किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात भयंकर दुखण्याची समस्या निर्माण होते. किडनी स्टोनचा आकार हा लहान मोठा काही वेळेस असू शकतो. लहान स्टोन हे मुत्रविसर्जनाच्या माध्यमातून बाहेर पडले जाऊ शकतात. मात्र मोठे स्टोन हे सर्जरी केल्यानंतरच काढले जाऊ शकतात. किडनी स्टोनच्या दरम्यान दुखण्यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यावर ही लक्ष दिले पाहिजे. अशातच किडनी स्टोन झाल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करु नये याचबद्दल आपण अधिक जाणून घेऊयात. (Kidney Stone)
किडनी स्टोन का होतो?
किडनीचे काम रक्त शुद्धीकरणाचे असते. मात्र डाएटमध्ये अधिक कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि मिनिरल्सच्या प्रमाणामुळे किडनी सुरळीत काम करु शकत नाही. न पचललेले पदार्थ शरिरातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे हळूहळू एकत्रित होत त्याचे स्टोनमध्ये रुपांतर होते.
बिया आलेल्या भाज्या आणि फळं
तज्ञांच्या मते, किडनी स्टोन झालेल्या रुग्णाने डाएटमध्ये बिया आसलेली फळ आणि भाज्या खाण्यापासून दूर रहावे. जसे की, काकडी, पेरु, वांग. यामुळे तुम्हाला पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते.
पालक
किडनी स्टोन मध्ये अतिशय पोटात दुखते आणि तो त्रास सहन करता येत नाही. अशातच पालकचे सेवन करु नये असे सांगितले जाते. यामध्ये असलेले ऑक्सेलेट, कॅल्शिअमला जमा करतात आणि ते युरिनच्या माध्यमातून बाहेर पडत नाही.
आंबट फळ आणि कॅल्शिअमयुक्त फूड्स
आंबट फळं जसे की, लिंबू, संत्र, आवळासह उडदाची डाळ, सोयाबीन, चीकू, पालक, चॉकलेट सारख्या गोष्टी ही किडनी स्टोन झाल्यानंतर खाऊ नका. यामुळे किडनी स्टोन वाढण्याची शक्यता असते. (Kidney Stone)
टोमॅटो
किडनी स्टोनच्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन करण्यापासून दूर रहावे. कारण यामध्ये ऑक्सेलेटचे खुप प्रमाण असते. त्यामुळे ते खाऊ नये. पण तरीही खायचे असेल तर त्यामधील बिया काढाव्यात.
कोल्ड ड्रिंक्स
जर तुम्हाला किडनी स्टोन झाला आहे तर कोल्ड ड्रिंक पिण्यापासून दूर राहिले पाहिजे. यामध्ये फॉस्फोरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पोटात दुखण्याची समस्या वाढू शकते.
हे देखील वाचा- सामान्य खोकला आणि टीबी खोकला यामधील फरक जाणून घ्या…
अधिक खारट पदार्थ
किडनी स्टोनच्या समस्येत मीठाचे कमी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. जे किडनी स्टोनचा धोका अधिक वाढवू शकतो. कमी खारट पदार्थांसह फास्ट, प्रोसेस्ड आणि पाकिट बंद पदार्थांपासून ही दूर रहा.