ब्रिटेनच्या रॉयल मिंटने नुकत्याच सम्राट किंग्स चार्ल्स तृतीय यांचा अधिकृत फोटो असलेले नाणे जारी केले आहे. त्यानुसार आता ३ जानेवारी २०२३ पासन व्या राजाचा फोटो असलेले नाणे चलनात येणार आहेत. या नाण्यांची डिझाइन या वर्षाच्या सुरुवातीला महारानी एलिजाबेथ द्वितीय यांच्या स्मृती सारख्या नाण्यांच्या श्रृंखला अंतर्गत जारी केला होता. १ जानेवारी पासून नवी नाणी येणार आहेत. ज्यावर आता ७४ वर्षीय सम्राट किंग्स चार्ल्स यांचा फोटो असणार आहे. हे ब्रिटेन मधील नाण्यांमध्ये मोठ्या बदलावाचे संकेत आहेत. ब्रिटेनमध्ये संग्रहकर्त्यांनी देशातील नाण्यांवर दीर्घकाळापर्यंत एलिजाबेथ यांचा फोटो होता. मात्र आता त्यांचा मुलगा उत्तराधिकारी असून त्याचा फोटो नाण्यांवर दिसून येणार आहे. महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांचे याच वर्षात ८ सप्टेंबरला निधन झाले होते.एलिजाबेथ यांच्या मृत्यूनंतर किंग्स चार्ल्स तृतीय आणि त्यांची पत्नी कॅमिला क्वीन कंसोर्ट, कमिटल सर्विस नंतर सेंट जॉर्ज चॅपलमधून बाहेर आले होते. त्यांनी त्यांच्या सेवेतील अन्य लोकांचे सुद्धा आभार मानले होते. याच वेळी किंग्स चार्ल्स तृतीय सुद्धा भावुक झाल्याचे दिसून आले होते. (King Charles Coins)
ब्रिटेनच्या प्रत्येक नाण्याचा गौरव
रॉयल मिंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन्ने जेस्सोप यांनी असे म्हटले की, नाण्यांवर अधिकृत निर्मात्याच्या रुपात शाही टंकसालाला ७० वर्षांपर्यंत दिवंगत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांच्या सन्मानात ब्रिटेनच्या प्रत्येक नाण्यावर येण्याचा गौरव मिळाला आहे. मात्र येणाऱ्या काही दशकांमध्ये आपल्याला आता काही बदल दिसून येणार आहेत. कारण आता किंग्स चार्ल्स तृतीय सुद्धा नव्या नाण्यांवर दिसून येत आहेत. शाही टंकसालवर ब्रिटेनच्या राजपरिवाराच्या सन्मानार्थ नाणी बनवण्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांच्यावर नवव्या शतकातील अल्फ्रेड द ग्रेट यांच्या शासनकाळापासून मिळाली आहे.
नव्या नाण्यांवर चार्ल्स तृतीय यांचा फोटो
जानेवारी २०२३ मध्ये सर्व नाण्यांवर आता ७४ वर्षीय किंग चार्ल्स तृतीय यांचा फोटो असणार आहे. नाण्यांच्या डिझाइनचे अनावरण याच वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आले होते. ज्यामध्ये नाण्यांवर किंग चार्ल्स तृतीय यांचा फोटो लावला गेला जेथे एलिजाबेथ द्वितीय यांचा फोटो असायचा.(King Charles Coins)
हे देखील वाचा- सौदी अरेबियाची ठरली ‘ही’ पहिली योग शिक्षिका…
नव्या वर्षात होणार बदल
रॉयल मिंटचे सीईओ एनी जेसोप यांनी असे म्हटले की, ब्रिटेनच्या नाण्यांवर अधिकृतरुपात ७० वर्षांपर्यंत महाराणी एलिजाबेथ द्वितीय यांची प्रत्येक नाणी बनवण्यावर आम्हाला गर्व आहे. जसे आम्ही नव्या वर्षात प्रवेश करु तेव्हापासून कही बदल दिसून येणार आहेत.