Home » Hindu : हिंदू धर्मात मनुष्यावर केले जाणारे १६ संस्कार कोणते?

Hindu : हिंदू धर्मात मनुष्यावर केले जाणारे १६ संस्कार कोणते?

by Jyotsna Kulkarni
0 comment
Hindu
Share

जगातील अतिशय प्राचीन धर्म म्हणून हिंदू धर्माची ओळख आहे. हिंदू धर्मामध्ये संस्कार आणि संस्कृती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्म टिकावा यासाठी आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी प्रत्येक मनुष्याला संस्कारांशी जोडले आहे. अगदी जेव्हा विटाळापासून गर्भ तयार होतो तेव्हापासून ते त्या व्यक्तीचा मृत्यू होतो तिथपर्यंत हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीवर १६ संस्कार केले जातात. या १६ संस्कारांना हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. हिंदू धर्मात मानवी जीवनाच्या पवित्रतेसाठी आणि शुद्धीकरणासाठी जन्मापूर्वीपासून (गर्भधारणेपासून) ते मृत्यूपर्यंत १६ प्रमुख संस्कार (षोडश संस्कार) सांगितले आहेत, जे जीवनाचे टप्पे अधोरेखित करतात. हे संस्कार व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि नैतिक विकासासाठी महत्त्वाचे मानले जातात. मात्र हे १६ संस्कार कोणते आणि त्यांचा नेमका अर्थ काय जाणून घेऊया. (Hindu)

गर्भाधान संस्कार :
गर्भाधान हा सोळा संस्कारात पहिला संस्कार. गर्भाधान म्हणजे स्त्रीच्या गर्भात गर्भाची स्थापना होणे. या संस्कारात विशिष्ट मंत्र आणि होमहवन यांद्वारे देहशुद्धी केली जाते. योग्य गर्भधारणा होऊन पिंडशुद्धी व्हावी या दृष्टीने हा संस्कार केला जातो. या संस्काराचे महत्व सांगणारी एक कथा देखील आहे. आई आणि वडील असे दोघे दैत्य कुळातील असून देखील त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आला. असे म्हणतात की देवर्षी नारद मुनींनी गर्भ धारणेच्या आधी भक्त प्रल्हादाच्या आईला गर्भाधान संस्काराचे महत्व समजावून सांगितले होते. आजच्या काळात लग्न झाल्यानंतर साधारणपणे २ दिवसानंतर सत्यनारायणाच्या पूजेद्वारे गर्भाधान संस्काराचे महत्व सांगितले जाते. (Religious)

पुंसवन संस्कार :
पुंसवन संस्कार हा संस्कार स्त्रीने गर्भधारणा केल्यावर साधारणपणे तिसऱ्या महिन्यात केला जातो. सुदृढ संतती जन्माला येण्याच्या उद्देशाने हा संस्कार केला जातो. वैद्यक शास्त्रानुसार गर्भधारणेनंतर साधारणपणे ४ महिन्यापर्यंत लिंगभेद होऊ शकत नाही म्हणून मुलगा किंवा मुलगी हा भेद होऊ नये म्हणून हा संस्कार तिसऱ्याच महिन्यात केला जातो. तिसऱ्या महिन्यानंतर गर्भातील शिशूचा मेंदू विकसित होण्यास सुरुवात होते आणि ते गर्भातील बाळ विविध गोष्टी आत्मसात करायला सुरुवात करते. या संस्काराचे एक उदाहरण म्हणजे एका कथेनुसार अभिमन्यूने माता द्रौपदीच्या गर्भातच चक्रव्यूह नीतीचे ज्ञान मिळवले होते. (Todays Marathi Headline)

Hindu

अनवलोभन संस्कार :
अनवलोभन आणि पुंसवन हे जवळपास सारखेच संस्कार आहेत. हा संस्कार पती द्वारे केला जातो.पुंसवन हा तिसऱ्या महिन्यात तर अनवलोभन हा संस्कार चौथ्या महिन्यात केला जातो. या संस्काराद्वारे ३ गोष्टी साध्य केल्या जातात. गर्भ सुदृढ होतो. गर्भपात होण्याची शक्यता कमी होते. तसेच मुलं पूर्ण दिवस झाल्यावर जन्माला येते. (Top Stories)

