Home » बटाट्याची साल फेकून देण्याएवजी घराच्या स्वच्छतेसाठी असा करा वापर

बटाट्याची साल फेकून देण्याएवजी घराच्या स्वच्छतेसाठी असा करा वापर

तुम्ही घराच्या स्वच्छतेसाठी मार्केटमधून महागडे क्लिनर खरेदी करत असाल तर थांबा. कारम बटाट्याची साल तुमच्या कामी येऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
Kitchen Hacks
Share

Kitchen Hacks : बटाट्याचा बहुतांश भाज्यांमध्ये वापर केला जातो. यापासून वेगवेगळे पदार्थही तयार केले जातात. खरंतर, काही पदार्थ तयार करण्यासाठी बटाट्याच्या सालीचा वापर केला जात नाही. पण तुम्हाला माहितेय का, बटाट्याची साल तुम्हाला घराची स्वच्छता करण्यास कामी येऊ शकते? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…

बटाट्याच्या सालीपासून घराची स्वच्छता
-बटाट्याच्या सालीमध्ये स्टार्च असते. यामुळे किचन स्वच्छ करण्यासाठी बटाट्याची साल कामी येऊ शकते. यासाठी बटाट्याची साल घेऊन स्टोव्ह, ओव्हन अथवा गॅस जेथे चिकटपणा आहे तेथे घासा. थोडावेळ बटाट्याच्या सालीचा रस तसाच राहू द्या आणि नंतर ओलसर कापडाने पुसून घ्या. यामुळे चिकटपणा दूर होईल.

-बटाट्याच्या सालीचा वापर करत घरातील काचा आणि आरसा स्वच्छ केला जाऊ शकतो. यामुळे काचेवर असणारे डाग दूर होतात. बटाट्याच्या ओलसर साली घेऊन त्या काचा अथवा आरश्यावर घासा. यानंतर पेपर टॉवेलने पुसा.

-बटाट्याचा रस केवळ लाकडाचे फर्निचर स्वच्छ होतेच. पण फर्निचरला एक वेगळी चमकही येते. यासाठी तुम्ही बटाट्याची साल फर्निचरवर घासा आणि थोडावेळ तशीच ठेवा. यानंतर सुती कापडाने पुसून घ्या. (Kitchen Hacks)

-लोखंडाच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बटाट्याच्या सालीची मदत घेऊ शकता. यामध्ये असलेले ऑक्सिलिक अॅसिड लोखंडाला आलेला गंज दूर करण्यास मदत करते. यासाठी बटाट्याची साल लोखंडाच्या वस्तूवर घासा आणि ओलरस कापडाने त्याचा रस पुसून घ्या.


आणखी वाचा :
ही’ काळजी घ्या आणि लुटा पाऊसाचा मनमुराद आनंद
‘या’ लघुग्रहामुळे पुन्हा एकदा पृथ्वीवरील सजीवांना धोका

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.