बालपणीच्या आठवणी ताज्या करणे मेंदू आणि आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आनंद आणि टेंन्शन फ्री आठवणी आठवल्याने मन आनंदित होते आणि फ्रेश ही वाटते. आजकाल याच संदर्भात एक नवा ट्रेंन्ड सुरु झाला आहे. त्यासाठी एक नवा शब्द सुद्धा काढण्यात आला ाहे. त्याला किडल्टिंग असे म्हटले जाते. किडल्टिंग (kidulting) सध्या जगभरात प्रसिद्ध होत आहेय यामध्ये वयस्कर लोक अशा काही गोष्टी करतात ज्या मुलांसाठीच असतात. खासकरुन कोविड-१९ च्या महासंकटादरम्यान हे किडल्टिंगच्या गोष्टी अधिक समोर येऊ लागल्या होत्या.
किडल्टिंग मध्ये वयस्कर स्वत:ला अशा अनुभवात टाकतात ज्यामधून त्यांना आनंद मिळतो. जसे की त्यांचे बालपण परत आले आहे. असे मानले जाऊ शकते की, जुन्या दिवसात बालपणातील आनंदाचे आणि हसरे क्षण पुन्हा मिळाले आहेत. आजच्या तणावाच्या आयुष्यात असे क्षण आठवणून टेंन्शन थोड्याफार प्रमाणात कमी केले जाऊ शकते.
सध्याची स्थिती अशी आहे की, मोठ्या मार्केटमध्ये ब्रँन्ड सुद्धा वाढत्या किडल्टिंगच्या ट्रेंन्डला ओळखू लागले आहेत. मॅक्डॉनल्डचा वयस्कर लोकांसंबंधित हॅप्पी मील्ससह काही गोष्टी घेऊन जाता येतात हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. टिक टॉक सारख्या सोशल मीडियात कल्चरल इंन्फ्युएंन्सर्स सुद्धा जुन्या फॅशनच्या माध्यमातून त्यांना आपले जुने क्षण आठवण्यास मदत करत आहेत.
क्लिनीकल मनोवैज्ञानिक ट्रिश फिलिप्स असे म्हणतात की, भले तुमच्या आयुष्यात बालपण हे फार कठीण परिस्थितींतून गेले असेल, काही घटना घडल्या असतील. मात्र लहान-लहान आनंदाचे क्षण आठवून जुन्या आठवणी ताज्या केल्या जाऊ शकतात. यामधून आनंद मिळू शकतो.
वेल अॅन्ड गुडच्या रिपोर्ट्सनुसार किडल्टिंग (kidulting) नॉस्टेल्जियावर आधारित आहे आणि मनातील मुलाच्या भावनेवर उपचार पद्धत आहे. यामध्ये वयस्कर व्यक्ती आपल्या आठवणींना उजाळा देतात आणि त्यांच्या मध्ये उत्तम मूड तयार होतो. कोविडच्या काळात किडल्टिंगचा ट्रेंन्ड वाढू लागला होता. ब्लूमबर्कच्या रिपोर्ट्सनुसार २००१ मध्ये दोन हजार अमेरिकन पालकांवर झालेल्या एका सर्वेत असा खुलासा झाला होता की, त्यांनी स्वत:साठी खेळणी खरेदी केली होती. खरंतर किडल्डिंग ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
हेही वाचा- मुलाच्या वारंवार चुका काढल्याने होऊ शकतो डिप्रेशनचा शिकार
खरंतर आजच्या धावपळीच्या, टेंन्शन आणि लक्ष्य मिळवण्यासाठी कष्ट केल्या जाणाऱ्या आयुष्यात किडल्टिंग काही क्षण तरी आराम देते. आनंद निर्माण करते. या व्यतिरिक्त मनाला शांति आणि काही मनावर सकारात्मक परिणाम झाल्यासारखे यामुळे जाणवते.