Home » गरजेपेक्षा अधिक टीव्ही पाहणे मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

गरजेपेक्षा अधिक टीव्ही पाहणे मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक

जी मुलं दिवसात तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही किंवा स्क्रिन पाहतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणा, मानसिक आजार, आळस आणि मधुमेहासारखे गंभीर आजारांची लक्षण दिसू शकतात.

by Team Gajawaja
0 comment
Kids health care
Share

टीव्ही, मोबाईल, टॅबलेट आणि कंप्युटर आज प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. अशातच मुलांना सुद्धा याची बालपणापासून अधिक सवय लागली जाते आणि त्यांची ही सवय पटकन मोडणे मुश्किल होते. मात्र एका रिपोर्ट्सनुसार जी मुलं दिवसात तीन तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ टीव्ही किंवा स्क्रिन पाहतात त्यांच्यामध्ये लठ्ठपणा, मानसिक आजार, आळस आणि मधुमेहासारखे गंभीर आजारांची लक्षण दिसू शकतात. स्क्रिन पाहण्याच्या समस्येमुळे मुलं इंसुलिन रेजिस्टेंसच्या समस्येचा सामना करू शकते. त्यामुळे मधुमेह होऊ शकतो. एका ठिकाणी दीर्घकाळ बसून राहणे हे केवळ वयस्करच नव्हे तर लहान मुलांसाठी सुद्धा धोकादायक आहे. डिजिटल स्क्रिनच्या संपर्कात अधिक वेळ राहणाऱ्या मुलामध्ये हाट पॅठ आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्याचा धोका काही पटींनी वाढला जातो. अशातच गरजेचे आहे की, मुलांना टीव्ही आणि स्क्रिनपासून दूर ठेवले पाहिजे. त्याचसोबत त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये ही बदल केला पाहिजे. (Kids health care)

मुलांमध्ये मधुमेह होण्याचा धोका
मुलांमध्ये मधुमेह होण्यामागे काही कारणे असू शकतात. टीव्ही आणि स्क्रिन व्यतिरक्त पुढील काही कारणे ही त्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

-फॅमिली हिस्ट्री
ज्या मुलांचे आई-वडिल किंवा भाऊ-बहिण यांना आधीच मधुमेह झाला असेल त्यांना टाइप-१ मधुमेहाटा सामना करावा लागू शकतो.

-जेनेटिक
टाइप-१ मधुमेहाची जोखिम विशिष्ट जीन संबंधित असते. ज्या मुलांच्या शरिरात विशिष्ट जीन असतात त्यांना याचा धोका असू शकतो.

-वायरस
विविध प्रकारच्या वायरसच्या संपर्कात आल्यानंतर आइलेट सेल्स डिस्ट्रॉय होऊ शकतात. ज्यामुळे हे वायरस ऑटोइम्यून सिस्टिमवर अगदी सहज हल्ला करू शकतात.

मुलांना मधुमेहापासून असे ठेवा सुरक्षित
-फिजिकल अॅक्टिव्हिटी करण्यास सांगा
मुलांना मधुमेहाच्या धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना फिजिकल अॅक्टिव्हिटी अधिक करण्यास सांगा. एका रिपोर्टनुसार प्रत्येक मुलाला दररोज कमीत कमी एक तास तरी फिजिकल रुपात अॅक्टिव्ह असणे फार गरजेचे असते. यामध्ये मुलांना धावणे, फुटबॉल अथवा स्विमिंग अशा काही अॅक्टिव्हिटी करण्यास सांगू शकता.

-खेळण्यास पाठवा
मुलांना घरी बसवून ठेवून टीव्ही आणि स्क्रिन पाहत ठेवण्याऐवजी त्यांना खेळण्यास पाठवा. मुलं जेवढं घराबाहेर जाऊ खेळेत तेवढाच त्याचा शारिरीक आणि मानसिक विकास होईल.

-डाएटमध्ये बदल करा
आजकाल बहुतांश मुलं काउच पोटॅटो होतता. म्हणजेच स्क्रिन समोर फार वेळ बसून राहतात आणि जंक फूडचे सेवन करतात.गरजेपेक्षा अधिक जंक फूड आणि साखरेचे पदार्थ खाल्ल्याने मधुमेह होऊ शकतो. यामुळे मुलांना मधुमेहाच्या धोक्यापासून दूर ठेवायचे असेल तर हेल्दी फूड खाण्यास द्या. (Kids health care)

हेही वाचा- ‘ली फ्रॉमेनी सिंड्रोम’ म्हणजे काय? वडिलांसह 3 मुलांचा झालायं मृत्यू

-वजन नियंत्रणात ठेवा
अनहेल्दी लाइफस्टइळ आणि जंक फूडचे अधिक सेवन केल्याने लठ्ठपणा आणि ओबेसिटीचा सामना करावा लागू शकतो. शरिराला हेल्दी आणि उत्साही ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जी मुलं अधिक टीव्ही पाहतात त्यांच्यामध्ये फिजिकल अॅक्टिव्हिटी ही अन्य मुलांच्या तुलनेत फार कमी असते. हे मधुमेहाचे कारण ठरू शकते. यामुळे मुलाचे वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.