Knee pain yoga- आजकाल औषध घेण्यापेक्षा व्यायाम आणि योगा करुन बरे होण्याकडे लोक वळत आहेत. कोणताही आजार झाल्यास तर आजीच्या बटव्यातील औषध आपण घेतोच पण तरीही लोक स्वत: ला फिट ठेवण्यासाठी योगाभ्यास करण्याकडे अधिक लक्ष देत आहेत. दुखणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे किंवा तणाव दूर करणे अशा विविध गोष्टींसाठी योगाभ्यास हा फार फायदेशीर ठरतो. खरंतर योगा मानसिकतेसह शारिरीक रुपात ठिक राहण्यासाठी योगा हा सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा बनवला आहे. अशातच आपण आज जर तुम्हाला गुडघे दुखण्याची समस्या असेल तर त्यासाठी कोणती योगासने केली पाहिजे हे आम्ही सांगणार आहोत.
-गुडघे दुखण्याच्या समस्येपासून योगाभ्यास कशी मदत करतो?
गुडघे दुखण्याच्या समस्येबद्दल बोलायचे झाल्यास एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यास योगाला ऑस्टियोअर्थराइटिस मध्ये प्रभावी मानले गेले आहे. ऑस्टियोअर्थराइटिस गाठींच्या सर्वात समस्यांच्या प्रकारांपैकी एक आहे. त्या शरिरातील कोणत्याही भागाला प्रभावित करतात. पण त्यामध्ये गुडघ्यांना अधिकच त्रास होतो. अशातच गुडघ्यांच्या दुखण्यासाठी योगाभ्यासात काही योगासनं दिली आहेत जी गुडघे दुखण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम देतात.
संशोधनात असे मानले गेले आहे की, योगामुळे कार्टिलेजमध्ये प्रोटिओग्लाइकन वाढवू शकते. ज्यामुळे कार्टिलेजच्या नुकसानीपासून बचाव होतो. जर सोप्प्या शब्दात बोलायचे झाल्यास ते मांसपेशींच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरु शकतात. जर औषधांसोबतच योगा केला तर तुमच्या गुडघ्यांच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळू शकतो.
-गुघडे दुखीवर योगासनं
-वीरासन
गुडघे दुखीवर वीरासन हे फार फायदेशीर आहे. हा संस्कृत भाषेतील शब्द असून आधीच्या काळात योद्धे हे युद्ध केल्यानंतर याच मुद्रेत बसायचे. जेणेकरुन ते आराम करु शकतात आणि सतर्क राहू शकतात. याला इंग्रजीत हिरो पोज असे ही म्हटले जाते. कोणत्याही दुखण्यापासून लढण्यासाठी व्यक्तीला युद्धात हिरो प्रमाणे आतमधून मजबूत होणे गरजेचे असते. असे मानले जाते की, वीरासन हे योगासन शरिर आणि मन या दोघांना शक्ती देऊ शकतो.
-मालासन
वीरासन प्रमाणेच मालासन सुद्धा संस्कृतातून घेतलेला आहे. हे आसान मल त्याग करण्याच्या मुद्रेत बसण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे. याला इंग्रजीत गारलँन्ड पोज असे म्हटले जाते. हे योगासन हटयोगाचा भाग आहे. एनसीबीआयच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार हटयोग गुडघ्यांसाठी ऑस्टियोअर्थराइटिससाठी उपयोगी पडते. हटयोगानंतर रुग्णांच्या गुडघ्यांच्या दुखणे फार कमी झाल्याचे दिसून आले. मालासानाबद्दल बोलायचे झाल्यास हे योगासन केल्यानंतर पायांमध्ये रक्ताचा पुरवठा सुरळीत होण्यासह पाठ आणि कंबरेसाठी सुद्धा उपयोगी ठरु शकतो.(Knee pain yoga)
हे देखील वाचा- अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ असते टॉन्सिल्सची सूज, जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय
-मकरासन
मकरासनला इंग्रजीत क्रोकोडाइल पोज असे म्हटले जाते. मकर म्हणजे मगर आणि आसन म्हणजे बसण्याची मुद्रा. या आसनात व्यक्ती नदीत असलेल्या मगरीसारखे शांत मुद्रेत पोटाच्या जोरावर झोपतो. हे आसन खासकरुन कंबर आणि श्वसनासाठी फायदेशीर मानले जाते. त्याचसोबत गुडघ्यांच्या दुखण्यासह पायांच्या नसांना सुद्धा आराम देते.