जगात कोरोना कोणी आणला…हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. कोरोना नावाच्या रोगानं मानवी जीवनात एवढी उलथापालथ केली आहे की, पुढच्या दहा पिढ्या तरी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत रहातील. मात्र सध्यातरी कोरोनाचा उगम चीनमध्ये झाल्याचे बहुतांश जग मानत आहे. पण उत्तर कोरियाचा हुकूमशहा यांनी कोरोनाच्या उमगाची अजब थेअरी व्यक्त केली आहे.(Kim Jong un)
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन हा आपल्या हटके वागण्यासाठी प्रसिद्ध आहे. बाकी जगाबरोबर आपला कुठलाही संबंध नाही, असं मानणारा किम स्वतःच्या धुंदीत मस्त असतो. त्याच्या विचित्र वागण्याच्या आणि विधानांच्या नेहमी बातम्या येत असतात. आता त्याच्यात भर पडली आहे, ती किमच्या नव्या दाव्यामुळे. (Kim Jong un)
कोरोनाच्या उगमाबद्दल बोलताना किम जोंग उन यांचा दावा केला आहे की, कोरोनाला पृथ्वीवर कोणीतरी आणलं आहे. हे कोणीतरी म्हणजे एलियन असून त्यांनीच पृथ्वीवर कोरोना नावाचा रोग आणून तो पसरवला आहे. त्यातून एलियनला पृथ्वीवर राज्य करायचंय असा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी उत्तर कोरियाच्या स्थानिक वृत्तवाहिनीबरोबर बोलतांना हे सांगितलं आहे. इतकंच काय आपल्या देशातील पहिला कोरोनाचा रुग्णही एलियन्समुळे सापडल्याचेही त्यांनी सांगितले.
दक्षिण कोरियाशी जोडलेल्या सीमेवरून एलियन्सने हा विषाणू फुग्यात भरून फेकल्याचे किमने सांगितले. एवढ्यावरच न थांबता किमनं तेव्हापासूनच उत्तर कोरियात कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याचे सांगितले आहे. त्यांनी हा दावा करताना त्याचे पुरावेही दिले आहेत. उत्तर कोरियामध्ये एप्रिलमध्ये 18 वर्षीय सैनिक आणि 5 वर्षांच्या मुलाने एलियन सदृश वस्तूला स्पर्श केला. हे दोघेही सीमेलगतच्या भागातील आहेत. यानंतर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्याचे या किमनं सांगितले आहे.(Kim Jong un)
====
हे देखील वाचा – G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी दिल्या खास भेटी… वाचा कोणाला काय दिले?
====
किमच्या या दाव्याबरोबर उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA वरुन सरकारी पातळीवर काही आवाहन करण्यात येत आहे. त्यात सीमेजवळ राहणाऱ्या लोकांनी हवेतून येणाऱ्या गोष्टी म्हणजे फुगे आणि एलियन यांसारख्या गोष्टींपासून सावध राहावे, असा प्रकार कोणाला दिसल्यास पोलिसांना कळवा असे आवाहनही केले आहे.
उत्तर कोरियामध्ये कोरोना आल्यापासूनच सुरुवातीची अडीच वर्षे हा विषाणू नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र या वर्षी एप्रिलच्या अखेरीपासून सुमारे 20 लाख लोक या देशात गूढ तापाने ग्रस्त असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. 12 मे रोजी, उत्तर कोरियाने जाहीर केले की, त्यांच्या देशात प्रथमच कोरोना विषाणू आढळला आहे. यानंतर किम जोंगने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले. उत्तर कोरियामध्ये किम जोंग जे बोलेल ती बातमी होते. त्याचे वाक्य प्रमाण असते. आता या किमनं एलियनवर कोरोनाची जबाबदारी टाकून अजून एक चर्चेत राहिल असे विधान केले आहे. मात्र या सर्वात आपल्या देशातील कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे जगापासून लपवण्याचा त्याचा प्रयत्नच पुढे आला आहे. (Kim Jong un)
अर्थात किमच्या या दाव्याला त्याचा शेजारी देश दक्षिण कोरियाने मूर्खपणाचे लक्षण या शब्दात उत्तर दिले आहे. सोलमधील एका प्राध्यापकाचे म्हणणे आहे, किम जोंगच्या दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण वस्तूंमधून विषाणू पसरण्याची शक्यता नसते आणि एलियन फक्त उत्तर कोरियाच्या सीमेवर येऊन थांबतील ही शक्यताही हस्यास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. (Kim Jong un)
– सई बने