उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन हे नेहमी चर्चेत असतात. आता याच किम जोंग यांच्यासह त्यांची १३ वर्षाची मुलगी किम जु-ए ही सुद्धा चर्चेत आली आहे. किम जोंग हा आजारी असून त्याच्या प्रकृतीमुळे तो लवकरच आपला उत्तराधिकारी जाहीर करणार अशा स्वरुपाच्या बातम्या गेल्या दोन वर्षापासून येत आहेत. मात्र किम जोंग याने असा कुठलाही उत्तराधिकारी जाहीर केला नाही. दरम्यान किम ची बहिण, किम यो जोंग हिचेही नाव किमची उत्तराधिकारी म्हणून पुढे आले. कारण कि यो जोंग हिच्याकडे उत्तर कोरियाची परराष्ट्रनिती सांभाळण्याची जबाबदारी आहे. ती अनेकदा तिच्या भावासोबत सार्वजनिक ठिकाणी दिसते आणि महत्त्वाच्या राजकीय चर्चांसाठी अन्य देशांच्या दौ-यावरही जाते. मात्र किम आपल्या या बहिणीपेक्षा त्याच्या मुलांपैकी कुणाला तरी उत्तराधिकारी करणार अशी अटकळ आहे. त्यामुळेच त्याची १३ वर्षाची मुलगी किम जु ए चर्चेत आली आहे. वर्षभरापासून या किम जु ए ला किम प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमात नेत आहे. सोबतच उत्तर कोरियाचे वरिष्ठ लष्करी पदाधिकारीही या छोट्या मुलीला भावी राणी असल्याचा मान देत आहेत, त्यावरुन किमनं आपला उत्तराधिकारी नक्की केला असल्याचे मानले जाते. किम जु ए ही आता फक्त १३ वर्षाची आहे. किम जोंग उन नंतर ती कोरियाची सर्वेसर्वा झाला तर किमच्या घरातील ही चौथी पिढी असणार आहे. ( Kim Ju-ae )

Kim Ju-ae
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन याच्या प्रत्येक कृतीवर जगाचे लक्ष असते. किम जोंग उन हा फारसा प्रसार माध्यमांसमोर येत नाही. आणि जेव्हा किम प्रसार माध्यमांसमोर येतो, तेव्हा त्याला त्यातून काहीतरी संदेश द्यायचा असतो. असाच संदेश किमनं १ जानेवारी २०२६ रोजी दिला. किम आणि त्याचे कुटुंब हे शक्यतो, एकत्र कधीही दिसत नाही. किमची पत्नी आणि त्याला किती मुलं आहेत, याचीही फारशी माहिती नाही. मात्र याच किमनं वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रार्थनास्थळाला भेट दिली. त्यातून त्यानं आपल्या कुटुंबाचा पुढचा वारस कोण असणार याची चुणूक जगाला दिली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किम जोंग उन हा त्याच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबांच्या मुळ राजवाड्यात गेला. तेथील कुमसुसान हा राजवाडा किमच्या कुटुंबियांचे पूजास्थळही आहे. येथे भेट देण्यासाठी पत्नीसह गेलेल्या किमसोबत त्याची मोठी मुलगी जु ए ही होती. १३ वर्षाची ही जु ए किमची सर्वात लाडकी मुलगी असल्याची माहिती आहे. हिच जु ए या प्रार्थनास्थळावर पहिल्यांदा आली. येथे देशाचे संस्थापक किम इल सुंग आणि त्यांचा मुलगा किम जोंग इल यांना श्रद्धांजली वाहिली गेली. या प्रार्थनेत ती तिच्या पालकांसह पुढच्या रांगेत उभी राहून आदरांजली वाहताना दिसली. किमच्या या कृतीतून जु ए ही पुढची उत्तर कोरियाची शासक असणार आहे, याची जाणीव तेथील जनतेला झाली आहे. कुमसुसान पॅलेस हा उत्तर कोरियाच्या राजवटीच्या वैभवाचे प्रतीक मानला जातो. या पॅलेसमधील