Home » Kim Ju-ae : उत्तर कोरियाची सत्ता आता किम जोंग उनच्या कन्येच्या हाती

Kim Ju-ae : उत्तर कोरियाची सत्ता आता किम जोंग उनच्या कन्येच्या हाती

by Team Gajawaja
0 comment
Share

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन हा कायम चर्चेत असतो. कायम आपल्या शेजारच्या देशांना धमकवणारा किम हा गेल्या वर्षभरापासून आपल्या मुलीला घेऊन देशाचा दौरा करत आहे. सैन्य प्रशिक्षण कार्यक्रम ते महत्त्वाच्या प्रशासकीय बैठका असो, किम आपल्या मुलीला सोबत घेऊन सर्व दौरे करत आहे. या दौ-यांमध्ये किमच्या या लेकीसमोर उत्तर कोरियामधील वरिष्ठ लष्करी अधिकारीही दंडवत घातल होते. या सर्वात किमचा आणि त्याच्या लेकीचा वावर पाहून उत्तर कोरियाची पुढची कमान किम जू ए या मुलीकडे जाणार हे स्पष्ट संकेत मिळत होते. आता त्याच बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. किम कुटुंबाने दशकांपासून उत्तर कोरियावर मजबूत पकड ठेवून राज्य केले आहे. आता या कुटुंबातून पहिल्यांदाच सत्ता मुलीकडे सोपवण्यात येणार आहे. किम जोंग उन यानं आपली उत्तराधिकारी म्हणून त्याची मुलगी किम जू ए चे नाव जाहीर केले आहे. ( Kim Ju-ae )

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनी त्यांची मुलगी किम जू ए हिला सत्ता देण्याचे जाहीर केले आहे. अलिकडे सर्वच सरकारी कार्यक्रमांमध्ये जू ए उपस्थित रहात असल्यामुळे तिच्या नावाची घोषणा, होणार याची अटकळ व्यक्त होत होतीच. त्यातच किम जोंगने प्रथमच जू ए हिला आपल्या कुटूंबाचे मुळ स्थानाला भेट दिली होती. जानेवारीमध्ये, जू ए हिने तिच्या वडिलांसोबत कुमसुसन पॅलेस ऑफ द सन येथे आपल्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली. येथेच उत्तर कोरियाचे संस्थापक किम इल सुंग आणि दुसरे नेते किम जोंग इल यांचे अंत्यसंस्कार केले आहेत. जू ए हिनं आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद घेतल्यावर तिला आता उत्तर कोरियाची जबाबदारी देण्यात येईल, अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. आता लवकरच सत्ताधारी पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद असलेल्या केंद्रीय समितीचे प्रथम सचिव म्हणून जू ए हिची नियुक्ती होणार आहे.

किम कुटुंबाने दशकांपासून उत्तर कोरियावर हुकूमशाही पद्धतीनं राज्य केले आहे. यातच आता जू ए चा समावेश होतो की, जू ए नव्या पिढीला लोकशाही पद्धतीनं कारभार करुन स्वातंत्र बहाल करेल याची चर्चा आहे. सध्या तरी जू ए हिला उत्तर कोरियाचा अभ्यास करायचा आहे. सध्या जू ए उत्तर कोरियाची उत्तराधिकारी, या पदवीखाली सर्व सरकारी बैठकांना उपस्थित राहू शकणार आहे. अवघ्या १२ वर्षाची असतांना जू ए हिनं आपला पहिला राजकीय दौराही केला आहे. किम जोंग यांच्यासह तिनं चीनला एक राजकीय दूत म्हणून भेट दिली होती. आता वर्षभरानं तिच जू ए उत्तर कोरियाच्या सर्वच सरकारी बैठकांना उपस्थित राहून आपल्या सत्तेचा पाया पक्का करत आहे. या महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियामध्ये पक्षाची एक प्रमुख बैठक होणार आहे. त्यात पुढील पाच वर्षांसाठी परराष्ट्र धोरण, युद्ध तयारी आणि आण्विक योजनांवर चर्चा होईल. यात जू ए हिची उपस्थिती प्रमुख रहाणार आहे. ( Kim Ju-ae )

या सर्वात किम जोंग आपला उत्तराधिकारी निवडण्यासाठी एवढी घाई का करत आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. वास्तविक ४२ वर्षाच्या किम जोंग याला अनेक आजारांचा विळखा आहे. किमला मधुमेहाचा जबरदस्त त्रास असल्याचीही माहिती आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी किम अचानक गायब झाल्यासारखा झाला होता. त्यावेळी त्याच्या मृत्यूच्याही बातम्या येऊ लागल्या होत्या. जवळपास सहा महिन्यानंतर किम पुन्हा सोशल मिडियाध्ये दिसू लागला, पण त्याची तब्बेत चांगलीच खालावली होती. तेव्हापासून किम आपला उत्तराधिकारी निवडणार अशी चर्चा सुरु झाली. मात्र किम जोंग याच्या कुटुंबाबद्दल अद्याप उत्तर कोरियामध्येही कोणाला फारशी माहिती नाही. किमची पत्नी ही फार कमी सार्वजनिक कार्यक्रमात त्याच्यासोबत असते. किमला मुले किती आहेत, याचीही माहिती नाही.

=======

हे देखील वाचा : Epstein Files: एपस्टाईन फाईलमध्ये चक्क करीनाचे नाव

=======

अशातच किमसोबत गेल्या वर्षभरापासून त्याची मुलगी किम जू ए ही सर्वच सार्वजनिक कार्यक्रमात दिसू लागल्यानं किम जोंग ने तिची निवड आपला उत्तराधिकारी म्हणून केल्याचे उघड झाले. किम जू ए बद्दल सार्वजनिकरित्या फारच कमी माहिती उपलब्ध आहे. ती सुमारे १३ वर्षांची असल्याचे मानले जाते. तिला एक मोठा भाऊही आहे. मात्र किमनं त्याला अद्याप कोण्याच्याही समोर आणलेले नाही. जू ए ही पहिल्यांदा नोव्हेंबर २०२२ मध्ये लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान कॅमे-यासमोर आली. तेव्हापासून, ती तिच्या वडिलांसोबत शस्त्रास्त्र चाचण्या, लष्करी परेड, कारखान्याचे उद्घाटन आणि अलिकडेच कोरियन पीपल्स आर्मीच्या स्थापना वर्धापन दिनासह अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना गेली आहे. उत्तर कोरियातील सत्ता नेहमीच किम कुटुंबातच राहिली आहे, किम इल सुंगपासून किम जोंग इल आणि नंतर किम जोंग उनपर्यंत. आता, किम जू ए ही या कुटुंबातील चौथी पिढी असणार आहे. ( Kim Ju-ae )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.