अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चीननं युद्धाची धमकी दिली आहे. शिवाय तालिबानच्या दहशतवाद्यांनीही अमेरिकेला धमकी दिली आहे. शिवाय युक्रेन आणि युरोपियन युनियनसोबतही डोनाल्ड ट्रम्प यांचा संघर्ष सुरु आहे. असे असतांनाच डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक मोठी धमकी मिळाली असून त्यामुळे ट्रम्प यांच्या हितचिंतकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खुली धमकी मिळाली आहे, उत्तर कोरियामधून. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहिण किम यो जोंग यांनी अमेरिकेला आमच्या दुष्मनांना मदत कराल, तर संभाव्य हल्ल्याला तयार रहा, अशा थेट इशारा दिला आहे. अमेरिकेनं दक्षिण कोरियाला काही लष्करी विमाने दिली आहेत. (Kim Yo Jong)
या विमानांचा उत्तर कोरियाला धमकवण्यासाठी दक्षिण कोरिया वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या किमच्या बहिणीनं थेट अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. फक्त धमकी देऊन किमची ही बहिण गप्प राहिली नाही, तर अमेरिकेच्या शहरांचा वेध घेईल, अशा क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याचे आदेशच तिनं दिले आहेत. उत्तर कोरियाचा अध्यक्ष किम जोंग उन हा त्याच्या स्वभावामुळे ओळखला जातो. मात्र किमची बहिण किम यो जोंग ही त्याच्यापेक्षा आक्रमक स्वभावाची आहे. त्यामुळेच उत्तर कोरियाच्या संरक्षण खात्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या किम यो जोंगच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये संघर्ष होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरली आहे ती अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांची मैत्री. (International News)
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यावर लगेच काही दिवसात दक्षिण कोरियाला लष्करी विमाने रवाना केली. ही अमेरिकेची कृती, उत्तर कोरियाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं चिंतेची झाली. परिणामी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग हिने अमेरिकेवर हल्ला कऱण्याचा इशारा दिला आहेत. वास्तविक डोनाल्ड ट्रम्प आणि किम यांची ट्रम्प गेल्यावेळी राष्ट्राध्यक्ष असतांना भेट झाली होती. मात्र अमेरिका आणि उत्तर कोरियामधील हा मैत्रीचा पूल काही फारकाळ टिकला नाही. त्यातच अमेरिका कायम दक्षिण कोरियाला मदत करत असल्यामुळे उत्तर कोरियानं अमेरिकेला अनेकवेळा इशारा दिला आहे. तसेच अमेरिकेच्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ला करु असा इशाराही दिला आहे. मात्र यावेळी किमची बहिण, किम यो जोंग हिने फक्त धमकी दिली नाही, तर अमेरिकेवर हल्ला करु शकतील अशा क्षेपणास्त्रांची चाचणीच सुरु केल्यानं खळबळ उडाली आहे. (Kim Yo Jong)
किम यो जोंग हिने अमेरिकेने दक्षिण कोरियाला विमान पाठवणे हे लष्करी चिथावणीचे कृत्य असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया करत असलेल्या अणुचाचण्या योग्यच असल्याचेही किमनं म्हटले आहे. अमेरिकेने दक्षिण कोरियाच्या बुसान बंदरात कार्ल विन्सन निमित्झ क्लास हे विमान पाठवले आहे. या विमानांचा वापर करत दक्षिण कोरिया, उत्तर कोरियावर हल्ला करु शकतो, याची जाणीव किमला झाल्यावर तिने आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार रहाण्याचे आदेश दिले आहेत. किम हिने यासंदर्भात एक निवेदनच जाहीर केले आहे. त्यात तिने अमेरिकेचा गुंड असा उल्लेख केला आहे. अमेरिकेनं दक्षिण कोरियाला ही दिलेली विमानं म्हणजे, गुंडांचा आत्मघातकी उन्माद असे वर्णन किमनं केले आहे. दक्षिण कोरियानं या विमानांचा वापर उत्तर कोरियाच्या विरोधात केल्यास ही एक आत्महत्याच ठरणार असून दोन्ही देशांना त्यांच्या कृतीचा परिणाम भोगावा लागेल, असा इशाराही किमनं दिला आहे. (International News)
===============
हे देखील वाचा : Sugarcane : सगळ्या रसवंती गृहांची नावं कानिफनाथच का असतात ?
Passport : नवीन पासपोर्ट काढायचा…? मग ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे
==============
उत्तर कोरियामधून आलेल्या या धमकीमुळे अमेरिकेतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात किम जोंग उनबरोबर बोलणार असल्याचे सांगितले आहे. तर दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने अमेरिकेसोबतच्या मजबूत लष्करी युतीच्या आधारे उत्तर कोरियाच्या कोणत्याही युद्धाला तोंड देण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. मात्र उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र चाचण्यांची तयारी सुरु केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करू शकणाऱ्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाकडे 50 अणुबॉम्ब आहेत. त्यामुळे उत्तर कोरियामधून मिळालेल्या धमकीला अमेरिका कशा प्रकारे हाताळणार आहे, याकडे लक्ष लागले आहे. (Kim Yo Jong)
सई बने