किचन कोणत्याही घरातील एक महत्त्वपूर्ण हिस्सा असते. महिलांचा बहुतांश वेळ हा किचनमध्येच जातो. किचन हे असे एक स्थान आहे जेथून घरातील लोकांना उर्जा मिळते.कारण या ठिकाणी अन्न शिजवले जाते आणि येथे अन्नपूर्ण देवतेचा वास असल्याचे मानले जाते. घरातील हा हिस्सा जर योग्य ठिकाणी नसेल तर घरातील लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होतो. स्वयंपाकघर हे वास्तुनुसार असणे अत्यंत गरजेचे असते. जेणेकरुन घरातील लोकांवर सकारात्मक प्रभाव पडला जाईल. (Kitchen as per vastu)
बहुतांश लोक घर तयार करतात मात्र जेवणाची खोली किंवा त्याच्या स्थानाकडे लक्ष देत नाहीत. पुढे जाऊन त्यांना याचा पश्चाताप होतो. वास्तुनुसार किचन असेल तर घरात आनंदाचे वातावरण राहते. किचन तयार करताना वास्तुशास्रातील कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याच बद्दल आपण जाणून घेऊयात.
किचनची दिशा
किचन नेहमीच दक्षिण पूर्व किंवा आग्नेय कोनात असले पाहिजे. या दिशेला किचन असणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिशेला अग्नी म्हणजेच उर्जेचा वास असतो. मात्र एखाद्या कारणास्तव त्या दिशेला किचन उभारणे शक्य नसेल तर तुम्ही मध्य पूर्व किंवा उत्तर पश्चिमेला सुद्धा तयार करू शकता.
खिडक्यांची दिशा
किचनमध्ये नेहमीच पुरेसा उजेड येईल याची काळजी घेतली पाहिजे. वास्तुनुसार किचनची खिडकी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी.
किचनचा रंग
किचनच्या भींतींचा रंग नेहमीच हलका असावा. वास्तुनुसार किचनची भिंत आणि कपाट पिळवा किंवा नारंगी रंगाचे असावे. काळ्या किंवा निळ्या रंगाचा वापर किचनमध्ये करू नये.
गॅसची दिशा
वास्तुनुसर घरातील गॅसची दिशा नेहमीच आग्नेय दिशेला असावी. तर जेवण शिजवताना गॅसचे तोंड पूर्व दिशेला असेल असे ठेवा.
किचनमधील सिंकचे स्थान
वास्तुनुसार किचनमधील सिंक आणि पाणी पिण्याचे स्थान नेहमीच उत्तर पूर्व दिशेला असावे. अग्नि आणि जल एकत्रित असल्यास वास्तु दोष निर्माण होतो. त्यामुळे एकाच ठिकाणी चूल आणि सिंक ठेवू नये. (Kitchen as per vastu)
हेही वाचा- बुट-चप्पलांमुळे घरात येऊ शकते दारिद्र, जाणून घ्या वास्तूसंबंधित नियम
वीजेच्या उपकरणांचे स्थान
वीजेच्या उपकरणांचे स्थान जसे की, गॅस, माइक्रोवेव, स्टोव हा दक्षिण पूर्ण दिशेला आणि फ्रिज उत्तर-पश्चिम दिशेला ठेवू शकता. अग्नि आणि उर्जेसंबंधित सर्व उपकरणे तुम्ही वास्तुनुसार दक्षिण पूर्वेला ठेवा. वास्तुनुसार अग्नीसंबंधित उपकरणे ठेवल्यास ती खराब होत नाहीत आणि दुर्घटना होण्यापासून ही दूर राहता.