सीमंतोन्नयन संस्कार :
सीमंतोन्नयनचा अर्थ पत्नीच्या मस्तकातील पंचसंध. या पंचसंधास सीमांत असे म्हणतात. त्याचे उन्नयन म्हणजे वृद्धीकरण करण्या करिता सीमंतोन्नयन संस्कार करतात. हा संस्कार साधारणपणे गर्भ धारणेनंतर सहाव्या किंवा आठव्या महिन्यात केला जातो. याच संस्काराला डोहाळे जेवण असे देखील म्हणतात. सीमंतोन्नयन म्हणजेच सौभाग्य संपन्न होणे. या संस्काराद्वारे सौभाग्यवती स्त्रिया एकत्र जमून गर्भवती स्त्रीचे कौतुक करतात तसेच तिच्या मन प्रसन्न राहण्याची कामना करतात. तसेच या संस्काराद्वारे गर्भवती स्त्री शिशुमध्ये चांगले गुण, विचार यावेत म्हणून त्या पद्धतीनेच स्वतःला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करत असते. (Top Marathi Headline)

जातकर्म संस्कार :
हा संस्कार बाळ जन्माला आल्यानंतर त्याची नाळ कापण्याआधी केला जातो. या संस्काराद्वारे वैदिक मंत्राचे उच्चारण करून वडिलाद्वारे बाळाला मध आणि दही चाटवले जाते आणि त्याच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली जाते. या नंतर माता बाळाला स्तनपान सुरु करते. पण काळाच्या ओघात हा संस्कार काहीसा मागे पडला आहे. पूर्वी स्त्रीची प्रसूती ही घरीच होत असे पण आता दवाखान्यात होत असल्या कारणाने हा संस्कार करणे शक्य होत नाही. पण काही लोकं बाळाच्या जन्मानंतर त्याला मध चाटवतात. (Social Updates)

========

Ekadshi : भगवान शिवांना समर्पित असलेल्या एकमेव अशा रंगभरी एकादशीचे महात्म्य

========

नामकरण संस्कार :
नामकरण म्हणजे जन्माला आलेल्या बाळाचे नाव ठेवणे. बाळ जन्माला आल्यावर बाराव्या दिवशी नामकरण संस्कार केले जातात. बाळाच्या कुंडलीवरून त्याचे नाव ठेवले जाते. पूर्वी प्रत्येक व्यक्तीची २ नावे असायची. एक जन्म नाव आणि दुसरे व्यावहारिक नाव. व्यावहारिक नाव म्हणजे, जे आपण दैनंदिन जीवनात वापरतोत. व्यावहारिक नाव ठेवण्याच्या सोहळ्याला आपण बारसे म्हणतो. बरेच वेळेस जन्म नाव आणि व्यावहारिक नाव हे वेगवेगळ्या दिवशी ठेवल्यामुळे हा संस्कार २ वेळेस पार पडतो. (Latest Marathi Headline)

निष्क्रमण संस्कार :
निष्क्रमण म्हणजे बाहेर घेऊन जाणे. हा संस्कार बाळ जन्माला आल्यावर साधारणपणे चौथ्या महिन्यात केला जातो. यामध्ये बाळाला सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशात नेले जाते. सूर्यासारखे तेज आणि चंद्रासारखी शीतलता बाळामध्ये यावी हा त्यामागील मूळ हेतू असतो. या संस्काराचा अजून एक हेतू म्हणजे पंचमहा भूतांशी बाळाचा संबंध घडवून आणणे. पंच महाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. या संस्कारातून एक वैज्ञानिक हेतू पण साध्य होतो. बाळाला सूर्य प्रकाशात घेऊन गेल्याने “ड” जीवनसत्व भेटण्यास मदत होते. (Top Marathi News)

