सध्या बॉलिवूडमध्ये सिक्वल आणि रिमेक चित्रपटांचा काळ सुरू आहे. अनेक जुन्या आणि साऊथ चित्रपटांचे सिक्वल आणि रिमेक केले जात आहे. मुख्य म्हणजे हे सर्वच रिमेक, सिक्वल सुपरहिट होतात असे नाही मात्र काही हिट सिनेमाचे रिमेक, सिक्वल सुपरहिट झाले असल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. काही रिमेक, सिक्वल चित्रपटांची मागणी तर खुद्द प्रेक्षकांकडूनच केली जाते. अशा या रिमेक, सिक्वलच्या लाटेत अजून एका सिनेमाच्या सिक्वलची भर पडणार आहे. हा नवीन सिक्वल सिनेमा आहे, ‘भूल भुलैया 2’. २००७ साली अक्षय कुमारच्या आलेला ‘भूल भुलैया’ या सिनेमाचा सिक्वल असणाऱ्या ‘भूल भुलैया 2’ सिनेमाची प्रेक्षकांना आधीपासूनच्या उत्सुकता आहे. (Kiara Advani In Bhool Bhulaiyaa 2)
काही दिवसांपूर्वीच ‘भूल भुलैया 2’ या सिनेमाचा छोटा टिझर प्रदर्शित करण्यात आला. कार्तिक आर्यन आणि राजपाल यादव या दोघांची झलक या टीझरमधून दिसली. मात्र चित्रपटातील इतर कोणतेच कलाकार यात न दिसल्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या भूमिकांबद्दल आणि लुक्सबद्दल खूपच आतुरता होती, खासकरून कियारा अडवाणीच्या भूमिकेबद्दल. मात्र आता कियाराने देखील तिचा या सिनेमातील लूक रिव्हिल केला आहे. ‘भूल भुलैया 2’ या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कियारा आणि कार्तिक एकत्र चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे या नव्या जोडीबद्दल सर्वांनाच कुतुहूल आहे.
‘भूल भुलैया 2’ सिनेमात कियारा ‘रीत’ ही भूमिका साकारणार असून तिचा सिनेमात लूक कसा असेल याचे एक मोशन पोस्टर कियाराने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करताना कियाराने कॅप्शनमध्ये लिहिले, “भेटा रीतला, वेडे नका होऊ, ती जितकी प्रेमळ दिसते तितकी अजिबात नाहीये. #BhoolBhulaiyya 2, २० मे, २०२२ ला चित्रपटगृहांमध्ये सिनेमा प्रदर्शित होणार आहे.” (Kiara Advani In Bhool Bhulaiyaa 2)
कियाराने शेअर केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सुरुवातीला कियाराचे सुंदर डोळे दिसतात, ज्यात भीती अगदी स्पष्ट दिसते. त्यानंतर हळूहळू तिचा संपूर्ण चेहरा समोर येतो आणि तिच्या चेहऱ्यावरील भीती सर्वांचे लक्ष वेधून घेते. त्यानंतर पोस्टरमध्ये कियाराच्या डोक्यावर केसांमध्ये काळे नखं आणि भयावह हात लोकांमध्ये सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण करतो.” (Kiara Advani In Bhool Bhulaiyaa 2)
======
हे देखील वाचा – अनेक मोठमोठ्या चित्रपटांना पछाडत केजीएफ २ ने विजयी घोडदौड चालू राखत तयार केले ‘हे’ सर्वात मोठे रेकॉर्ड
======
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘भूल भुलैया 2’ या सिनेमात कार्तिक आर्यन, तब्बू, कियारा आडवाणी आणि राजपाल यादव मुख्य भूमिकेत दिसणार असून, भूषण कुमार, कृष्ण कुमार, मुराद खेतानी आणि अंजुम खेतानी यांनी सिनेमाची सह निर्मिती केली आहे. २० मेला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाबद्दल आता प्रेक्षकांमध्ये पराकोटीची उत्सुकता दिसून येत आहे. (Kiara Advani In Bhool Bhulaiyaa 2)
२००७ साली आलेल्या अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या ‘भूल भुलैया’ या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवत बक्कळ कमाई केली होती. हॉरर कॉमेडी असलेल्या या सिनेमातील गाणी, कथा, कलाकारांचा अभिनय सर्वच गोष्टी खूपच गाजल्या होत्या. आता ‘भूल भुलैया 2’ हा सिनेमा लोकांना कितपत आवडतो आणि किती हिट होतो हे तर १४ मे नंतर समजेलच आता या सिनेमाच्या ट्रेलरबद्दल लोकांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. (Kiara Advani In Bhool Bhulaiyaa 2)