Home » किम जोंग 36 दिवसांसाठी होते गायब; काय असेल यामागचं कारण

किम जोंग 36 दिवसांसाठी होते गायब; काय असेल यामागचं कारण

by Team Gajawaja
0 comment
Kim Jong
Share

उत्तर कोरियाचा सणकी हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong) हे एक अवघड कोडं असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. याला कारण म्हणजे, गेल्या 36 दिवसांपासून किम जोंग हा गायब झाला होता. उत्तर कोरियामध्ये मंत्रिमंडळाच्या महत्त्वाचा बैठकीतही किम जोंग (Kim Jong) दिसला  नाही. यावर किमची तब्बेत बिघडली असल्याचे निदान निघाले. तर काहींनी किमची तब्बेत गंभीर असल्याचेही  जाहीर केले. आता 36 दिवसांनंतर हा किम जोंग प्रसार माध्यमांसमोर पुन्हा दिसला आहे. त्याबरोबरच हा किम एवढ्या दिवस कुठे होता हा प्रश्न विचारण्यात येत आहे. तर या 36 दिवसात किम शेजारील दक्षिण कोरियात बंडाची तयारी करत असल्याची माहिती मिळाली आहे. हा हुकूमशहा हजारो हेरांना निर्वासित म्हणून सीमेवर पाठवत असून दक्षिण कोरियात बंड करण्याचा त्याचा कट असल्याचे सांगण्यात येत आहे. पण यापेक्षाही हा किम जोंग (Kim Jong) उन 36 दिवसानंतर पुन्हा प्रसार माध्यमांसमोर आल्यावर त्यांनी जो हुकूम दिला तो भीती निर्माण करणारा आहे. कारण या सणकी हुकूमशहानं आपल्या लष्कराला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेशच दिले आहेत. ऐवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यानं अणु क्षेपणास्त्रांचा उल्लेख करत अणु युद्धाला तयार राहण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला आहे. 

गेल्या 36 दिवस गायब असलेला किम जोंग उन (Kim Jong) हा चर्चेचा विषय ठरला होता.  यापूर्वीही त्यांन 30 दिवसांचा ब्रेक घेतला होता.  मात्र या ब्रेकच्या काळात त्यांनी केलेली कामं अती घातक ठरली आहेत.  किम जोंग उन गेल्या 36 दिवसांपासून ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसला नाही. त्यानंतर किम (Kim Jong) आजारी असल्याची बातमी आली.  मात्र, सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या केंद्रीय लष्करी आयोगाच्या बैठकीला हजेरी लावत किमनं या सर्व बातम्या खोट्या असल्याचा संदेश दिला आणि लष्कराला तैनात होण्याचे आदेश दिले आहेत.  त्यामुळे हा हुकूमशहा या 36 दिवसांत नेमका कुणावर हल्ला करण्याचा विचार करत होता का याची चिंता आता व्यक्त होत आहे.  त्याचबरोबर किम जोंग उन दक्षिण कोरियात बंडाची तयारी करत असल्याचीही माहिती पुढे आली आहे.  उत्तर कोरियाच्या हजारो हेरांना त्यासाठी खास प्रशिक्षण दिले गेले आहे.  हे हेर निर्वासित म्हणून या दोन देशांच्या सीमांवर पाठवण्यात येत आहे. हा उठाव करण्यात येणार असून दक्षिण कोरियावरही आपला हक्क सांगण्याची तयारी किम करत असल्याचे वृत्त आहे.  

36 दिवसानंतर झालेल्या ज्या बैठकीला किम (Kim Jong) हजर होता त्या बैठकीत सर्वोच्च लष्करी अधिकारी सामील झाले होते.  सैन्यात आवश्यक ते बदल करून लष्कराला बळकट करण्याचा आदेश यावेळी किमनं दिला आहे.  तसेच किमने आपल्या लष्कराला युद्ध कवायतींचा विस्तार आणि युद्ध तयारी मजबूत करण्याचे आदेशही दिले आहेत. माहितीनुसार उत्तर कोरियाच्या आण्विक क्षेपणास्त्र चाचण्यांवर नजर ठेवणाऱ्या विभागाचे नाव ‘मिसाईल जनरल ब्युरो’ असे आहे.  या लष्करी शाखेचा पहिल्यांदाच जाहीरपणे उल्लेख किमनं बैठकीत केला आहे.  यामुळे जाणकारांची चिंता वाढली आहे.  याशिवाय उत्तर कोरियाच्या लष्कराच्या अनेक विभागांचे नवे ध्वजही या बैठकीत लाँच करण्यात आले आहेत.  त्यामुळेच किम आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याच्या विचारात असल्याची अटकळ बांधण्यात आली आहे आणि ही बातमी संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारी आहे. 

========

हे देखील वाचा : जैसलमेर मधील ‘हे’ किल्ले भुताटकी कथांसाठी आहेत प्रसिद्ध

========

उत्तर कोरियाच्या लष्करी ‘कोरियन पीपल्स आर्मी’ला 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित परेडमध्ये किम उपस्थित राहणार आहे.  यावेळीच तो काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.  त्यामुळे जगातील विश्लेषकांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहेत.  कारण   या परेडद्वारे किम आपली आण्विक क्षमता अमेरिका आणि आशियातील इतर राष्ट्रांना दाखवणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी किमने (Kim Jong) थेट अमेरिकेला आण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियाने 2022 मध्ये 70 पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत.   ज्यात संभाव्य आण्विक क्षेपणास्त्र वॉरहेड्सचा समावेश आहे. वृत्तानुसार, या क्षेपणास्त्रांची रचना दक्षिण कोरियामधील लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी किंवा अमेरिकेच्या मुख्य भूभागावर पोहोचण्यासाठी करण्यात आली आहे. यामुळेच अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरिया सातत्याने किम जोंग उन यांच्या लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आता हा किम आपल्या लष्करी कोरियन पीपल्स आर्मीला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त होणा-या परेडमध्ये काय भूमिका घेतोय, याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.