Home » केके मोहम्मद यांचे योगदान महत्त्वाचे…

केके मोहम्मद यांचे योगदान महत्त्वाचे…

by Team Gajawaja
0 comment
KK Mohammed
Share

22 जानेवारी 2024 ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तशी राममंदिराबाबतची उत्सुकता वाढत आहे.  याच दिवशी प्रभू श्रीराम त्यांच्या भव्य अशा मंदिरात विराजमान होणार आहेत.  या दिवशी गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार आहे.  आता या भव्य मंदिरासंदर्भात नवनव्या बातम्या येत आहेत, तसेच या मंदिरासाठी ज्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, त्यांचीही नावं पुढे येत आहेत.  

यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे, केके मोहम्मद.  केके मोहम्मद (KK Mohammed) यांच्या एका वक्तव्यानं वर्षानुवर्षे प्रभू रामाचे मंदिर कुठे होतं हे स्पष्ट झालं.   केके मोहम्मद यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतरच न्यायालयानं राममंदिराबाबतचा निकाल जाहीर केला आणि राममंदिराचा मार्ग सुकर झाला.  या राममंदिर उभारणीत केके मोहम्मद यांची ही भूमिका महत्त्वाची ठरली आहे.  

के.के. मोहम्मद (KK Mohammed) हे प्रसिद्ध भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ आहेत.  मोहम्मद हे  भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे प्रादेशिक संचालक होते.   सध्या ते आगा खान कल्चर ट्रस्टमध्ये पुरातत्व प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत.  मोहम्मद यांनी राममंदिरसंदर्भात केलेल्या कार्याचा गौरव होत आहे.  मात्र या मोहम्मद यांनी भारतातील जवळपास 120 मंदिरांच्या उत्खलन केले आहे, आणि त्यांच्या पुर्नबांधणीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.  याशिवाय छत्तीसगडमधील जगदलपूरजवळील दंतेवाडा जिल्ह्यातील बरसूर आणि समलूर या मंदिरांची पुर्नबांधणीही मोहम्मद यांच्या धोरणी स्वभावातून झाली आहे.  छत्तीसगडमधील हा सर्व भाग नक्षलवादी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखले जातो. 2003 मध्ये केके मोहम्मद यांनी नक्षलवाद्यांबरोबर या भागातील पुरातन मंदिरांबाबत बोलणी केली.  मंदिरांचे महत्त्व आणि त्याचा पौराणिक वारसा नक्षलवाद्यांना पटवून दिला.  त्यानंतर या मंदिराचे नव्यानं जतन करण्यात आले.   

के.के. मोहम्मद (KK Mohammed) यांचा जन्म केरळमधील कालिकत येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  मरियम आणि बीरन कुट्टी हाजी ही त्यांच्या आईवडिलांची नावे.  सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, कोदवली येथे स्थानिक भाषेत त्यांचे शिक्षण झाले.  त्यानंतर त्यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, पुरातत्व सर्वेक्षण, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी आणि पुरातत्व विषयात पदव्युत्तर पदविका संपादन केली.  पुरातत्व विभागात महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असतांना मोहम्मद यांनी आपल्या विभागासाठी आवश्यक असे अनेक अभ्यासक्रम केले आहेत.  त्यांच्या फक्त राममंदिर संदर्भातील कामाची नोंद घेण्यात येते. 

मात्र मोहम्मद (KK Mohammed) यांनी अन्यही मंदिरांबाबतचा इतिहास शोधून काढला आहे.  फतेहपूर सिक्री येथे अकबराने बांधलेले उत्तर भारतातील पहिले ख्रिश्चन चॅपल त्यांनी शोधले.  सम्राट अशोकाने बांधलेला केसरीचा बौद्ध स्तूप त्यांनी शोधला.  शिवाय राजगीरमधील बौद्ध स्तूप शोधून उत्खनन केले, कोल्हू, वैशाली येथील बौद्ध पुरातत्व स्थळाचे उत्खनन केले.  याशिवाय केरळमधील मलापुरम जिल्ह्यामध्ये पौराणिक काळातील भुयारं शोधून त्यातील चित्रांचे जतन करण्याबाबत महत्त्वाचे काम केले आहे.  यासोबत ग्वाल्हेरपासून तासभराच्या अतंरावर असलेल्या प्राचीन शिव आणि विष्णु मंदिरांच्या संकुलाचे जतन करण्याचे महत्त्वाचे काम मोहम्मद यांनी पार पाडले आहे. 

=============

हे देखील वाचा : बोटाच्या आकाराचा फोन, किंमत फक्त 2 हजार रूपये

=============

ही मंदिरे 200 वर्षांपूर्वी गुर्जरा-प्रतिहार राजवटीत 9व्या ते 11व्या शतकात बांधली गेली होती. मात्र या सर्व भागावर डाकूंचे वर्चस्व होते.  देखभालीअभावी मंदिरांची पडझड होत होती.  या मंदिरांचे पौराणिक महत्व जाणून मोहम्मद यांनी डाकू  निर्भयसिंग गुजर आणि अन्य डाकूंबरोबर चर्चा केली. यासाठी त्यांनी अनेक धमक्याही मिळाल्या.   पण मंदिरांचा जीर्णोद्धार किती महत्त्वाचा आहे, हे त्यांनी डाकूंना पटवून दिले.  मोहम्मद यांची जिद्द आणि मंदिरांप्रती असलेले त्यांचे प्रेम बघून डाकूंनी स्वतःहून हा भाग त्यांच्या स्वाधिन केला, आणि दुसरीकडे प्रस्थान केले.  त्यानंतर या भागाला पोलीसांनी ताब्यात घेतले आणि मग मंदिरांचे पुर्ननिर्माण झाले.  

याच केके मोहम्मद (KK Mohammed) यांचे नाव राममंदिरानंतर सर्वमुखी झाले.  1990 मध्ये राममंदिरासदर्भात जे उत्खलन होत होते, त्या टिमचा केके मोहम्मद हे एक भाग होते.   हे उतखलन झाल्यावर राम मंदिराचे पुरावे सापडल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले.  त्यांच्या या विधानानं बराच वाद झाला.  मोहम्मद यांना त्यांच्या समाजातर्फे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.  काही वर्ष मोहम्मद घरात कैद झाले होते.  पण ते या सर्वांनंतरही आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.  बाबरी मशिद ही मंदिर तोडून उभारण्यात आली आहे, हे त्यांचे विधान या खटल्याला कलाटणी देणारे ठरले आणि आत्ताच्या भव्य दिव्य मंदिराची उभारणी होऊ शकली.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.