आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपल्या खाण्यापिण्याची वेळ आणि सवय ही अयोग्य असेल तर आपणच आजारांना आमंत्रण देऊ शकतो. तर किडनी स्टोन ही अशी एक समस्या आहे जे तुमच्या खाण्यापिण्याच्या बेजबाबदारपणामुळे निर्माण होऊ शकते. यावर डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावे लागतात. परंतु तुम्ही खात असलेला आहार सुद्धा तितकाच संतुलित असला पाहिजे. त्यामुळे आम्ही तुम्हाला किडनी स्टोन संदर्भातील काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. जसे की, स्टोनच्या प्रकारावर अवलंबून आहे की तुम्ही काय खाल्ले पाहिजे. तसेच काय खाऊ नये. आणखी महत्वाचे म्हणजे किडनी स्टोनचा (Kidney stone) प्रकार जाणून घेण्यासाठी तुम्हाला डॉक्टरांशीच संपर्क साधावा लागणार आहे.
किडनी स्टोन झाल्यास काय खावे?
-फायबरयुक्त पदार्थ
किडनी स्टोनसाठी आहारासंबंधित नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी यांनी एका संशोधनात असे म्हटले की, भरपूर प्रमाणात फायबर असलेली फळ आणि भाज्यांचा सेवन केल्याने किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया थांबू शकते. हेच कारण आहे की, तज्ञ सुद्धा किटनी स्टोन झाल्यास तुम्हाला फायबरयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. त्याचसोबत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की, फायबरयुक्त पदार्थ हे तुमचा किडनी स्टोन वाढण्याची प्रक्रिया कमी करु शकतो पण किडनी स्टोनची समस्या बरी करण्यास मदत करणार नाही.
-साइट्रिक फ्रूट
कोरियन जर्नल ऑफ युरोलॉजी यांनी केलेल्या एका संशोधनात असा उल्लेख करण्यात आला की, साइट्रिक अॅसिड हे किडनी स्टोन तयार करण्याची प्रक्रिया थांबवते. चसेच लिंबू आणि साइट्रिक फळांचे सेवन केल्यास कॅल्सियम ऑक्सालेटचे क्रिस्टल तयार होणे थांबू शकते. हे क्रिस्टल किडनी स्टोन रुपात ओळखले जातात. त्यामुळे किडनी स्टोनसाठी आहारात साइट्रस फळांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
-नारळाचे पाणी
जसे आपण पाहिले भरपूर फायबर असलेले पदार्थ खाल्ल्यास किडनी स्टोन तयार होण्याची प्रक्रिया थांबवण्यास मदत होते. अशातच नारळाचे पाणी यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे किडनी स्टोनची प्रक्रिया कमी करण्यासाठी नारळाचे पाणी पिणे हे फायदेशीर ठरेल.
हे देखील वाचा- सर्दी,खोकल्यामुळे त्रस्त असाल तर ‘हे’ घरगुती उपाय येतील कामी

-उसाचा रस
उसाचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असतेच. परंतु तज्ञांच्या मते उसाचा रस हा किडनी स्टोनची समस्या कमी करण्यास मदत करेल. याच आधारावर असे म्हटले जाते की, किडनी स्टोनसाठी (Kidney stone) तुम्ही उसाचा रस पिऊ शकता.
-तृणधान्ये आणि शेंगा
तृणधान्ये आणि शेंगाचा उपयोग सुद्धा किडनी स्टोन तयार होण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतात. खरंतर एनसीबीआयच्या एका शोधात असा उल्लेख केला आहे की, तृणधान्ये आणि शेंगा मध्ये फायटेट तत्व खुप प्रमाणात असतात. ही खास तत्व किडनी स्टोन तयार करण्याची प्रक्रिया थांबवण्यास मदत करतात. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात मध्ये तृणधान्ये आणि शेंगांचा समावेश करु शकता.
दरम्यान, हाय-ऑक्सालेट आणि हाय-सोडियमयुक्त खाद्यपदार्थ आणि एनीमल प्रोटीन हे तुमची किडनी स्टोनची समस्या वाढवू शकतात. त्यामुळे तुम्हाला नट्स किंवा त्यापासून बनवलेले प्रोडक्ट्स, पालक, मांस, अंडी, शेंगदाणे, मासे, दूध, दही, बटर, सोया मिल्क, टोफू, गाजर, कांदा, लहसूण आणि अन्य हाय-ऑक्सालेट आणि सोडियमयुक्त भाज्या खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.