Home » किचनमधील चिकट झालेले डबे मिनिटांत होतील स्वच्छ, वापरा या ट्रिक्स

किचनमधील चिकट झालेले डबे मिनिटांत होतील स्वच्छ, वापरा या ट्रिक्स

किचनमध्ये जेवण तयार करताना त्यावेळी भिंतीसह डब्यावर तेल-तूप उडले जाते. यामुळेच किचनमधील डबे तेलकट आणि काळे पडतात. चिकट झालेले किचनमधील डबे स्वच्छ करण्यासाठीचीच सोपी ट्रिक पाहणार आहोत.

by Team Gajawaja
0 comment
Kitchen Hacks
Share

Kitchen Hacks : किचनमध्ये दररोज वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच किचनच्या स्वच्छतेची बाब येते तेव्हा प्रत्येकालाच कंटाळा येतो. यामागील कारण म्हणजे भिंतींला लागलेले डाग आणि चिकट झालेले डबे स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागगेत खरंतर, आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांनी एका किचनमध्ये स्वच्छता करावी. जेणेकरुन किचनमधील डब्यांवरील चिकटपणा दूर राहिल. पण यासाठी ट्रिक काय जाणून घेऊया….

बेकिंग सोडा
घराच्या स्वच्छतेची बाब येते तेव्हा भिंतींची चमक पुन्हा आणण्यासाठी बेकिंग सोडा फार कामी येतो. अशातच किचनच्या डब्यांवर लागलेला चिकटपणा दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घेऊन लिक्विड तयार करून घ्या. तयार केलेले सिक्विड स्प्रे बॉटल अथवा कापडावर टाकून चिकट झालेले डबे स्वच्छ करा.

बोरेक्स पावडर
बोरेक्स पावडरच्या मदतीने तुम्ही किचनमध्ये काळवंडलेले आणि चिकट झालेले डबे स्वच्छ करू शकता. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यामध्ये लिंबाची साल टाका.आता पाणी गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे बोरेक्स पावडर टाका. पेस्ट तयार केल्यानंतर चिकट झालेल्या डब्यांवर लावून डबे स्वच्छ धुवा. (Kitchen Hacks)

डिटर्जेंटचा वापर
तुमच्याकडे बेकिंग सोडा अथवा बोरेक्स पावडर नसल्यास चिंता करू नका. गरम पाणी आणि डिटर्जेंटच्या मदतीने तुम्ही किचनमधील चिकट डब्यांची स्वच्छता करू शकता. यासाठी गरम पाण्यात एक चमचा डिटर्जेंट पावडर टाका. यामध्ये थोडावेळसाठी चिकट डबे बुडवून ठेवल्यानंतर स्पंजने स्वच्छ धुवा. असे केल्याने डब्यावरील चिकट डाग मिनिटांमध्ये गायब होतील.


आणखी वाचा :
भारतातील या हिल स्टेशनला फिरायला जाताय? काढावा लागेल E-Pass, असा करा अर्ज
स्पेशल ट्रेनमध्ये कमी खर्चात तिकीट बुकिंग करायचे असल्यास ‘या’ टिप्स करा फॉलो

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.