अन्नप्राशन संस्कार :
हा संस्कार बाळ जन्माला आल्यावर साधारणपणे सहाव्या महिन्यात करतात. मुलगा असेल तर सहाव्या किंवा आठव्या महिन्यात आणि मुलगी असेल तर पाचव्या किंवा सातव्या महिन्यात हा संस्कार केला जातो. या संस्काराद्वारे देवतांची पूजा करून बाळाला सात्विक अन्न खायला दिले जाते. हा संस्कार सहाव्या महिन्यात करण्याचे कारण एक म्हणजे बाळाला नुकतेच दात यायला सुरुवात झालेली असते तसेच पहिले सहा महिने बाळासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आहार मानला गेला आहे. बाळाला सहा महिन्यानंतर आईच्या दुधा व्यतिरिक्त इतर पौष्टिक आहार मिळावा हा मूळ उद्देश आहे या संस्काराचा. (Top Trending Headline)

मुंडन संस्कार :
हा संस्कार बाळाच्या पहिल्या, तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी केला जातो. याच संस्काराला जावळ काढणे असे देखील म्हणतात. या संस्काराद्वारे बाळाच्या डोक्यावरील केस काढले जातात. शुद्धता हा या संस्काराचा मूळ हेतू आहे. बाळ नऊ महिने आईच्या पोटात वाढल्यावर आणि जन्माला आल्यानंतर त्याच्या डोक्यावरील केस हे दूषित मानले जातात. त्यामुळे या संस्काराद्वारे डोक्यावरील केस काढून बौद्धिक आणि शारीरिक शुद्धता करण्याची प्रथा आहे. (Latest Marathi News)

Hindu

कर्णवेध संस्कार :
हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणून या संस्काराला ओळखले जाते. प्रत्येक हिंदू धर्मातील स्त्री, पुरुष यांचा कर्णवेध संस्कार केलाच जातो. या संस्काराद्वारे बाळाचे कान टोचले जातात. या संस्काराद्वारे बरेच शास्त्रीय तसेच वैज्ञानिक हेतू साध्य केले जातात. कानाला छेद दिल्यानंतर त्याचा उपयोग अलंकार घालण्यासाठी केला जातो. तसेच कर्णवेधांमुळे राहू आणि केतूच्या प्रभावापासून बचाव होतो असा देखील समज आहे. कर्णवेधांमुळे मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह देखील सुरळीत होतो. तसेच यामुळे श्रवण शक्ती देखील वाढायला मदत होते. (Marathi News)

अक्षरारंभ संस्कार :
हा संस्कार साधारणपणे बालकाच्या पाचव्या वर्षी केला जातो जेव्हा बाळाचे वय विद्या ग्रहण करण्यासाठी योग्य होते. या संस्काराद्वारे एखाद्या शुभ दिवशी सरस्वती पूजन करून बालकडून श्री आणि ओम असे लिहून घेतले जाते. याच संस्काराला विद्यारंभ संस्कार असे देखील म्हणतात.

उपनयन संस्कार :
उपनयन संस्कारलाच मुंज संस्कार असे देखील म्हणतात. उप म्हणजे जवळ आणि नयन म्हणजे घेऊन जाणे. म्हणजेच गुरु जवळ घेऊन जाणे. पूर्वीच्या काळी हा संस्कार केल्यानंतर बालकाला गुरु घरी पुढील शिक्षणासाठी घेऊन जाण्याची पद्धत होती. या संस्काराद्वारे बालकाला गायत्री मंत्राचा उपदेश दिला जातो आणि त्याला तीन धागे असलेले जानवे म्हणजेच यज्ञोपवीत घातले जाते. हे जानवे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे सूत्र मानल्या गेले आहे. हिंदू धर्मात हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य समाजात केल्या जातो. या तीन समाजात हा संस्कार करण्याचे एक कारण असे असू शकते कि पूर्वीच्या काळी हे तीन समाज गुरू घरी विद्या ग्रहणासाठी जात असत. पण काळानुसार हा संस्कार आजकाल फक्त ब्राह्मण समाजच करताना दिसतो. हा संस्कार बालकाच्या आठव्या वर्षी करणे अपेक्षित असते. तसेच या संस्काराद्वारे बालकाला ब्रहमचर्य व्रताचा उपदेश दिल्या जातो. (16 Sanskar)

