सिरियामध्ये बशर अल-असद रकारचा शेवट बंडखोरांनी केल्यानंतर आता आणखी एका देशामध्ये अशाच प्रकारच्या सत्तांतराचे सावट आहे. हा देश सिरियाचा शेजारी आहे. मोहम्मद पैंगबराचे थेट वंशज असलेल्या राजे अब्दुल्ला द्वितीय यांनाही अशाच प्रकारच्या सत्तातरांचा धोका जाणवू लागला आहे. जॉर्डनचे राजे असलेल्या राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी यासाठी आपल्या मित्र देशांकडे मदतीचा हात मागितला आहे. मात्र जॉर्डनमधील अशांतता बघता अरब देशामध्ये मोठी उलथापालथ होणार अशी शक्यता आहे. अमेरिकेचा मित्र असलेल्या जॉर्डनमधील सरकार पडल्यास जॉर्डनचे राजे अब्दुल्ला आणि त्यांची पत्नी राणी रानिया अल अब्दुल्ला हे कुठल्या देशाच्या आश्रयाला जाणार याची चर्चा रंगली आहे. (Abdullah)
सीरियामध्ये बशर अल-असद याचे जुलमी सरकार बंडखोरांनी पाडल्यावर आता सिरियाच्या शेजारी असलेल्या जॉर्डनमध्येही बंडखोरीचा धोका अधिक वाढला आहे. गेल्या काही महिन्यापासून जॉर्डनमध्ये राजाच्या विरोधातील जनतेचा आवाज वाढला असून सिरायाप्रमाणे येथेही कधीही राजसत्ता संपुष्ठात येईल अशी शक्यता आहे. असे झाले तर तमाम अरब देशांना हा मोठा धक्का आहे. कारण जॉर्डनचे राजे हे पैंगबर मोहम्मद यांचे थेट वंशज आहेत. शिवाय जॉर्डन हा इस्रायल आणि अमेरिकेचा सर्वात चांगला मित्र मानला जातो. अशा देशात सत्तांतर झाल्यास अरब देशांच्या पुढच्या अस्तित्वाबाबतही प्रश्न चिन्ह विचारण्यात येणार आहे. सिरियातील बशर सरकार पडल्यानंतर जणू संपूर्ण पश्चिम आशियातील परिस्थिती झपाट्याने बदलत चालली आहे. या आशियाई देशांमधील सत्तास्थाने धोक्यात आली आहेत. या देशांमध्ये जॉर्डनचाही समावेश आहे. काही महिन्यापासूनच येथील उद्रेक सिरियाच्या सत्तातरापासून वाढला आहे. त्यातच शिन बेटचे प्रमुख रोनन बार आणि आयडीएफ मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख मेजर जनरल श्लोमी बाईंडर यांनी जॉर्डनला भेट दिल्यामुळे जॉर्डनचे राजे अन्य देशांच्या आश्रयाला जाणार असल्याची चर्चा वाढली आहे. (International News)
सीरियानंतर जॉर्डनमध्ये अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी देशाचे राजे अब्दुल्ला द्वितीय यांनी अमेरिका आणि इस्रायलची मदतही मागितली असल्यानं येथील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव होते. या सर्वात इऱाणची भूमिका महत्त्वाची आहे. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला यांचे सरकार अस्थिर करण्यात इराणचा जास्त फायदा आहे. जॉर्डनचा भूभाग इस्रायलच्या विरोधात वापरण्यासाठी गेले अनेक महिने इराण प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला राजे अब्दुल्ला यांनी ठाम नकार दिल्यामुळे आता इराण त्यांचीच राजेशाही उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राजे अब्दुल्ला हे पैगंबर मोहम्मद यांच्या वंशातून आलेले असल्यामुळे जॉर्डनच्या राजेशाहीवर अरब जगाचे कायम लक्ष असते. अशावेळी जॉर्डनने इऱाण सोडून इस्रायलला मदत करावी यावर काही अरब देशात नाराजी आहे, याच नाराजीचा फायदा इराण राजे अब्दुल्ला यांच्या सरकारविरोधात करत आहे. अब्दुल्ला द्वितीय हे 25 वर्षांपासून जॉर्डनवर राज्य करत आहेत. 1999 मध्ये वडील हुसेन यांच्यानंतर राजे अब्दुल्ला यांच्या हाती जॉर्डनची सत्ता आली. राजे अब्दुल्ला द्वितीय इब्न अल हुसेन हे प्रेषित मुहम्मद यांचे 41 व्या पिढीतील वंशज आहेत. राजे अब्दुल्ला द्वितीय यांचे शिक्षण ब्रिटन आणि अमेरिकेत झाले आहे. (Abdullah)
========
हे देखील वाचा : त्याला फक्त हवा माणसाचा डोळा !
======
1980 मध्ये त्यांनी सँडहर्स्ट, इंग्लंडमधील रॉयल मिलिटरी अकादमीमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय त्यांनी ब्रिटीश सशस्त्र दल आणि जॉर्डनच्या सशस्त्र दलात कामही केले आहे. 1993 मध्ये त्यांना डॉर्डन एलिट स्पेशल फोर्सचे डेप्युटी कमांडर आणि 1994 मध्ये स्पेशल फोर्सचे कमांडर बनवण्यात आले. राजे अब्दुल्ला यांच्या पत्नी या कुवैती वंशाच्या पॅलेस्टिनी रानिया अल्यासिन आहेत. 1993 मध्ये या दोघांचा विवाह झाला. पॅलेस्टिनी वंशाच्या रानियाचा जन्म 31 ऑगस्ट 1970 रोजी कुवेतमध्ये झाला. 1991 मध्ये रानियाच्या कुटुंबाला इतर हजारो पॅलेस्टिनींप्रमाणे कुवेत सोडून जॉर्डनच्या अम्मान शहरात स्थायिक व्हावे लागले. कुवेतमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कैरो येथील अमेरिकन विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनाची पदवी घेतली आणि काही काळ सिटी बँकेत नोकरी केली आहे. अब्दुल्ला द्वितीय यांच्यासोबत लग्न झाल्यावर रानिया अल अब्दुल्ला यांनी जॉर्डनमध्ये आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राची जबाबदारी स्विकारली आहे. जॉर्डनचे राजा आणि राणी हे आधुनिकीकरणासाठी ओळखले जातात. या शाही जोडप्याला 4 मुले आहेत. याच शाही कुटुंबावर आता दुस-या देशात आश्रय घेण्याची वेळ येणार का अशी चर्चा आहे. (International News)
सई बने