Home » उंटांच्या सौंदर्यस्पर्धेत महिलांचाही सहभाग, विजेत्या उंटाला मिळाले १९ कोटींहूनही जास्त रक्कम

उंटांच्या सौंदर्यस्पर्धेत महिलांचाही सहभाग, विजेत्या उंटाला मिळाले १९ कोटींहूनही जास्त रक्कम

by Team Gajawaja
0 comment
उंटांची सौंदर्य स्पर्धा
Share

साऊदी अरबमध्ये महिलांवर अनेक कायद्याचे बंधन आहे.  इतर देशातील महिलांप्रमाणे त्यांना स्वातंत्र्य नाही. मात्र अलिकडील काही वर्षात साऊदी अरबमधील महिलांना या कायद्यात सूट मिळत आहे. काही दिवसांपूर्वी येथे उंटाची सौदर्य स्पर्धा झाली. यात उंटांची परेड काढण्यात आली. या परेडमध्ये पुरुष स्पर्धक आपले उंट घेऊन सहभागी होतात. मात्र यावेळच्या स्पर्धेने इतिहास रचला. यात चक्क महिलांनाही पुरुषांबरोबर संधी देण्यात आली.

साऊदी अरबच्या महिलांसाठी हा मोठा दिवस ठरला. या स्पर्धेत भाग घेताना महिलांसाठी पोशाखाचे काटेकोर नियम बनवण्यात आले होते. ते नियम पाळत यामध्ये महिला स्पर्धकांनी भाग घेतला आणि पुरुष स्पर्धकांना हरवून पारितोषिकेही पटकावली.   

साऊदी अरबमध्ये उंटाच्या या सौदर्य स्पर्धेला मोठं महत्त्व आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या उंटाची चक्क फाईव्हस्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येते. ‘शिप्‍स ऑफ द डेजर्ट’ म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा साऊदी अरबच्या संस्कृतीचेही प्रतिक आहे.  या स्पर्धेदरम्यान उंट आणि घोड्यावर स्वार होऊन सहभागी उंटांसोबत रहावे लागते. पुरुषांची सत्ता असलेल्या या स्पर्धेत यावर्षी पहिल्यांदाच महिला स्पर्धकांनाही सहभागी होता आले. यात सहभागी झालेली २७ वर्षाची लामिया अल-रशिदी, सरकारच्या निर्णयामुळे अत्यंत उत्साहीत होती.

Saudi Camel Festival organizes 'Tack up & Race' competition

प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘किंग अब्‍दुलअजीज’ महोत्‍सवाचा एक भाग म्हणून उंटाची सौदर्य स्पर्धा होते. यात सहभागी झालेल्या उंटाना त्यांचे ओठ, मान, पाठीवरील उंटवटा या आधारावर पारितोषिक देण्यात येते. या स्पर्धेत चाळीस उंट सहभागी झाले होते. त्यातील विजेत्या उंटांच्या मालकांना एक मिलियन रियाल म्हणजेच १९ कोटी २३ लाख ९५ हजार पेक्षाही अधिक रक्कम पुरस्कार म्हणून मिळाली आहे.  

स्पर्धेच्या एका क्षणी तर संपूर्ण काळ्या पेहरावात असलेल्या महिला स्पर्धक पुरुष स्पर्धकांपेक्षा अधिक जोरात घोडेस्वारी करत आपल्या उंटांना हाकण्यात यशस्वी झाल्या. या स्पर्धेतील सर्वात छोटी स्पर्धक अवघ्या सात वर्षाची होती. ‘मलथ बिंत इनाद’ ही लहान असूनही स्पर्धेत तीसरी आली. 

विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारची स्पर्धा ठेवण्यात आली होती. मात्र त्यातील अनेक स्पर्धकांना बाहेर करण्यात आले होते.  त्यांनी आपल्या उंटांवर बोटॉक्स इंजेक्शनचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महिलांचा सहभाग आणि त्यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जाते.  

या स्पर्धेत विजयी ठरलेल्या लामिया अल-रशीदी हिच्या कुटुंबाकडे चाळीस उंट आहेत. लामिया लहानपणापासून या उंटांची काळजी घेते. घरातील पुरुषांप्रमाणे ती उंटांवर स्वार होते. पण अशापद्धतीनं तिला जाहीर स्पर्धात सहभागी होता येत नव्हते. मात्र महिलांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्यावर अत्यंत आनंद झाल्याचे तिने सांगितले.  

हे ही वाचा: कोरोना महामारीचा भयानक परिणाम! भारताच्या शेजारचा ‘हा’ देश झाला आहे कर्जबाजारी!

कलाकारांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सरकारी हस्तक्षेप आणि पेंग ताखॉन (Paing Takhon)

सन २०१७ मध्ये क्राऊन प्रिंस मोहम्मद बिन सलमान सत्तेत आल्यापासून महिलांना काही प्रमाणात सवलत देण्यात येत आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. अर्थातच या निर्णयाला कट्टरवाद्यांनी विरोध केला आहे. या सर्व विरोधकांना बाजूला ठेवत या महोत्सवाचे आयोजक मोहम्मद अल-हरबी यांनी महिलांच्या स्पर्धा सहभागाला पाठिंबा व्यक्त केला. बेडौईन समाजामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. महिला उंटांची काळजी घेतात.  त्यांचे पालन पोषण करतात. त्यामुळे त्यांना या स्पर्धेत सहभागी करुन न्याय दिल्याचे त्यांनी सांगितले.  

हे सुद्धा वाचा:  डोकं चक्रावून टाकणारे जगातील ५ विरोधाभास! बघा तुम्हाला काही सुचतंय का? (Top 5 Paradoxes)

साऊदी अरबमध्ये महिलांना गाडी चालवण्याचे स्वातंत्र्य मिळाल्याची बातमी सर्व जगभर फिरली. मात्र त्यांच्या या उंटांच्या सवारीची अद्याप तेवढी दखल घेतली गेली नाही. पण याची फिकीर साऊदी अरबच्या महिलांना नाही. त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद या प्रसिद्धीपेक्षाही अधिक आहे.   

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.