Home » अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !

अणुहल्ल्याच्या धमकीसह किम जोंगची युद्धात एन्ट्री !

by Team Gajawaja
0 comment
Kim Jong
Share

जगभर युद्ध आणि युद्धाची छाया आहे. रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धात अणुहल्ल्याची भीती व्यक्त होत आहे. युक्रेनची या युद्धात होत असलेल्या सरशीमुळे आणि युक्रेनला मिळत असलेल्या अन्य देशांच्या पाठिंब्यामुळे रशियानं थेट अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. तिकडे इस्रायल लेबनान आणि इराण युद्धामध्येही अणुहल्ल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र असे असतांना आता एक नवीन देश या युद्धभुमीमध्ये दाखल झाला आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगनं या सर्वात एन्ट्री घेत थेट अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. त्यानं ही धमकी अमेरिका आणि दक्षिण कोरियाला दिली आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील क्षेपणास्त्र हल्ल्यांदरम्यान आता आणखी एका देशाची एन्ट्री झाली आहे. हा देश म्हणजे उत्तर कोरिया आहे. (Kim Jong)

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग हा सणकी हुकूमशहा म्हणून ओळखला जातो. किम कधी काय करेल याचा नेम नसतो. मध्यंतरी उत्तर कोरियामध्ये आलेल्या पुराची पाहणी करण्यासाठी गेलेल्या किमनं आपल्याच 20 हून अधिक सहका-यांना थेट फाशीची शिक्षा दिली होती. किम जोंग शस्त्रप्रेमी आहे, हे जगजाहीर आहे. ठराविक काळानं नवीन क्षेपणास्त्राची चाचणी घेणा-या किम जोंगच्या देशात अण्वस्त्रांचा साठाही मोठ्या प्रमाणात केल्याची अटकळ आहे. आता याच किम जोंगनं याच शस्त्रांच्या सहाय्यानं अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. त्यानं ही धमकी उत्तर कोरियाचे पारंपारिक शत्रू असलेल्या देशांना दिली आहे. म्हणजेच अमेरिका आणि उत्तर कोरियाचा शेजारी असलेल्या दक्षिण कोरियाला किमनं अणुहल्ल्याची धकमी दिल्यानं खळबळ उडाली आहे. (International News)

इस्रायल, इराण आणि लेबनान यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत कमालीचा तणाव आहे. इस्रायलनं लेबनानवर हल्ले वाढवले आहेत. तर इराणनं इस्रायलवर हल्ला केला आहे. त्या हल्ल्याला इस्रायल कधीही प्रत्युत्तर देईल असा अंदाज आहे. हे युद्ध वाढलं तर अणुहल्ल्याचाही धोका असल्याचे तज्ञ सांगत आहेत. अशात उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगच्या धमकीने 10 हजार किलोमीटर दूर बसलेल्या अमेरिकेचा पारा वाढला आहे. किम जोंगने थेट अमेरिका आणि त्याच्या शेजारी असलेल्या दक्षिण कोरियाला अणुहल्ल्याची धमकी दिली असून गेले काही महिने या दोन्ही कोरियन देशांच्या सीमेवर वादाचे प्रसंग वारंवार घडत आहेत. गेल्या काही महिन्यापासून किमनं दक्षिण कोरियाकडे कच-याचे फुगे पाठवून तणाव वाढवला होता. (Kim Jong)

दक्षिण कोरिया असेच फुग्यांच्या माध्यमातून आपल्या जनतेला काहीवस्तू पाठवत आहे आणि आपल्या देशाची हेरगिरी करत असल्याचा आरोप किमनं लावला होता. तेव्हापासून सुरु झालेले हे प्रकरण वाढले आहे. आता या दोन्ही देशांच्या सीमाही तणावाखाली आहेत. हा वाढता तणाव बघून उत्तर कोरियाचा हुकूमशहा असलेल्या किमनं, आपल्या देशाला चिथावणी दिली गेली किंवा आपल्या देशावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला तर दक्षिण कोरियावर थेट अण्वस्त्र हल्ला करू असा इशारा दिला आहे. किमच्या या धमकीवर दक्षिण कोरियानं प्रत्युत्तर दिले आहे. किम जोंगने अण्वस्त्रे वापरण्याचा प्रयत्न केला तर उत्तर कोरियाला नेस्तनाबूत केले जाईल, असा उलट इशारा दक्षिण कोरियाचे अध्यक्ष युन सुक येओल यांनी दिला आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सर्वात शक्तिशाली Hyeonmu-5 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि उत्तर कोरियाला लक्ष्य करण्यास सक्षम असलेल्या इतर पारंपारिक शस्त्रांचे चाचणी केल्याची माहिती आहे. (International News)

======

हे देखील वाचा :  इराणने इस्राइलवर हल्ला का केला?

======

पण ही बातमी किम जोंगच्या कानी पोहचल्यावर त्यानं आता दक्षिण कोरियासह अमेरिकेलाही अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. दक्षिण कोरियाला अमेरिका मदत करत असल्याचा किमचा आरोप आहे. अमेरिका हा दक्षिण कोरियाचा मित्र देश आहे. त्यामुळेच किमनं यात अमेरिकेला ओढत कधीही अणुहल्ला करणार असा इशारा जाहीर केल्यामुळे अमेरिकेतही खळबळ उडाली आहे. अलीकडेच किम जोंगने आपल्या अण्वस्त्रांची झलक संपूर्ण जगाला दाखवली होती. त्याचा अण्वस्त्रांसोबतचा फोटो हा फक्त दिखाव्यासाठी नव्हता, तर त्यानं या दोन देशांना तेव्हाही इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे. आता किम फक्त धमकीवरच थांबला नाही तर उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे सीमेवर तैनात केल्याची माहिती आहे. या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य दक्षिण कोरिया आणि अमेरिकन लष्करी तळ आहेत. किम जोंग याचा स्वभाव पाहता अमेरिकेत सध्या तणाव वाढला आहे. आधीच जगभर असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत या दोन कोरियामधील वादानं अधिक भर टाकली आहे. (Kim Jong)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.