वेदारंभ संस्कार :
उपनयन संस्कारानंतर वेदारंभ संस्कार पार पाडल्या जातो. हा संस्कार शिक्षा ग्रहणाशी संबंधित आहे. प्राचीन काळी शिष्य गुरु घरी वेदाभ्यास करण्यासाठी जात असे. वेद म्हणजे ज्ञान आणि आरंभ म्हणजे सुरुवात करणे म्हणजे गुरु घरी जाऊन वेदांचा अभ्यास सुरु करणे. वेदांना भारतीय संस्कृतीत अति प्राचीन साहित्य तसेच ज्ञान भांडार मानले आहे. अध्ययनानुसार चार वेद म्हणजे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वेदारंभ सुरु करण्याआधी गुरु आपल्या शिष्यांना ब्रह्मचर्य व्रत तसेच संयमित जीवन जगण्याची प्रतिज्ञा घ्यायला लावत. कारण या दोन गोष्टींशिवाय वेदाभ्यास शक्य नाही असे मानले जात असे. मात्र सध्याच्या आधुनिक काळात आणि बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार या संस्काराचे स्वरूप काहीसे बदलले आहे किंवा मागे पडले आहे. (Hindu Religious)

केशांत संस्कार :
आधीच्या काळात गुरुकुलमध्ये राहून मुलांचे शिक्षण पूर्ण व्हायचे. तेव्हा त्यांना केशांत संस्कार केला जायचा. या संस्कारानंतर, मुलांना प्रथमच दाढी करण्याची परवानगी दिली जायची.

समावर्तन संस्कार :
शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा एखादा मुलगा आपल्या गुरूंच्या इच्छेनुसार ब्रह्मचर्यानंतर घरी परततो, त्याला समवर्तन संस्कार म्हणतात.

==========

Narsimha Dwadashi : नरसिंह द्वादशी का साजरी केली जाते?

==========

विवाह संस्कार :
विवाह संस्काराद्वारे स्त्री आणि पुरुष हे अग्नी तसेच समाज आणि नातेवाईंकांच्या साक्षीने पती पत्नीच्या भूमिकेत एकमेकांसोबत लग्न नावाच्या बंधनात बांधले जातात. हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम हे चार मनुष्याच्या जीवनाचे टप्पे सांगितले गेले आहेत. त्यातील गृहस्थाश्रमाची सुरुवात ही खऱ्या अर्थाने विवाह संस्कारानेच होती. हिंदू हा एकमेव धर्म असून या विवाह संस्कारानुसार पती आणि पत्नीचा सात जन्माचा संबंध मानला गेला आहे. कदाचित या मान्यतेनुसारच लग्नात सप्तपदी होते. विवाह संस्कारालाच पाणिग्रहण संस्कार असे देखील म्हणतात. यातील ३ सर्वात महत्वाचे विधी म्हणजे लज्जाहोम, कन्यादान आणि सप्तपदी. सप्तपदीच्या विधीमध्ये पुरुष स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो त्यानंतर त्या दोघाना पती पत्नी म्हणून मान्यता मिळते. (Top Marathi Stories)

अंत्येष्टी किंवा अंतिम संस्कार :
अंत्येष्टी संस्कार हा संस्कार व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरावर केला जातो. या संस्काराद्वारे मृत व्यक्तीचे शरीर पंच महाभूतात विलीन होऊन कायमचे मुक्त होते. म्हणूनच या संस्काराला अंतिम संस्कार असे देखील म्हणतात. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. मृत व्यक्ती पंचमहा तत्वात पूर्णपणे विलीन व्हावा म्हणूनच हिंदू संस्कृती नुसार मृत शरीराला दफन करण्याऐवजी दहन केले जाते. अंतिम संस्कारात यम देवतेची स्तुती केल्या जाते तसेच प्रार्थनेद्वारे अग्नीला मृत शरीर सामावून घेण्याची विनंती केल्या जाते. (Social News)

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.