जगभरात उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी चर्चांना उधाण आलं आहे. किम जोंग उन कोमामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे तर काही जण त्याच्या मृत्याचाही दावा करत आहेत. पण सत्य का लपवलं जात आहे?
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनबाबत चर्चांना उधाण आलं आहे. किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी जाणून घेण्यासाठी जगभरात उत्सुकता आहे. जाणकारांच्या दाव्यानुसार, किम जोंग उनचा मृत्यू झाला आहे तर काही वृत्तानुसार किम जोंग उन कोमामध्ये आहे. या प्रकरणी उत्तर कोरियात एवढी गोपनियता बाळगली जात आहे की तिथल्या नागरिकांनाही सत्य काय आहे हे माहित नाही.
याआधीही हृदयाच्या शस्त्रक्रियेदरम्यान झालेल्या चुकीमुळे किम जोंग उन अतिशय आजारी असल्याचं किंवा त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात होता. मात्र त्यानंतर एका खताच्या प्लान्टच्या उद्घाटनादरम्यान किम जोंग उन सार्वजनिकरित्या समोर आला होता. मात्र आता पुन्हा एकदा तो त्याचा मृत्यू झाल्याचा किंवा तो कोमामध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.
देशाच्या हुकूमशाहाच्या मृत्यूनंतर परिस्थिती बिघडू शकते. कारण आपल्या देशात किमची ओळख ही आधीच्या हुकूमशाहांच्या तुलनेत दयाळू म्हणून आहे, ज्याने अनेक कल्याणकारी पावलं उचचली आहेत.
जगातील हुकूमशाहांवर पुस्तक लिहिणारे लेखक ख्रिस मिकुल यांच्या मते, जर किम जोंग उनचा मृत्यू झाला तर उत्तर कोरिया उद्ध्वस्त होईल. कारण तिथे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील, ज्या रोखणं कठीण होईल.
पत्रकार रॉय केली यांचं मत काय?
दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्रपती किम डे-जंग यांच्या कार्यकाळात अधिकारी असलेले चान्ग सॉन्ग-मिन यांच्या दाव्यानुसार, किम जोंग उन कोमामध्ये आहे. तर उत्तर कोरियात बराच काळ वास्तव्यास असलेले पत्रकार रॉय कॅली यांच्या मते, त्यांच्या देशात अशाप्रकारे गोपनियता बाळगली जाते की, तिथे राहणाऱ्यांनाही देशात काय सुरु आहे, याची माहिती नसते. डेली एक्स्प्रेससोबत केलेल्या बातचीतमध्ये ते म्हणाले की, “त्यांचा मृत्यू झाला असावा असं मला खरंच वाटत आहे, पण त्या देशाबाबत काहीच सांगू शकत नाही.”
ब्रिटिश आणि अमेरिकेच्या मीडियाने ही मिन यांच्या हवाल्याने एवढंच सांगितलं आहे की, किम जोंग उन कोमामध्ये आहे. उन कोमामध्ये असल्याचा अर्थ उत्तर कोरियासाठी एखाद्या आणीबाणीपेक्षा कमी नाही. उत्तर कोरियाच्या मीडियातही उनच्या काहीही स्पष्ट सांगितलेलं नाही. पण जर किम जोंग उनचा मृत्यू झाला असेल तर त्याचा उत्तराधिकारी कोण असेल, अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे.
दक्षिण कोरियाची गुप्तचर यंत्रणा नॅशनल इन्टेलिजन्स सर्विस (NIS) ने म्हटलं होतं की, किम जोंग उन आपले सर्व अधिकार बहिण किम यो जोंगकडे सोपवेल. जोंग सध्या आपल्या भावाच्या राजकीय पक्षाची उपसंचालक आहे. तिच किम जोंग उनची उत्तराधिकारी असल्याचं समजतं. किम यो जोंग जरी सगळ्यांसमोर असली तर पडद्यामागे किम जोंग उनच्या हातातच सगळा कारभार असेल.
किम जोंग उन आणखी बराच काळ कोमामध्ये राहण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे. त्यामुळे त्याची बहिण किम यो जोंग सत्ता काबीज करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. जाणकारांच्या मते, किम यो जोंग ही आपल्या भावाप्रमाणेच अतिशय क्रूर हुकूमशाह बनू शकते. किम यो जोंग अतिशय महत्त्वाकांक्षी आणि स्मार्ट आहे. जर तिने सत्ता सांभाळली तर येत्या काही वर्षात ती फारच क्रूर सिद्ध होईल.
किम जोंग उनच्या प्रकृतीविषयी चर्चांना उधाण
49