तर या त्रासापासून वाचता येईल.
श्वसनावर परिणाम
तापमान आणि आर्द्रतेत अचानक झालेल्या बदलांमुळे आपल्या श्वसन व्यवस्थेवर परिणाम होतो. एसीच्या हवेतून होणाऱ्या संसर्गामुळे दम्यासारखे आजार वाढू शकतात. धुळीची अॅलर्जी होऊ शकते. एसीच्या हवेमुळे राइनाइटिस आणि फेरींगिटिस हे घशाचा दाह आणि जखमांशी संबंधित आजारही होऊ शकतात.
डोळ्यांचा त्रास
एसीमुळे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणाऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. लेन्स वापरत असताना डोळ्यात ओलसरपणा असणं आवश्यक असते; पण एअर कंडिशनरमुळे डोळे कोरडे होतात. त्यामुळं लेन्सवर परिणाम होतो आणि त्या लवकर खराब होतात. त्यातून संसर्ग होण्याचा धोकाही असतो. (Top Trending News)
प्रतिकार शक्ती
उष्णता सहन करण्यासाठी आपलं शरीर घाम निर्माण करते. श्वासोच्छवासाद्वारे किंवा घामाच्या माध्यमातून माणसाचे शरीर उष्णतेपासून सुटका मिळवते, परंतु एसी या दोन्ही क्षमता कमी करतो. त्यामुळं जेव्हा आपण एसीच्या बाहेर जातो तेव्हा आपल्याला जास्त गरम वाटू लागते आणि आजारी पडण्याचा धोका वाढतो. (Social News)
=========
हे देखील वाचा : AC : आता एसी लावताना विजेच्या बिलाचे टेन्शन येते? मग फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
==========
इतर समस्या
* एसी विजेवर चालतो आणि त्याचा सतत वापर केल्याने वीज बिल वाढू शकते.
* एसीमधून येणारी थंड हवा ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरू शकते.
* एसीच्या थंड हवेमुळे खोलीतील आर्द्रता वाढू शकते, ज्यामुळे बुरशी सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Health News)
एसीमुळे होणाऱ्या हानीपासून शरीराची काळजी कशी घ्यावी?
* जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळे शरीर हायड्रेट राहील.
* एसीचे तापमान २४ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा कमी सेट करू नका.
* त्वचा कोरडी होऊ नये, म्हणून मॉइश्चरायझर क्रीम लावा.
* खोलीचे तापमान थंड झाल्यावर काही काळ एसी बंद करा.
* एसीची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा.
* एसीसमोर बसणे किंवा झोपणे टाळा.