हिंदू धर्मात प्रत्येक ऋतू हा खास असतो. त्या ऋतूनुसार हिंदू सण आणि समारंभ साजरे होतात. हे सण समारंभ कधी साजरे करावे याचे नियोजनही हिंदू पंचागामध्ये असते. असाच एक कालावधी आता येत आहे. त्याला खरमास असे म्हणतात. हिंदु धर्मात खरमासला विशेष महत्त्व आहे. खरमास वर्षातून दोन वेळा येता. डिसेंबर-जानेवरी आणि मार्च-एप्रिल या महिन्यात खरमास येतो. दरवर्षी मार्गशीर्ष आणि पौष महिन्यात खरमास येतो. खरमासला मीनमास असेही म्हणतात. आता येणा-या डिसेंबर महिन्यात 15 तारखेपासून खरमास सुरु होणार असून नवीन वर्षात 14 जानेवारी पर्यंत खरमास असणार आहे. (Kharmas)
हिंदू धर्मात खरमासला विशेष महत्त्व आहे. कारण या काळात शुभ आणि शुभ कार्ये होत नाहीत. 2024 सालचा दुसरा खरमास 15 डिसेंबर रोजी सुरु होत आहे. खरमास हा एक काळ आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी करु नयेत असे सांगण्यात आले आहे. त्यामागे हिंदू पंचागामधील ग्रहस्थिती सांगण्यात आली आहे. वैदिक पंचांगानुसार, सूर्य देव 15 डिसेंबर रोजी रात्री 10:19 वाजता धनु राशीत प्रवेश करतील आणि तेव्हापासून खरमास सुरू होईल. 14 जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी खरमास संपेल. जोपर्यंत खरमास आहे तोपर्यंत शुभ कार्य करु नयेत असे सांगण्यात येते. या वेळी भगवान विष्णू आणि सूर्य देवाची पूजा केली जाते. भगवान कृष्ण हे समृद्धीचे प्रतिक मानले जातात. त्यांची या काळात पूजा अर्चना केल्यास व्यक्तीच्या जीवनात समृद्धी आणि आनंद येतो, असे सांगितले आहे. धार्मिक विद्वानांच्या मते भगवान विष्णू आणि सूर्यदेवाची दररोज खरमासात पूजा करावी. मानसिक शांती मिळविण्यासाठी खरमास दरम्यान ध्यान धरण्याचा सल्लाही देण्यात येतो. (Social News)
या खरमासात तामसिक अन्न खाऊ नये असेही सांगितले जाते. त्यामागे वैज्ञानिक कारण देण्यात येते. या कालवधीत कमालीची थंडी असते. ऋतु बदलण्याच्या या कालावधीचा परिणाम शरीरावर होतो. अशावेळी तामसिक अन्न् खाल्ले तर ते पचायला बाधक ठरते आणि त्यामुळे पचनशक्ती मंदावते, त्यामुळे खरमास हा आरोग्यासाठीही महत्त्वाचा महिना मानला जातो. याकाळात यावेळी नवीन वाहन खरेदी करणे किंवा घर बांधणे देखील अशुभ मानले जाते. असे असले तरी खरमासात सूर्यदेवाची उपासना आवर्जून करावी असा सल्ला देण्यात येतो. खरमासाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे आणि पूजेनंतर गूळ, दूध, तांदूळ यासह काही वस्तूंचे दान करावे, असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे. हे सर्व करतांना खरमास म्हणजे काय हे ही जाणून घेतले पाहिजे. खर म्हणजे, गाढव आणि मास म्हणजे, महिना. धार्मिक मान्यतेनुसार, जेव्हा सूर्य देव धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची गती कमी होते आणि त्याचा प्रभाव कमी होतो. अशावेळी शुभकार्य झाल्यास त्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही, असे सांगितले जाते. (Kharmas)
=====
हे देखील वाचा : महाकुंभमध्ये मातृशक्तीला प्रथम वंदन
========
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य धनु राशीतून मकर राशीत पोहोचल्यावर खरमास संपतो. यावेळी ग्रहांचे हे बदल 14 जानेवारी 2025 रोजी होणार आहेत. या दिवशी खरमास संपेल आणि पुन्हा एकदा शुभ कार्य सुरू होतील. पौराणिक कथेनुसार, या काळात सूर्यदेवाचा रथ गाढवाने ओढला. हा रथ अतिशय संथगतीनं ओढला. त्यामुळे या काळात सूर्याची चाल मंद असते. सूर्यदेवाला पृथ्वीवरील जीवन दाता मानले जाते. सूर्याच्या उष्णतेशिवाय जीवन शक्य नाही. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा आहे. या राजाचेच तेज ज्या काळात कमी असेल तिथे शुभकार्य फळत नाहीत, अशीही धारणा आहे. याशिवाय खरमासात भगवान विष्णूची पूजा करण्यासही धार्मिक ग्रंथात सांगण्यात आले आहे. हा काळ हा थंडीचा काळ असतो. ऋतुचा बदल होणा-या या काळात शरीरावरही परिणाम होतो. सोबतचत सूर्याचे तेज कमी झाल्यानं थंडीचा कडाका अधिक जाणवतो. त्यामुळे या काळात शरीराला उष्णता देतील अशा वस्तूंचे सेवन करावे असे सांगण्यात येते. यामध्ये सुक्यामेव्याचा समावेश असावा मात्र तामसिक म्हणजे, मांस, मासे यांचे सेवन टाळावे असेही सांगण्यात आले आहे. (Social News)
सई बने