Home » लोकांना मृत्यूच्या दारात ढकलणारा किंम जोंग उन जेवढा चतुर तेवढाच आहे उच्चशिक्षित

लोकांना मृत्यूच्या दारात ढकलणारा किंम जोंग उन जेवढा चतुर तेवढाच आहे उच्चशिक्षित

by Team Gajawaja
0 comment
North Korea Leader
Share

जगात जेव्हा सर्वाधिक क्रुर तानाशाहांबद्दल बोलले जाते तेव्हा उत्तर कोरियाचा तानाशा किम जोंग उन याचे नाव पुढे येते. यामागे काही कारणं आहेत. त्यानुसार आपल्याच अधिकाऱ्यांची ते नातेवाईकांची हत्या करणे आणि आपल्याच देशातील जनतेला बाहेरच्या जगापासून दूर ठेवणे अशा काही गोष्टींचा समावेश आहे. अशातच किंम जोन उन हा जेवढा चतुर आहे तेवढाच उच्चशिक्षित सुद्धा आहे. तर जाणून घेऊयात त्याचा शिक्षणाबद्दल अधिक.(Kim Jong Un Education)

किम जोंग उन याने २०११ मध्ये सत्ता सांभाळण्यास सुरुवात केल्यानंतर ३०० हून अधिक लोकांना मृत्यूच्या दारात ढकलले आहे. त्यामध्ये १४० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. येथे लक्ष देण्याची बाब अशी की, किमने आपल्या नातेवाईकांना सुद्धा सोडले नाही. किमने २०१३ मध्ये आपल्याच काकांनी विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक केली आणि त्यांना मारुन टाकले. मात्र किम बद्दल असे बोलले जाते की, बालपणी तो अगदी लाजाळू होता. किमने बालपणात एका उत्तम शाळेतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र शिक्षण जरी उत्तम घेतले असले तरीही त्याच्या अॅक्शनमध्ये त्याबद्दल काहीच प्रतित होत नाही. खरंतर शिक्षणासंदर्भात लोकांमध्ये असे मतं आहे की, याच्या माध्यमातून व्यक्ती योग्य मार्गाने जाण्यास शिकतो. पम किम जोंग उनच्या बाबतीत हे उलट आहे.

Kim Jong Un Education
Kim Jong Un Education

किम जोंग उनच्या शिक्षणाबद्दल अधिक बोलायचे झाल्यास त्याला १९९६ मध्ये स्विर्त्झलँन्ड मध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. येथे किमचा मोठा भाऊ किम जोंग चुल सुद्धा शिकत होता. किमने इंग्लिश लँग्वेज इंटरनॅशनल स्कूल ऑफ बर्न मध्ये प्रवेश घेतला होता. स्विर्त्झलँन्डची राजधानी बर्नमध्ये असलेल्या या शाळेत बहुतांशकरुन राजकीय नेते मंडळी किंवा अधिकाऱ्यांची मुलं शिक्षणसाठी येतात.

परंतु काही घरगुती कारणांमुळे किमला दोन वर्षानंतर स्विर्त्झलँन्ड सोडावे लागते. तर दोन वर्षानंतर पुन्हा किम येथे आला होता. यावेळी किमचे नाव बदलून पाक उन असे करण्यात आले होते आणि त्याला बर्नच्या एकाच जर्मन भाषा बोलणारी सार्वजिक शाळा Schule Liebefeld Steinhölzli मध्ये प्रवेश दिला होता.

शाळेच्या दिवसात किमचा मित्र जाओ माइकेलाने नेत्यांशी बोलताना असे सांगितले होते की, तो त्याच्या बाजूलाच बसायचा. जाओने म्हटले की, किमला जर्मन शिकवायचे. त्या बदल्यात किम हा गणित शिकवायचा. जाओने असे ही म्हटले की, किम हा एक उत्तम मुलगा होता. सर्व मुलं त्याला पसंद करायचे. शाळेत जर्मन शिकण्याव्यतिरिक्त किमने विज्ञान, म्युझिक, धर्म, आर्ट्स सारखे विषय ही शिकला.(Kim Jong Un Education)

हे देखील वाचा- चीन आणि पाकिस्तानसह अन्य देश आपली क्षेपणस्र कुठे सुरक्षितपणे लपवतात?

असे मानले जाते की, स्विर्त्झलँन्ड मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या १७ व्या वर्षात किम उत्तर कोरियात परतला. त्यानंतर त्याने राजधानी प्योंगयांगमध्ये असलेल्या किम इल सुंग युनिव्हर्सिटीमध्ये फिजिक्समध्ये डिग्री मिळवली. तर किम इल संग मिलिट्री युनिव्हर्सिटीतून आर्मी ऑफिसरची सुद्धा डिग्री त्याने मिळवली. अशाप्रकारे किमकडे दोन-दोन डिग्री आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.