असं म्हणतात की रेकॉर्ड हे तुटण्यासाठीच बनत असतात. मनोरंजनविश्वात देखील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे वेगवेगळे रेकॉर्ड बनवतात. या रेकॉर्डवरूनच या सिनेमांना एक वेगळी ओळख मिळते आणि सिनेमा हिट झाला की, फ्लॉप हे देखील समजते. दाक्षिणात्य चित्रपटांनी मधल्या काही काळापासून संपूर्ण देशात त्यांची पकड चांगलीच मजबूत केली आहे. हिंदी चित्रपटांना पछाडून साऊथ सिनेमांनी त्यांचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण केला आहे. बाहुबली, पुष्पा, आरआरआर आदी अनेक चित्रपटांनी हिंदी चित्रपटांपेक्षा अधिक कमाई करत बॉलीवूडला चांगलाच दणका दिला आहे. नुकताच साऊथचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा ‘केजीएफ चॅप्टर २’ सिनेमा प्रदर्शित झाला असून, या सिनेमाने अगदी पहिल्या दिवसापासूनच नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. (KGF 2 Box Office Collection)
पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाईचे रेकॉर्ड आपल्या नावावर करत केजीएफने धमाकेदार सुरुवात केली. त्यानंतर या सिनेमाने त्याच्या कमाईची घोडदौड कायम ठेवत विविध रेकॉर्ड रचले आहेत. आता नुकतेच ‘केजीएफ २’ चित्रपटाने अनेक मोठमोठ्या चित्रपटांना मागे टाकत सर्वात जलद २५० कोटी कमावण्याचा मान मिळवला आहे. ही बाब सिनेमासाठी, कलाकारांसाठी आणि चाहत्यांसाठी खूपच मोठी आणि सेलिब्रेशनची आहे. (KGF 2 Box Office Collection)
ट्रेंड ऍनालिस्ट असलेल्या तरण आदर्श यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या कमाईचे नवीन आकडे शेअर करत या रेकॉर्डची माहिती दिली आहे. तरण आदर्श यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी केजीएफ सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांना मागे टाकत केवळ ७ दिवसात २५० कोटी कमावले असल्याची माहिती दिली आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतर सातव्या दिवशी १६.३५ कोटी रुपयांची कमाई केली आणि केवळ सातच दिवसात या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने २५५.०५ कमावले आहे. या सिनेमाच्या कमाईचा स्पीड अजूनही सुसाट असल्यामुळे अजून नवनवे रेकॉड सिनेमा करणार यात शंका नाही. (KGF 2 Box Office Collection)
‘केजीएफ २’ सिनेमाने ‘टायगर जिंदा है’, ‘संजू’, ‘दंगल’, ‘बाहुबली २’ आदी मोठ्या सिनेमांना मागे टाकत हे मोठे आणि अवघड रेकॉर्ड केले आहे, ‘केजीएफ २’ सिनेमामुळे थलपती विजयच्या ‘बीस्ट’ सिनेमाचे मोठे नुकसान झाले आहे. कारण संपूर्ण भारतात सध्या फक्त आणि फक्त यशच्या ‘केजीएफ २’ सिनेमाचाच बोलबाला आहे. आतापर्यंत या सिनेमाच्या सर्वच व्हर्जनने भारतात ५०० पेक्षा अधिक कोटींची कमाई केली आहे. (KGF 2 Box Office Collection)
=====
हे देखील वाचा – प्रेमापुढे सर्व काही दुय्यम असते, मिलिंद सोमण आणि अंकिता यांच्या प्रेमकहाणी केले हे सिद्ध
=====
‘केजीएफ’ सिनेमाने या सिनेमातील लहान मोठ्या सर्वच कलाकारांना पॅन इंडिया ओळख मिळवून दिली. सोशल मीडियावर हा सिनेमा चांगलाच ट्रेंड होत असून, सिनेमाचे विविध संवाद, सीन, कलाकार त्यांचा अभिनय आदी अनेक गोष्टी तुफान व्हायरल होत आहे. या सिनेमाने यशला देखील मोठी ओळख मिळवून देत त्याला सुपरस्टार कलाकारांच्या यादीत नेऊन बसवले आहे. २०१८ साली केजीएफ सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने न भूतो न भविष्यती असे यश मिळवले. त्यानंतर ‘केजीएफ २’ सिनेमाची लोकांना खूपच आतुरता होती. या सिनेमात संजय दत्त अधिरा या नकारात्मक भूमिकेत झळकत असून, हे या सिनेमाचे मोठे वैशिष्ट्य आहे. यासोबतच रवीना टंडन देखील एका वेगळ्या आणि महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. लवकरच या सिनेमाचा तिसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (KGF 2 Box Office Collection)