Home » चीनने बनवले अनोखे Kissing Device, लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप कपल्ससाठी आहे खास

चीनने बनवले अनोखे Kissing Device, लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिप कपल्ससाठी आहे खास

by Team Gajawaja
0 comment
Kissing Device
Share

चीनच्या तंत्रज्ञानाबद्दल कोणीही त्यांचा हात पकडू शकत नाहीत. जेव्हा एखादे डिवाइस आपण खरेदी करतो तेव्हा ते बहुतांश करुन मेड इन चाइनाचे असतात. तसे प्रोडक्टवर लिहिलेले ही असते. अशातच आता चीनने लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपसाठी एक स्पेशल डिवाइस लॉन्च केले आहेत. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल ही झाले आहेत. (Kissing Device)

साउथ चाइना मॉर्निंगच्या एका पोस्टनुसार, या डिवाइसमध्ये ओठ हे सिलिकॉनचे बनवण्यात आले आहेत. यामध्ये एक सेंसरचा ही वापर करण्यात आला आहे. या डिवाइसच्या माध्यमातून किस करण्याचा अनुभव येऊ शकतो. चीनच्या न्यूज एजेंसी सिचुआन गुंचा यांनी २० फेब्रुवारीला असे म्हटले की, याचा वापर मोबाईल अॅपच्या माध्यमातून ही केला जाऊ शकतो. चीनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओवर या डिवाइसची किंमत जवळजवळ २६० युआन आहे. अशातच प्रत्येक महिन्याला हे डिवाइस १०० पेक्षा अधिक खरेदी केले जात आहेत.

पूर्व चीनच्या जियांग्सु प्रांतातील एका युनिव्हर्सिटीने या किसिंग डिवाइसचा आविष्कार केला आहे. यामुळे लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कपल्सला फायदा होणार आहे. डिवाइस ब्लूटूथ आणि एका अॅपच्या माध्यमातून लिक करावे लागते. केवळ फोनच्या डिवाइसला प्लग करत ते वापरले जाऊ शकते. आपल्या पार्टनरच्या किसची आठवण करुन देण्यासाठी हे डिवाइस फार उपयोगी येणार आहे.

ग्लोबल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चांगझो वोकेशनल इंस्टिट्युट ऑफ मेक्ट्रोनिक टेक्नॉलॉजी द्वारे ते तयार करण्यात आले असून त्याचे पेटेंट ही बनवले गेले आहे. डिझाइन बद्दल बोलायचे झाल्यास तर एका विद्यार्थ्याने असे म्हटले की, मी माझ्या प्रेयसीसोबत लॉन्ग डिस्टेंन्स रिलेशनशिपमध्ये होतो. त्यामुळे आम्ही केवळ फोनच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क करायचो. अशातच हे डिवाइस तयार करण्याची प्रेरणा मिळाली. (Kissing Device)

हे देखील वाचा- जापान मधील विचित्र परंपरा, तरुणी मागते मुलाच्या शर्टाचे दुसरे बटण

दरम्यान, कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या ह्युमन कंप्युटर इंटरेक्शन, द फ्युचर इंटरफेसेस ग्रुपच्या संशोधकांनी असे ही शोधून काढले की, रिअॅलिटीमध्ये युजर्सला आपले ओठ, दात आणि जीभेचे संसेशन ही झाले पाहिजेत. संशोधकांनी याचा एक व्हिडिओ ही शेअर केला आहे. एफआयजीने ध्वनिक उर्जाच्या एका वर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटला मोडिफाय केले. यामध्ये असलेले वीआर हार्डवेअरवर टेक क्लिप्स लावली जाणार आहे. तसेच व्हिडिओ मध्ये एका युजर्सला टूथ ब्रथ, सिगरेट, गरम कॉफी आणि अन्य आभासी स्थितींना टेस्ट करताना दाखवले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.