प्रार्थनेत जू ए पहिल्यांदाच सहभागी झाल्यामुळे तिच्या राजकीय प्रवासाची ही सुरुवात असल्याचे मानले जाते. किम जोंग-उन हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेते आहेत. त्यांच्यापुढे ह कुटुंबाचा वारसा त्यांच्या मुलीकडे गेल्यास उत्तर कोरियावर पहिल्यांदा एका महिला अध्यक्षाचे राज्य येणार आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन हे त्यांच्या पत्नी री सोल जू हिच्यासोबत फाऱ कमी वेळा सार्वजनिक कार्यक्रमात दिसतात. या जोडप्यांना चार किंवा पाच मुले असल्याची माहिती आहे. त्यातील जू ए ही सर्वात मोठी आहे. किमला दोन मुले आणि दोन मुली असल्याचे सांगितले जाते. मात्र किमच्या कुठल्याही मुलाची नेमकी जन्मतारीख कोणती याची माहितीही उत्तर कोरियातीला नागरिकांना नाही. किमच्या मुलांचे संगोपन त्यांच्या राजवाड्यात कऱण्यात येते. या मुलांना आवश्यक अशा सगळ्या सुविधा, खेळाची साधने येथे आहेत. शिवाय त्यांचे शिक्षणही याच राजवाड्यात करण्यात येत असल्याची माहिती आहे. देशोविदेशीचे शिक्षक या मुलांना शिकण्यासाठी उत्तर कोरियात आणले जातात, अशीही माहिती आहे. त्यातही किमची मोठी मुलगी जू ए ही अभ्यासात हुशार असून तिला अन्य देशांच्या भाषाही शिकवल्या जात आहेत. याच ज ए ला आता किम अनेक सार्वजनिक कार्यक्रमात नेत असून त्यातून तिला देश कसा चालवायचा याची माहिती देत आहे. जू ए पहिल्यांदा नोव्हेंबर २०२२ मध्ये उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांमध्ये दिसली. तेव्हापासून, ती तिच्या वडिलांसोबत क्षेपणास्त्र चाचण्या, लष्करी परेड आणि प्रमुख सरकारी कार्यक्रमांसह अनेक महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या वडिलांसोबत येत आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये, किम जू ए तिच्या वडिलांसोबत बीजिंगलाही गेली. ही तिची पहिली सार्वजनिक परदेश यात्रा होती. ( Kim Ju-ae )
=======
हे देखील वाचा : South Korea : डेटा सेंटरच्या आगीनं कोणता देश झाला उद्ध्वस्त !
=======
काही राजकीय तज्ञांच्या मते, किम जोंग उन येत्या वर्कर्स पार्टी काँग्रेसमध्ये जू ए ची पक्षाच्या उच्च पदावर नियुक्त करु शकतो. अर्थात यासाठी जू ए चे वय फार कमी आहे. अर्थात किम जोंग उन ने आपल्या लेकीची नियुक्ती केल्यास त्याला तिथे प्रश्न विचारण्याची हिंम्मतही कोण करणार नाही. या सर्वात किम जोंग उनची बहीण, किम यो जोंग, हिची काय भूमिका असणार आहे, याकडेही लक्ष आहे. कारण किमची ही बहिण किमपेक्षा हुशार आणि राजकारणी असल्याची चर्चा आहे. हिवाळी ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये उत्तर कोरियाचे प्रतिनिधित्व करणारी किम यो जोंग ही उत्तर कोरियाची उत्तराधिकारी असू शकते, अशी अटकळ व्यक्त करण्यात आली होती. मात्र उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनच्या मर्जीशिवाय कुठलिही गोष्ट होत नाही. आता याच हुकूमशहाची मर्जी आपल्या लेकीवर आहे, त्यामुळेच सध्यातरी जू ए हिच उत्तरकोरियाची भावी शासक असले, हे निश्चित झाले आहे. ( Kim Ju-ae )
सई बने
